लाईफस्टाईल

Wedding Season: ब्राईडने खरेदीचा असा करावा श्रीगणेशा

Leenal Gawade  |  Oct 19, 2021
लग्नाच्या खरेदीचा असा करा श्रीगणेशा

लग्नाचा सीझन आला की, खरेदीला जोरदार सुरुवात होते. मुलाच्या बाजूने इतका नाही पण मुलीकडच्यांची खरेदी खूप असते. त्यामुळे लग्नाची तारीख काढल्यानंतर नवऱ्या मुलीला खरेदी करावीच लागते. कारण नुसता लेहंगा, साडी किंवा लुक निवडून ठरवून चालत नाही तर त्या खरेदीला पटापट सुरुवात करावी लागते. पण तुमची लग्नाची तारीख काढल्यानंतर खरेदीला नेमकी कशी सुरुवात करावी हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला खरेदीचा श्रीगणेशा कसा करायचा ते जाणून घेऊया

ज्वेलरीची खरेदी

Instagram

लग्न म्हटलं की सोनं आलंच. जर तुम्हाला सोन्याची खरेदी करायची असेल तर ती सगळ्यात आधी करुन घ्या. कारण सोनं हे महाग असतं. तुम्ही जर आधी काही केलेलं नसेल तर तुम्हाला आयत्यावेळी करणं थोडं कठीण जाऊ शकतं.  त्यामुळे तुम्हाला ब्राईड म्हणून काय सोनं हवं आहे त्याची खरेदी करा. नथ, पैंजण, बांगड्या आणि हार याची खरेदी करायला घ्या. त्यापासून श्रीगणेशा करा. त्यामुळे तुम्हाला पुढच्या खर्चांचा अंदाज येईल.

साड्यांची खरेदी

मुली म्हटल्या की, साड्या आल्याच आणि त्यातही नवी नवरी असेल तर तिला पहिले काही दिवस नेसायला साड्या या हव्याच. अशावेळी लग्नानंतर केल्या जाणाऱ्या पूजेसाठी, नातेवाईकांकडे जाण्यासाठी साड्या घ्यायल्या हव्यात . त्यामुळे किमान 10 साड्यांची खरेदी तरी तुम्ही करायला हवी. साड्यांची खरेदी करताना त्यामध्ये कांजिवरम, पैठणी, सिल्क, लिनन, खादी अशा साड्यांचा समावेश असायला हवा. या साड्या तुम्हाला वेगवेगळ्या इव्हेंटला वापरता येतील अशा स्वरुपातील असायला हवा.  त्यामुळे साड्यांची खरेदी ही अगदी मस्ट आहे. त्याची सुरुवात लग्न ठरल्यापासून लगेचच करायला घ्या.

ब्लाऊज आणि पेटीकोट

Instagram

साड्या घेतल्यानंतर साड्यांना लागणारा ब्लाऊज आणि पेटीकोट हा फारच महत्वाचा आहे. कारण ही महत्वाची गोष्ट खूप जण विसरुन जातात. ब्लाऊज शिवणे आणि पेटीकोट शिवून घेणे खूप जणांना आवडते किंवा ते जास्त सोयीस्कर जाते. जर लग्नाच्या सीझनमध्ये तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल तर ब्लाऊज शिवण्यासाठी, टेलर निवडण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही तुम्हाला हवे असलेले ब्लाऊज त्याचे पॅटर्न आणि पेटीकोट शिवायला वेळ घ्या.  त्यामुळे आयत्यावेळी तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.

इमिटेशन दागिने

सोन्याच्या दागिन्याव्यतिरिक्त खूप जणांना इमिटेशन ज्वेलरी घालायला खूप आवडते. साडी किंवा ड्रेसवर तुम्ही अशा इमिटेशन ज्वेलरी घालू शकता. कानातले आणि गळ्यातले सेट घेऊन ठेवले तर ते पटकन घालता येतात. ते छानही दिसतात. जर तुम्ही अशा इमिटेशन ज्वेलरी घालणार असाल तर आतापासूनच तुम्ही त्याची खरेदी करायला घ्या. म्हणजे तुम्हाला हळुहळू त्याची खरेदी करता येईल. सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करताना ही त्याच्या योग्य डिझाईन्स निवडा

आता लग्न ठरल्यानंतर तुम्ही खरेदीचा असा श्रीगणेशा नक्की करा. म्हणजे तुमची आयत्यावेळी घाई होणार नाही. 

अधिक वाचा

पौष महिन्यात का करू नये लग्न…शास्त्र असतं ते!

खास कार्यक्रमांच्या हेअरस्टाईलसाठी निवडा ही सुंदर फुले

फुलांच्या डेकोरेशनच्या भन्नाट आयडियाज, वाचेल पैसा


Read More From लाईफस्टाईल