आरोग्य

दातांच्या स्वच्छतेसाठी वापरत असलेला टुथब्रश योग्यवेळी बदला, नाहीतर…

Leenal Gawade  |  Jul 27, 2021
टुथब्रश बदलताना

 दातांच्या आरोग्यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. असं तुम्हाला कोणी सांगितलं तर त्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. कारण चांगला आहार घेतला की, आरोग्य चांगले राहते हे आपण जाणतो. पण ज्या मार्गे अन्न पोटात जातो तो मार्ग म्हणजेच मुखं, तोंड स्वच्छ नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. कारण तोंड खराब असले की, तोंडातून वास येणे (tondacha vas ka yeto), दांतावर प्लॅक साचणे, दात-दाढा किडणे असे वेगवेगळे त्रास होऊ लागतात. दातांच्या या समस्या होऊ नये म्हणून दात स्वच्छ ठेवणे फारच गरजेचे असते. दातांच्या बाबतीत तुम्ही हलगर्जीपणा करत असाल तर तुम्ही या सगळ्यांना असेही आमंत्रण देत आहात. दातांसाठी वापरत असलेला ब्रश तुम्ही योग्यवेळी बदलत आहात की नाही हे देखील तितकेच महत्वाचे आहेत. नाहीतर…

दात स्वच्छ होत नाही

ब्रश खूप महिने वापरत असाल तर तो नक्कीच खराब होतो. त्याच्यावरील ब्रिसल्स हे वाकडे होऊ लागतात.त्यामुळे दातांमधून अन्नकण काढून टाकण्यास असे ब्रश असक्षम ठरतात. जर तुम्ही वापरत असलेला ब्रश असा दिसत असेल तर अजिबात हा ब्रश वापरु नका. कारण त्यामुळे तुम्हाला अपेक्षित असलेली दातांची स्वच्छता मुळीच होणार नाही. खूप जण ब्रश काय बदलायची गरज असे समजून जी गोष्ट सगळ्यात महत्वाची ती बदलायला पाहात नाही. नको त्या गोष्टी बदलण्यासाठी पैसे खर्च करतात. पण असे करु नका.ब्रशवरील ब्रिसल्स वाकडे होऊ लागले किंवा साधारण दोन महिन्यांनी ब्रश बदला. 

वॉशिंग मशिन घेण्याआधी जाणून घ्या टॉप लोड की फ्रंट लोड मधील फरक

दातांतून येऊ शकते रक्त

सतत एखादी गोष्ट वापरल्यामुळे ती राठ, रुक्ष होऊ शकते. आता ब्रशवर सतत पेस्ट लावल्यामुळे आणि दात घासल्यामुळे आधीच ब्रशचे ब्रिसल्स हे वाकडे होतात.शिवाय ते हळुहूळ राठ होऊ लागतात. ब्रशच्या बुडाशी पेस्ट तशीच साठून राहते. त्यामुळे असे ब्रश वापरल्यामुळे हिरड्यांमधून रक्त येऊ शकते. असे ब्रश हे दातांच्या आरोग्यासाठी चांगले नाहीत. तोंड येणे, जीभ फाटणे, हिरड्या सुजणे असे त्रास यामुळे होऊ शकतात.

दात किडण्याची शक्यता

जर तुम्ही योग्यवेळी ब्रश बदलला नाही तर दात किडण्याची शक्यता ही देखील जास्त असते. ब्रश हा तुमच्या दोन दातांच्या फटीमध्ये जाऊन तुमच्या दातांमधील अडकलेली घाण काढून टाकण्यास समर्थ असतो. पण तुमचा ब्रश जुना झाला असेल तर त्यामुळे दातांच्या फटीत अडकलेली घाण मुळीच काढता येणार नाही. ती घाण तशीच राहिली तर दात किडण्याची शक्यता असते. त्यामुळे दात किडू द्यायचे नसतील तर दातांसाठी वापरत असलेला ब्रश योग्यवेळी बदला.

टुथब्रश घेण्याआधी या गोष्टी ठेवा लक्षात

सौजन्य : Instagram

१. कोणताही टुथब्रश घेण्याआधी त्याचे ब्रिसल्स तपासा. तुमच्या दातासांठी हार्ड ब्रिसल्स अजिबात चांगले नाही. त्यामुळे हिरड्यांना दुखापत होऊ शकते. 

२. दातांचा ब्रश निवडताना तुम्हाला तो किती मोठा आहे तो पण बघा. खूप मोठ्या ब्रँडचे ब्रश हे थोड मोठे असतात. जे काहींना तोेंडात घालतानाही अडथळा येत नाही . कारण खूप मोठे ब्रश असतील तर त्याचा खूप त्रास होतो. 

३. ब्रश हे कायम टिकणारे नसतात त्यामुळे ते योग्यवेळी बदलणेच चांगले असते.

आता टुथब्रश वापरताना या गोष्टी ठेवा लक्षात. 

Read More From आरोग्य