Bridesmaid Trends

लग्नाच्या साड्यांसाठी ठाण्यामधील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या (Wedding Shopping In Thane)

Dipali Naphade  |  Jun 2, 2019
लग्नाच्या साड्यांसाठी ठाण्यामधील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या (Wedding Shopping In Thane)

लग्नात नवरा नवरीची पसंती झाली की, सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नाच्या साड्या घेणं. साड्या आपल्याला हव्या तशा हव्या त्या ठिकाणी घेणं हे सर्वात मोठं टास्क सध्या असतं. मुंबईमध्ये दादर, हिंदमाता, मनिष मार्केट, घाटकोपर अशा अनेक ठिकाणी साड्यांची विविध दुकानं आहेत जिथे साड्या घेता येतात. पण ठाण्यावरून बरेचदा याठिकाणी केवळ साड्यांची खरेदी करण्यासाठी येणं बऱ्याच जणांना झेपत नाही. अशा लोकांसाठी ठाण्यामध्येही खूपच चांगले आणि तुमच्या खिशाला परवडतील असे पर्याय आहेत. आम्ही तुम्हाला ठाण्यात लग्नांच्या साड्यांसाठी कुठे खरेदी करायची हे सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला खरेदी करणं सोपं होईल. खरं तर ठाणे हे मुंबईचा भाग नसलं तरी मुंबईपासून केवळ पाऊण तासावर असणारा ठाणे जिल्हा हा खूपच मोठा आहे. ठाण्यामध्ये अगदी हजारो दुकानं आहेत जिथे तुम्ही खरेदी करू शकता. पण काही दुकानं अशीही आहेत, जिथे तुम्हाला तुमच्या लग्नासाठी काही वेगळ्या साड्या हव्या असतील तर तुम्ही या ठिकाणांहून त्याची खरेदी करा. जाणून घेऊया कोणती आहेत ही दुकानं आणि काय आहेत यांची वैशिष्ट्य पण त्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टीही गरजेच्या आहेत.

 

Table Of Contents

1. Things To Do Before Wedding

2. Famous Wedding Shops In Thane

3. प्राप्ती फॅशन्स (Prapti Fashions)

4. सावी सारीज (Saavi Sarees)

 

 

 

लग्नाची शॉपिंग कधी सुरू करावी ? (When To Start Shopping For Wedding)

लग्नाची तारीख ठरल्यावर लवकरात लवकर लग्नाची शॉपिंग सुरू केली तर नंतर धावपळ होत नाही. कारण लग्नाच्या इतर तयारीच्या गडबडीत नंतर तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी वेळ काढणं शक्य होत नाही. वधू आणि वराची खरेदी ही लग्नातील सर्वात महत्त्वाची खरेदी असते. यासाठीच लग्नाच्या आधी कमीत कमी चार ते पाच महिने खरेदी करण्यास सुरूवात करा. मात्र फार आधीदेखील खरेदी करू नका कारण फॅशनचा ट्रेंड सतत बदलत असतो. त्यामुळे तुमच्या लग्नादरम्यान कोणता ट्रेंड आहे याचा विचार करा.

वाचा – नागपूरात लग्नाची शॉपिंग करताय मग ‘या’ ठिकाणांना जरूर भेट द्या

लग्नाची खरेदी करताना काय काळजी घ्यावी ? (Things To Do Before Wedding)

लग्नाची खरेदी करण्यापूर्वी त्याचे व्यवस्थित नियोजन करा. कारण तुमचा लग्नसोहळा कसा आणि  किती दिवस असेल, कोणकोणत्या विधींना तुम्ही कोणता पेहराव करणार, लग्नात द्यायच्या भेटवस्तू काय असतील, इतर वस्तू आणि दागदागिने, हनिमुनसाठी खरेदी या गोष्टींचा व्यवस्थित लेखाजोखा तयार करा. एका वहीत त्याची नीट नोंद करा.  ज्यामुळे तुम्हाला कोणती खरेदी कुठे,कधी करायची आणि खरेदीचं बजेट ठरवणं सोपं जाईल.

लग्नाच्या कपड्यांची खरेदी करण्यासाठी ठाण्यातील प्रसिद्ध ठिकाणं (Famous Wedding Shops In Thane)

आता पाहूया आपण ठाण्यामध्ये अशी कोणती दुकानं आहेत, जिथे आपल्याला लग्नाच्या साड्यांची चांगली खरेदी करता येईल

1. कलामंदिर (Kalamandir – Best Wedding Wear Collection) 

कलामंदिर हे खरं तर साड्यांचं माहेरघर असं म्हटलं जातं. विविध रंगाच्या आणि विविध पद्धतीच्या साड्या तुम्हाला याठिकाणी मिळतात. लग्नाच्या साड्या म्हटलं की, प्रत्येकाला आपल्या लग्नात काहीतरी विविधता आणि वेगळेपणा हवा असतो. कलामंदिरमध्ये हा वेगळेपणा तुम्हाला नक्कीच मिळतो. आता केवळ साड्याच नाही तर लग्नामध्ये विविध तऱ्हेच्या लेहंग्याचीदेखील फॅशन आली आहे. इथे आता याचीदेखील खरेदी तुम्हाला करता येते. कलामंदिर हे पारंपरिकता आणि आधुनिकता याच्या मिश्रणासाठी प्रसिद्ध आहे. रंगसंगती आणि तुमच्या चेहऱ्याला नक्की काय चांगलं दिसेल हे तुम्हाला इथून नक्की मिळू शकतं. गढवाल सिल्क आणि कांजिवरम सिल्क साड्या ही इथली स्पेशालिटी आहे.

तसेच वधू विवाह बॅग बद्दल वाचा

दुकानाचा पत्ता – गोखले रोड, आईस फॅक्टरीच्या समोर, नौपाडा, ठाणे पश्चिम, ठाणे – 400602

संकेतस्थळ – https://kalamandir.com/

गांधी बाजाराबद्दलही वाचा

2. कलानिकेतन (Kala Niketan)

कलानिकेतनच्या अनेक ठिकाणी तुम्हाला शाखा मिळतील. त्यापैकी एक शाखा ठाण्यालाही आहे. कला निकेतनचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या मिळतात. अगदी लग्नाच्या साड्यांपासून ते मानपानाच्या साड्यांपर्यंत सर्व खरेदी तुम्ही या एकाच दुकानामध्ये करू शकता. नवरीच्या पारंपरिक साड्यांसाठी हे कलानिकेतन प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर लग्नसाठी भरजरी साड्या घ्यायच्या असतील तर कलानिकेतनसारखा दुसरा पर्याय नाही. या ठिकाणी तुम्हाला चांगल्या भरजरी साड्या मिळतील. शिवाय भरजरी लेहंगेदेखील मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कला निकेतनच्या विविध शाखा पसरलेल्या आहेत.

दुकानाचा पत्ता – चेंदणी नाका, स्टेशन रोड, ठाणे पश्चिम, ठाणे – 400601

संकेतस्थळhttps://kalaniketan.co/

3. पटेल साडी प्रा. लि. (Patel Saree Pvt. Ltd)

लग्नासाठी लागणारं साड्यांचं एक्स्क्लुझिव्ह कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळेल. पटेल साडी प्रा. लि. मध्ये तुम्हाला तुमच्या पसंतीने साड्या निवडता येतात. कारण इतर ठिकाणी मिळणाऱ्या साड्यांपेक्षा या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या प्रकारांमधील साड्या मिळतात. लग्नासाठी नेहमीच आपण वेगळ्या व्हरायटी शोधत असतो. इथे येऊन नक्कीच तुमचा तो शोध संपू शकतो. विविध प्रकारच्या वेगळ्या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला इथे मिळेल. ठाण्याला स्टेशन रोडलाच हे दुकान असल्यामुळे तुम्हाला जास्त प्रवासही करावा लागत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाजवी दरांमध्ये इथे साड्या मिळतात. अव्वाच्या सव्वा भाव इथे लावले जात नाहीत. लग्नाच्या वेळी अशी परवडणारी दुकानंच जास्त महत्त्वाची असतात.

दुकानाचा पत्ता – स्टेशन रोड, ठाणे पश्चिम, ठाणे – 400601

वाचा – डेस्टिनेशन वेडिंगसाठी महाराष्ट्रातील ही ’10’ ठिकाणं आहेत परफेक्ट

4. प्राप्ती फॅशन्स (Prapti Fashions)

नवरीसाठी सुटेबल आणि स्टायलिश साड्या आणि लेहंगा हवा असल्यास, इथे भेट द्यावी. काही मुलींना तयार लेहंगा फिट बसत नाहीत. त्यामुळे त्यांना शिऊन घ्यावा लागतो. शिऊन घेण्यासाठी हे दुकान परफेक्ट आहे. शिवाय इथे असणाऱ्या वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला कलेक्शनच्या प्रेमात पाडतात. साड्यांबरोबर तुम्हाला हल्ली वेगळे ब्लाऊज डिझाईन असतात. तेदेखील तुम्हाला याठिकाणी मिळतात. इथलं साडी आणि लेहंग्याचं कलेक्शन हे तुम्हाला प्रेमात पाडणारं आहे. त्यामुळे नक्की हे घेऊ की ते घेऊ अशी परिस्थिती बऱ्याच वेळा होते. पण लग्नासाठी खरेदी करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

दुकानाचा पत्ता – शॉप एस 18, कोरम मॉल, मंगल पांडे रोड, जे. के. ग्राम, ठाणे – 400606

5. सावी सारीज (Saavi Sarees)

साडीपेक्षाही हल्ली सर्वात पहिला प्रश्न उभा राहतो तो फॅशनेबल आणि स्टायलिश ब्लाऊज कुठे शिऊन मिळेल. साड्यांसाठी सावी सारीज प्रसिद्ध आहेच. पण तुम्हाला त्या साडीवर हवा तसा ब्लाऊज इथे शिऊन मिळतो. त्यामुळे इतर ठिकाणी शोधत फिरायची गरज भासत नाही. तुम्हाला एकाच ठिकाणी दोन कामं करून घेता येतात. स्टायलिश आणि फॅशनेबल साड्यांसाठी हे ठिकाणी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला हवा तसा लेहंगाही लग्नासाठी इथे मिळतो. लग्नाची खरेदी म्हटली की, डोक्यामध्ये खूप कल्पना आणि विविध गोष्टी असतात. त्यामुळे तुमच्या कल्पना इथे तुम्ही अस्तित्वात आणू शकता.

लग्नाच्या गाण्यांबद्दलही वाचा

दुकानाचा पत्ता – दुकान क्र. 2, विनायक सदन, गोखले रोड, केंब्रिजच्या समोर, नौपाडा, ठाणे पश्चिम, ठाणे – 400602

6. सोच (Soch)

कॉटन, शिफॉन अशा साड्यांसाठी जितकं सोच हे दुकान प्रसिद्ध आहे. तितकंच लग्नाच्या साड्यांसाठीही हे दुकान प्रसिद्ध आहे. बऱ्याचदा आपण लग्नासाठी काय नेसणार हे आपल्या डोक्यात पक्कं असतं. पण कितीही दुकानांमध्ये फिरलं तरी आपल्याला हवं तसं आपल्याला मिळत नसतं. पण सोचमध्ये हीच खासियत आहे की, तुम्ही विचार केल्याप्रमाणे डिझाईन्स आणि साड्या तुम्हाला मिळतात. इथे अक्षरशः साड्यांचा खजिना आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नावाप्रमाणेच ‘सोच’ हे साड्यांसाठी अप्रतिम ठिकाण आहे. अनेक व्हरायटी असल्यामुळे तुम्हाला हवं तसं कलेक्शन तुम्हाला इथे मिळतं.

दुकानाचा पत्ता – विवियाना मॉल, FF – 36, 1 ला मजला, पोखरण रोड क्र. 2, सुभाष नगर, ज्युपिटर रूग्णालयाच्या पुढे, ठाणे पश्चिम, ठाणे – 400610

7. वस्त्रम (Vastram)

लग्नाच्या साड्यांसाठी ठाणे स्टेशनपासून जवळ असणारं हे दुकान तुम्हाला नक्कीच आकर्षित करतं. या ठिकाणी विविध व्हरायटीच्या साड्या तर मिळतातच. पण वधूसाठी लागणाऱ्या भरजरी साड्यांची यांची रेंज खूपच वेगळी आणि चांगली आहे. ट्रेंडनुसार डिझाईनर साडी, वर आणि वधूचे कपडे, मेन्स वेअर खरेदी करू शकता.

दुकानाचा पत्ता – दुकान क्र. 26, इमराल्ड प्लाझा, लोकपुरम कॉम्प्लेक्सच्या समोर, ब्लॉक – 3, पोखरण रोड, ठाणे पश्चिम, ठाणे – 400601

वाचा – लग्नासाठी शॉपिंग करताय, मग या ‘15’ गोष्टी जरूर लक्षात ठेवा

8. रूपम (Roopam)

रूपम हे नाव साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या दुकानाच्या अनेक शाखा आहेत. त्यापैकी एक शाखा ठाण्यातही आहे. रूपममध्ये सर्व प्रकारच्या साड्या मिळतात. तसेच इथल्या साड्या हे शोरूम जरी मोठं दिसत असलं तरीही वाजवी दरात मिळतात. हेच याचं वैशिष्ट्य आहे. सिल्क, एथनिक, कॉटनचे पारंपरिक कपडे या ठिकाणी मिळतात. तसंच आता डिझाईनर साड्यांना खूपच मागणी आली असली तरीही आपली पारंपरिकता जपत विविध साड्या याठिकाणी तुम्हाला मिळतात.

दुकानाचा पत्ता – 4, खुशबू अपार्टमेंट, लोकमान्य नगर, ठाणे पश्चिम, ठाणे – 400601

9. शॉपर्स स्टॉप (Shoppers Stop)

केवळ वधूचेच नाही तर वराचे कपडेही तुम्हाला याठिकाणी खरेदी करता येतील. काही वर्षांमध्येच शॉपर्स स्टॉपने आपलं एक नाव कमावलं आहे. ठाण्यातही याची एक शाखा आहे. जी तुम्हाला विवियाना मॉलमध्ये सापडेल. इतकंच नाही तर तुम्ही लग्नासाठी घेत असलेल्या साड्या आणि लेहंग्यावर लागणाऱ्या सर्व गोष्टीही तुम्हाला या एकाच ठिकाणी मिळतील. अगदी त्यावरील डिझाईनर दागिने ते मॅचिंग चप्पल्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला याठिकाणी सहज मिळतील. इतर ठिकाणांपेक्षा कदाचित तुम्हाला इथली किंमत जास्त वाटण्याची शक्यता आहे. पण थोडे जास्त पैसे मोजलेत तर तुम्हाला अतिशय चांगल्या गोष्टी इथे मिळतील.

दुकानाचा पत्ता – GF-11, विवियाना मॉल, पाचपाखाडी, ज्युपिटर हॉस्पिटलच्या पुढे, पूर्वगती महामार्ग, ठाणे – 400606

10. रूपाली सेशन शॉप (Rupali Session Shop)

लग्नासाठी लागणाऱ्या साड्या निवडणं खरं तर कठीण काम. पण त्याहीपेक्षा दुकान निवडणं हे कठीण काम आहे. पण एकाच ठिकाणी तुम्हाला हव्या तशा साड्या मिळणार असतील तर तुमच्या डोक्यावरील ताण नक्कीच कमी होतो. रूपाली सेशन शॉपमध्ये तुम्हाला हव्या तशा लग्नाच्या साड्या आणि लेहंगा मिळतात. त्यामुळे तुम्ही तुम्हाला हवं त्याप्रमाणे इथे खरेदी करू शकता.

दुकानाचा पत्ता – दुकान क्र. 1, दादा पाटीलवाडी, नौपाडा रोड, गोखले रोड, ठाणे पश्चिम, ठाणे – 400601

शॉपिंग करताना नक्की खायचं कुठे? (Best Food Stall & Resturants In Thane)

लग्नाच्या साड्यांची खरेदी म्हटलं की,  पूर्ण दिवस तुमचा यामध्ये जातो. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला भूक लागत नाही. खरेदी करून करून इतकं थकायला होतं की, दुप्पट भूक लागते. अशावेळी ठाण्यामध्ये खाण्यासाठी नक्की चांगली आणि वेगळी ठिकाणं कोणती आहेत, हेदेखील आम्ही तुम्हाला सांगतो –

1. मामलेदार मिसळ (Mamledar Misal)

ठाण्याला आल्यानंतर मामलेदार मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही काहीच केलं नाही. ठाण्यातील मामलेदार मिसळ ही अतिशय चविष्ट मिसळ आहे. ही मिसळ खूपच प्रसिद्ध आहे. थकल्यानंतर ही झणझणीत मिसळ खाल तर तुमचा सगळा थकवा नाहीसा होईल. मिसळीची चव तशीच तोंडावर ठेऊन पुन्हा नव्याने खरेदी करायला तुम्हाला नक्कीच उत्साह येईल.

2. कुंजविहार वडापाव (Kunjvihar Vada Pav Shop)

वडापाव हा तर शॉपिंग करताना खाण्याचा ‘मस्ट हॅव’ पदार्थ आहे. ठाण्यातील कुंजविहार वडापाव अतिशय प्रसिद्ध आहे. नेहमीच्या पावापेक्षा इथल्या वडापावचा आकार मोठा असतो. एक वडापाव खाऊनच तुमचं पोट आणि मन दोन्ही भरतं. खरेदी करून करून लागलेली भूक इथल्या वडापावाने नक्कीच शमते

3. फडतरे मिसळ केंद्र (Phadatare Misal Kendra)

फडतरे मिसळ केंद्रदेखील इथे प्रसिद्ध आहे. कायमस्वरूपी तुम्हाला या केंद्रावर गर्दी दिसते. कारण इथल्या मिसळीची चव. या चवीसाठी तुम्ही कितीही वेळ उभं राहायला तयार होता. खरेदी करून प्रचंड भूक लागली असेल तर या फडतरे मिसळ केंद्राला नक्की भेट द्या. इथल्या मिसळीच्या चवीने तुमचा थकवा निघून जाईल.

4. प्रशांत कॉर्नर (Prashant Corner)

तुम्हाला जर पूर्ण जेवायचं नसेल आणि संध्याकाळचा स्नॅक्स पण अगदी चविष्ट स्नॅक्स हवं असल्यास, प्रशांत कॉर्नरला नक्की भेट द्या. समोसा आणि अन्य फरसाण गोष्टी तुम्हाला इथे खूपच चांगल्या मिळतात. याशिवाय तुम्हाला जर बंगाली मिठाई आणि अन्य मिठाईचाही स्वाद घ्यायचा असल्यास, प्रशांत कॉर्नरशिवाय दुसरा पर्याय नाही.

5. बार्बेक्यू नेशन (Barbeque Nation)

तुम्हाला खरेदी केल्यानंतर खूपच भूक लागली असेल आणि पूर्ण जेवण्याची इच्छा असेल तर बार्बेक्यू नेशन हा चांगला पर्याय तुमच्याजवळ आहे. पोटभर जेवून तुम्ही तुमची भूक शमवू शकता आणि पुन्हा खरेदीसाठी एक नवा उत्साह घेऊन इथून बाहेर पडू शकता.

फोटो सौजन्य – Instagram 

Read More From Bridesmaid Trends