लाईफस्टाईल

सेक्स मिथ आणि सत्यता (Sex Myth And Facts)

Leenal Gawade  |  Aug 1, 2022
सेक्स मिथ आणि सत्यता

 सेक्ससंदर्भात आधीच फार बोलले जात नाही. त्यात माहिती हवी असेल तर अनेकदा इंटरनेटचा आधार घेतला जातो. नाहीतर एखाद्याचा अनुभव ऐकून आपण अगदी त्याचप्रमाणे करायला बघतो. सेक्स हे प्लेझर आहे. पण त्याचा आनंद सगळ्यांनाच सारखा घेता येत नाही. याचे कारण प्रत्येकाला काहीना काही अडचणी यात येत असतात. सध्याची लाईफस्टाईल पाहता खूप जणांना सेक्ससंदर्भात अनेक समस्या असल्याचे दिसून येते. त्यातच जर एखाद्याला पालक व्हायची इच्छा असेल तर अशावेळी वेगवेगळ्या आणि चुकीच्या गोष्टींवर विश्वासही ठेवला जातो. सेक्ससंदर्भात अशीच काही मिथक आहेत (Sex Myth And Facts) ज्यात किती सत्यता आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊया सेक्स मिथ आणि सत्यता 

अधिक वाचा:जोडीदाराच्या उंचीमुळे सेक्स करताना समस्या येतात का, घ्या जाणून

अनप्रोटेक्टेड सेक्स केल्यानंतर ते धुवून टाकल्यानंतर प्रेग्नंसी होत नाही 

खूप जोडप्यांना असे वाटते की, अनप्रोटेक्टेड सेक्स  हे सेफ असते. जर तुम्ही सेक्सनंतर म्हणजे महिलेने तिची व्हजायना स्वच्छ केली किंवा चांगली धुतली तर गर्भघारणा होण्याची शक्यता नसते. असा विचार तुम्हीही करत असाल तर असे अजिबात नाही. कारण तुमच्या लघवीची जागा आणि गर्भाशयाच्या पिशवीकडे जाणारी जागा ही वेगळी असते. अनप्रोटेक्टेड सेक्स  केल्यानंतर जर पुरुषाचे वीर्य आत गेले असेल तर ते पाण्याने स्वच्छ करता येत नाही. कारण तुमच्या गर्भाशयात आधीच त्यांनी प्रवेश केलेला असतो. त्यामुळे ही चूक करत असाल तर ती आताच सुधारा 

गर्भघारणा हवी असेल तर सेक्सनंतर काही काळ तसेच पडून राहावे

गर्भधारणा होत नसेल तर अशा महिलांना वेगवेगळ्या ट्रिक्स सांगितल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे सेक्स झाल्यानंतर पाय वर करुन काही काळासाठी झोपणे. पण असे शक्य होत नाही. कारण एवढ्या वेळ त्याच पोझीशनमध्ये पडून राहणे हे खूप जणांना आवडत नाही. त्यातच जर वीर्य लीक झाले असेल तर तो भाग चिकट लागणे स्वाभाविक आहे. अशावेळी तुम्ही लगेच उठून जर ती जागा स्वच्छ केली तर अधिक चांगले. कारण अनेकदा युरिनरी डिसेस (Urinary infection) त्यातूनच होण्याची शक्यता असते. युरिन इन्फेक्शन टाळायचे असेल तर महिला आणि पुरुष या दोघांनीही स्वच्छता राखणे फार महत्वाचे असते. असे केले नाही तर त्या ठिकाणी खाज येणे असे काही त्रास होऊ लागतात.

गर्भधारणेसाठी ओव्ह्युलेशनचा काळ अधिक महत्वाचा असतो.

हो, ही अगदी खरी गोष्ट आहे. गर्भधारणेसाठी ओव्ह्युलेशनचा काळ हा अत्यंत महत्वाचा असतो. मासिक पाळीनंतर 11 व्या दिवसापासून ते अगदी 17 व्या दिवसापर्यंत हा काळ असतो. हल्ली असे किट मिळतात. ज्यामुळे तुमचा ओव्ह्युलेशनचा काळ आहे की, नाही याची माहिती मिळते. या काळात गर्भधारणा होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे या काळात केलेले सेक्स हे अधिक फायद्याचे ठरु शकते. ज्यांना योग्य वेळी आई व्हायचे आहे. 

सेक्स पोझीशन बदलत राहिल्याने अधिक सुख मिळते

फोटो प्रातिनिधीक आहे

 ही गोष्टही अगदी खरी आहे. सेक्समध्ये प्लेझर ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची असते. जोडीदाराला आणि तुम्हाला सेक्सचा आनंद हवा असेल तर त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पोझीशन ट्राय करायला हव्यात असे केल्यामुळे तुमचा सेक्सटाईम हा वाढतो. शिवाय वेगवेगळ्या पोझीशनमुळे नक्कीच आनंद मिळतो. 

पॉर्नमधील सेक्स खरे सेक्स असते

नाही, असे अजिबात नाही. पॉर्न हे तुमच्यामधील सेक्सची उत्तेजना वाढवण्यासाठी असते. पण हल्ली लोकं इतकी पॉर्न पाहतात की, त्यांना असे वाटू लागते की, समोर दाखवले जात आहे ते खरे सेक्स आहे. त्यामुळे होते असे की, खूप वेळा सेक्स करताना अनेक जण नाजूकता आणि त्यामधील प्रेम विसरतात. सेक्स ही अनुभवण्याची भावना आहे. त्याचा पॉर्नशी काहीही संबंध नाही. 

Read More From लाईफस्टाईल