पाण्याला अमृत म्हटलं जातं. वास्तविक आपल्या केवळ पृथ्वीवरच नाही तर आपल्या शरीरातही 70 टक्के पाणी आहे. आपल्या शरीरासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? गरम पाणी पिण्याने आपल्या शरीरातील बरेचसे आजार निघून जातात आणि शरीराशी संबंधित अनेक समस्यांपासून आपल्याला सुटका मिळते. आपलं शरीर योग्य तऱ्हेने कार्यरत राहण्यासाठी गरम पाणी पिणं खूपच फायदेशीर ठरतं. आम्ही तुमच्यासाठी खास गरम पाणी पिण्याचे नक्की काय फायदे आहेत ते घेऊन आलो आहोत –
पोट राहील नेहमी आनंदी
विज्ञानाप्रमाणे रोज सकाळी उठल्यावर गरम पाणी पित राहिल्यास, बद्धकोष्ठ आणि पोटाशी संबंधित सर्व आजार दूर होतात. वास्तविक गरम पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी तत्व बाहेर येतात. त्यामुळे पोटाशी संबंधित कोणतेही आजार तुमच्या आजूबाजूला फिरकत नाहीत.
एजिंगला करा बाय- बाय
वयाच्या आधीच आजकाल लोकांना म्हातारपण अर्थात एजिंग येऊ लागलं आहे आणि हीच मोठी समस्या आहे. विशेषतः ही समस्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सकाळीच कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि शरीरातील जमलेले विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसंच तुमच्या त्वचेवरील सेल्सदेखील चांगले राहातात.
वजन कमी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट
गरम पाणी प्यायल्यामुळे मेटाबॉलिजम योग्य राखलं जातं ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसंच तुम्ही रोज एक ग्लास गरम पाण्यात लिंबू पिळून प्यायल्यासस, तुमच्या शरीरावर चरबी जमा होत नाही आणि तुम्ही नेहमीच फिट राहाता आणि बारीकही राहाता.
किडनी समस्या होते दूर
जर कोणाला किडनी स्टोनची समस्या असेल तर त्या व्यक्तीला सकाळ – संध्याकाळ दोन्ही वेळा जेवल्यावर एक ग्लास गरम पाणी प्यायला हवं. रोज गरम पाणी प्यायल्यास ही समस्या दूर होईल. शिवाय आधीपासूनच ही सवय ठेवल्यास, किडनी स्टोनची समस्या आपल्यापासून दूर राहील.
त्रासांपासून सुटका
तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचं दुखणं असेल, अर्थात मसल्स अथवा पोटामध्ये दुखत असेल तर तुम्ही गरम पाणी प्या. यामुळे शरीरामध्ये रक्तस्राव वाढतो आणि त्यामुळे होत असेलेलं दुखणं बंद होतं.
डागाशिवाय त्वचेसाठी
गरम पाणी हे हेल्दी त्वचेसाठी रामबाण औषध आहे. तुम्हाला तुमच्या त्वचेसंबंधी कोणतीही समस्या असेल, उदा. पिंपल्स, कोरडेपणा, सुरकुत्या इत्यादी असतील, तर रोज सकाळ संध्याकाळ एक ग्लास गरम पाणी चहाप्रमाणे प्या. असं केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल आणि कायम तुमचा चेहरा डागाशिवाय चमकेल.
सर्दी – खोकल्यावर उपायकारक
बऱ्याचदा सर्दी खोकला अथवा गळा खराब असेल तर अगदी घरातील मोठेसुद्धा गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. गरम पाणी यासाठी प्यावं कारण तुमच्या श्वासनलिकेमध्ये जमा झालेला कफ गरम पाणी प्यायल्याने सहज निघून जातो आणि गळ्यातील सूज आणि दुःखापासून तुम्हाला सहज आराम मिळतो.
केसांची समस्या दूर होईल
हे खरं आहे. ज्या लोकांना विशेषतः महिलांना आपल्या केसांवर खूपच प्रेम असतं. गरम पाणी रोज प्यायल्यास, केसगळती, कोंडा होणं आणि कोरडेपणा या सगळ्यापासून तुम्हाला सुटका मिळते.
पाळीदरम्यान उपयोगी
पाळीदरम्यान जेव्हा पोटात दुखतं तेव्हा तुम्ही नेहमी गरम पाणी प्यावं. हे अतिशय फायदेशीर ठरतं. पोटदुखी यामुळे कमी होतं. जितक्या महिलांना पाळीच्या दिवसात पोटदुखीचा त्रास आहे त्यांनी नक्की हा उपाय करून बघावा. गरम पाणी हा उपाय यावर सर्वोत्कृष्ट आहे.
फोटो सौजन्य – Shutterstock
हेदेखील वाचा –
मातीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे
जाणून घ्या आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचं महत्त्व आणि योग्य पद्धत