आरोग्य

थंडीमुळे सुकलं असेल नाक तर करा हे उपाय

Trupti Paradkar  |  Nov 11, 2021
थंडीमुळे सुकलं असेल नाक तर करा हे उपाय

हिवाळ्यात वातावरण कोरडे झाल्यामुळे आणि वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो. थंडीत बऱ्याच जणांचे नाक यामुळे सुकते आणि नाकाच्या समस्या निर्माण होतात. सर्दी, खोकला, ताप येण्याचे हे एक मुख्य कारण असू शकते. कारण नाक सुकल्यामुळे इनफेक्शन होण्याचा धोका वाढतो. नाकातून सतत खाज येण्यामुळे सतत नाकाकडे लक्ष जातं आणि काम करणं कठीण होतं. यासाठीच जाणून घ्या नाक सुकण्याचे कारण आणि घरगुती उपाय

नाकातून पाणी येणे घरगुती उपाय (Nakatun Pani Yene Upay)

थंडीत सुकत असेल नाक तर करा हे घरगुती उपाय

काही सोपे आणि घरगुती उपाय करून तुम्ही हिवाळ्यात नाक सुकण्याच्या समस्येवर घरीच उपाय करू शकता. 

वाफ घ्या 

नाक सुकण्यामुळे त्रस्त झाला असाल तर नियमित वाफ घ्या. कारण वाफ घेतल्यामुळे तुमच्या नाकाला आराम मिळतो आणि श्वास घेण्यास त्रास होत नाही. यासाठी तुम्ही फेशिअल स्टीमचा वापर करू शकता अथवा एखाद्या मोठया भांड्यात पाणी गरम करून त्याने वाफ घ्या. वाफ घेताना नेहमी डोक्यावरून टॉवेलने चेहरा झाका ज्यामुळे नाकाला आणि चेहऱ्याला चांगली वाफ मिळेल. शिवाय वाफ सहन होईल इतकीच घ्या. उगाचच त्रास होईल इतपत वाफ घेणे योग्य नाही. 

चेहऱ्यावर वाफ घेण्याचे फायदे (Vaf Ghenyache Fayde In Marathi)

नेझल स्प्रे

हिवाळ्यात सतत नाक सुकण्याचा अथवा चोंदण्याचा त्रास होत असेल तर डॉक्टराच्या सल्ला घ्या आणि नेझल स्प्रे वापरा. कारण त्यामुळे श्वसनमार्ग पुन्हा ओलसर होईल आणि तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होणार नाही. दुधात भिजवून खा खजूर… कमी होईल सर्दी, खोकला, बद्धकोष्ठतेचा त्रास

बदामाचे तेल लावा 

नाक सुकण्यावर उत्तम उपाय म्हणजे नाकाच्या आतून बदामाचे तेल लावणे. बदामाच्या तेलामध्ये त्वचेचं पोषण करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या नाकातील त्वचेला उत्तम पोषण आणि ओलावा मिळतो. कापसाच्या मदतीने तुम्ही नाकाच्या आतून बदामाचे तेल नियमित लावू शकता. मात्र लक्षात ठेवा नेहमी झोपताना नाकात तेल घाला ज्यामुळे तुम्हाला शांत झोप मिळेल. बदामाच्या तेलाप्रमाणेच नारळाचे तेल, शुद्ध तूपही नाकात घालणे फायद्याचे ठरेल.

भरपूर पाणी प्या 

पाणी कमी प्यायल्यामुळे हिवाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होतो. ज्यामुळे तुमचे नाक थंडीत सुकण्याची शक्यता असते. यासाठीच शरीराला पाण्याची गरज आहे हे ओळखून नियमित पाणी प्या. थंडीत गारव्यामुळे जास्त तहान लागत नाही आणि पाणी कमी घेतले जाते. यासाठी या काळात सतत कोमट पाणी पिण्याची सवय लावा. 

नाक अथवा कान टोचण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी

Read More From आरोग्य