DIY लाईफ हॅक्स

अंधश्रद्धा म्हणून नाही तर या कारणांसाठी घातला जातो काळा दोरा

Leenal Gawade  |  Dec 1, 2019
अंधश्रद्धा म्हणून नाही तर या कारणांसाठी घातला जातो काळा दोरा

हातात, गळ्यात किंवा पायात काळा दोरा अनेक जण घालतात. या मागे काही तरी अंधश्रद्धा असते हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. सर्वसाधारणपणे नजर लागू नये म्हणून काळा दोरा घालण्याचा सल्ला दिला जातो. पण अंधश्रद्धा म्हणून नाही तर काळा दोरा घालण्यामागे वैज्ञानिक कारणं आहेत. जर तुम्हालाही कोणी काळा दोरा बांधण्यास सांगितला असेल तर त्यामागे अंधश्रद्धाच नाही तर हे कारण असू शकते.

पूजेला बसताना नवराबायकोचं एकत्र बसणं मानलं जातं शुभ

 

 

काळा रंग मानला जातो अशुभ

Instagram

कोणत्याही शुभ प्रसंगी काळ्या रंगाचे कपडे घातल्यानंतर लोकं तुमच्याकडे संशयाच्या नजरेने पाहतात. कारण कोणत्याही चांगल्या कार्यक्रमात काळा रंग हा अशुभ मानला जातो पण ज्यावेळी तुम्हाला कोणाची नजर लागत असेल तर मात्र तुम्हाला काजळाचा काळा टिक्का लावला जातो. त्यामुळे काही अंशी काळा रंग हा शुभ आहे आणि काशी अंशी काळा रंग अशुभ

काळा रंग म्हणून फायदेशीर

Instagram

काळा रंग हा नेहमीच आपली नजर आकृष्ट करुन घेत असतो. जर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घातले असतील तर लोक तुमच्याकडे एकदा तरी बघतातच. अशावेळी त्यांच्या नजरेत जर नकारात्मक उर्जा असेल तर ती परतून लावली जाते. त्यामुळेच काळा रंग परिधान करा किंवा काळा रंग तुमच्याजवळ असू द्या असे म्हणतात. आपले शरीर पंच तत्वांनी बनलेले आहेच. पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या सगळ्यापासून शरीराला मिळणारी उर्जा अत्यंत लाभदायक असते. जर नकारात्मक उर्जा तुमच्यावर प्रहार करत असेल तर मात्र काळा रंग त्याच्यासमोर बाधा आणत उर्जा टिकवून ठेवतो असे म्हणतात. 

घरात राखायची असेल सुखशांती तर जाणून घ्या काय करायचे उपाय Vastu Tips For Home In Marathi

असे होतात काळ्या दोऱ्याचे फायदे

पोटदुखी कमी करण्यासाठी :काहींना काहीही कारण नसताना अचानक पोटदुखीचा त्रास होतो. पोटात कडमडून दुखू लागते. अशावेळी तुम्ही तुमच्या पायांच्या दोन्ही अंगठ्याना काळा दोरा बांधायला हवा. तुम्हाला आराम पडलेला त्वरीत जाणवेल. 

पैशासंबधीच्या समस्या करते दूर :आता हा मानो या ना मानो संदर्भातील इलाज आहे. असे म्हणतात जर तुम्हाला पैशांसंदर्भातील काही तक्रारी असतील तर तुम्ही तुमच्या पायांना काळा दोरा बांधायला हवा.तुमच्या पायांना काळा दोरा बांधल्याने तुमच्या पैशांसदर्भातील अनेक तक्राकी दूर होतात. तुमच्याकडील पैसा टिकून राहण्यास मदत होते. 

पायदुखी होते कमी:अनेकदा काहींना पाय दुखीचा त्रास असतो. सांधेदुखी किंवा तत्सम आजारांनी अनेक जण त्रस्त असतात अशांनी पायदुखी कमी करण्यासाठी डाव्या पायात काळ्या रंगाचा दोरा घालावा आराम पडतो. शिवाय जर तुमचे काम दिवसभर काम उभ्याने असेल तर तुम्ही काळ्या रंगाचा दोरा घातला तरी चालू शकेल तुम्हाला त्रास होणार नाही. 

काळ्या रंगाच्या दोऱ्याचे फायदे पाहता जर तुमच्याही मनात शंका असेल तर तुम्ही अंधश्रद्धा म्हणून नाही तर वैज्ञानिक कारणं समजून घेत हा दोरा बांधावा. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा. 

Read More From DIY लाईफ हॅक्स