बॉलीवूड

विद्या बालनलादेखील करावा लागलाय ‘कास्टिंग काऊच’चा सामना, सांगितला अनुभव

Dipali Naphade  |  Aug 28, 2019
विद्या बालनलादेखील करावा लागलाय ‘कास्टिंग काऊच’चा सामना, सांगितला अनुभव

अभिनेत्री विद्या बालन ही बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनय आणि हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध आहे. सध्या तिचा मुख्य भूमिका असलेला ‘मिशन मंगल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून या चित्रपटाने 150 कोटींचा आकडा पार केला आहे. विद्या बालन नेहमीच तिच्या हजरजबाबीपणा आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? विद्या बालनलादेखील बॉलीवूडची काळी बाजू अर्थात कास्टिंग काऊचच्या अनुभवातून जावं लागलं आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर आतापर्यंत बॉलीवूड अधिराज्य गाजवणाऱ्या विद्या बालनलाही असा अनुभव आला आहे. या गोष्टीचा खुलासा विद्याने एका मुलाखतीमध्ये केला आहे. 

कास्टिंग काऊचचा केला विद्याने खुलासा

आपल्या बाबतीत नक्की काय घटना घडली याचा खुलासा नुकताच विद्या बालनने एका मुलाखतीमध्ये केला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा विद्याचीच सगळीकडे चर्चा आहे. विद्या बालनने आपल्याला नक्की याचा कसा सामना करावा लागला याबाबत वाच्यता केली आहे. याबाबत स्पष्ट करताना विद्याने सांगितलं, ‘एकदा चेन्नईमध्ये असताना मला एक दिग्दर्शक त्यावेळी भेटायला आला होता. मी त्या दिग्दर्शकाला एखाद्या कॉफी शॉपमध्ये बसून बोलूया असं सांगितलं. पण त्या दिग्दर्शकाने आपण एखाद्या रूममध्ये बसून बोलूया असं सुचवलं. मी त्याच्याबरोबर रूममध्ये तर गेले पण त्या रूमचा दरवाजा मी उघडाच ठेवला. त्यानंतर तो दिग्दर्शक साधारण पाच मिनिटातच रूमच्या बाहेर निघून गेला. त्यानंतर मला जाणवलं की, मी त्यावेळी कास्टिंग काऊचचा बळी ठरणार होते.’

‘व्हीआयपी गाढव’मधून शीतल अहिरराव आणि भाऊ कदमची रंगली जोडी

विद्या बिनधास्त मांडते आपलं मत

विद्या बालन नेहमीच आपलं मत बिनधास्त मांडते. बॉलीवूडमध्ये तिची अशीच ओळख आहे. एक वेळ अशीही आली होती की, विद्या बालनच्या ड्रेसिंग सेन्सबद्दल अनेक चर्चा घडल्या होत्या. इतकंच नाही तर ‘किस्मत कनेक्शन’ आणि ‘हे बेबी’ या चित्रपटाच्या दरम्यान तिला अनेक ट्रोल्सना सामोरं जावं लागलं होतं. पण तिने त्यावेळीही कशाचाही विचार न करता आपल्याला ट्रोल करणाऱ्या लोकांचं तोंड बंद केलं होतं. या सगळ्याचा विचार न करता अभिनयावर  लक्ष केंद्रीत करून विद्याने बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. इतकंच नाही तर विद्या बालनने ‘कहानी’, ‘डर्टी पिक्चर’ आणि ‘तुम्हारी सुलू’ यासारखे चित्रपट केवळ एकटीच्या खांद्यावर पेलून यशस्वी करून दाखवले. बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांच्या मनावर विद्याने राज्य केलं. 

हॉट बिकिनी बॉडीसाठी वाणी कपूरने घेतली मेहनत

‘हम पांच’मधून विद्याचं पदार्पण

विद्या बालनने बालाजी प्रॉडक्शनच्या ‘हम पांच’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने अनेक गाण्याच्या अल्बममधून काम केलं तर सैफ अली खानबरोबर ‘परिणिता’ या पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांच्या मनावर ताबा घेतला. सध्या मिशन मंगल या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी ती पुन्हा चर्चेत आली असून लवकरच ‘महिला मंडली’ आणि ‘शकुंतला देवी’ या दोन्ही चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विद्याच्या या मुलाखतीमधून पुन्हा एकदा मनोरंजन जगतातील ही काळी बाजू समोर आली आहे. तर विद्या बालनसारख्या अभिनेत्रीनेही उशीरा का होईन याबाबत भाष्य केलं आहे. अशा बऱ्याच अभिनेत्री असतील ज्यांना यासारख्या घटनांना सामोरं जावं लागलं असेल. त्यामुळे पुन्हा एकदा कास्टिंग काऊच हा प्रकार इथे नक्कीच आहे हे सिद्ध झालं आहे.

धडक’ बॉय ईशान आणि स्टुंडंट अनन्या दिसणार एकत्र, फोटो केला शेअर

Read More From बॉलीवूड