Care

तुमच्या केसांना का आहे को-वॉशिंगची गरज, जाणून घ्या फायदे

Trupti Paradkar  |  Mar 7, 2022
तुमच्या केसांना का आहे को-वॉशिंगची गरज, जाणून घ्या फायदे

आज माझे केस छान दिसावेत हे तुमच्या कितीही मनात असलं तरी केस ऐनवेळी कसे दिसतील हे कुणीच सांगू शकत नाही. महत्त्वाच्या दिवशी केस अतिशय खराब दिसल्याचा अनुभव आजवर अनेकांनी घेतला असेल. केस धुतल्यानंतर पहिल्या अथवा दुसऱ्या दिवशी बरे दिसतात. पण हे नेहमीच घडेल असंही सांगता येत नाही. यासाठी केस कसे धुवावेत आणि केसांची निगा कशी राखावी हे प्रत्येकीला माहीत असायला हवं. केस धुण्याची नवी पद्धत को – वॉशिंगमुळे तुमच्या काही समस्या नक्कीच कमी होतात. यासाठी जाणून घ्या पद्धत आणि फायदे

को- वॉशिंग म्हणजे काय

को – वॉशिंगचे म्हणजे केस कंडिशनरने धुणे. कारण आजकाल बऱ्याच शॅम्पूमध्ये हार्श केमिकल्स असतात. सल्फेट आणि पेराबेन हे घटक शॅम्पूसाठी गरजेचे असले तरी तुमच्या केसांसाठी हानिकारक ठरू शकतात. कारण या केमिकल्समुळे केस स्वच्छ होतात पण केसांमधील नैसर्गिक तेल आणि ओलावा कमी करतात. वास्तविक केस धुण्यासाठी शॅम्पू गरजेचा आहेच त्यामुळे आपण शॅम्पू वापरणं कमी करू शकत नाही. कंडिशनरमुळे फक्त केस मऊ आणि चमकदार होतात. पण केसांची मुळं स्वच्छ करण्यासाठी शॅम्पू लागतोच यासाठी सर्वात आधी केस कंडिशनरने मऊ करायचे आणि मग शॅम्पू वापरायचा ही पद्धत म्हणजे को- वॉशिंग. सोबतच शॅम्पूचा वापर तुम्ही आठवड्यातून एकदा अथवा दोनदाच करायचा बाकीचे दिवस केसांना फक्त कंडिशनर लावून केस धुवायचे. ज्यामुळे केस जास्त कोरडे होणार नाहीत. यासाठी घरी स्वतःच तयार करा तुमच्या केसांसाठी कंडिशनर (Homemade Hair Conditioner In Marathi)

को- वॉशिंगचे फायदे

को- वॉशिंगसाठी सर्वात आधी तुमचे केस पाण्याने ओले करा. त्यानंतर केसांच्या टोकांना कंडिशनर लावा आणि केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. जर केस खूप चिकट आणि तेलकट झाले असतील तरच केसांना शॅम्पू लावा आणि स्काल्प स्वच्छ करा. को- वॉशिंग केस स्वच्छ आणि चमकदार करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. जर तुमचे केस कुरळे अथवा वेव्ही असतील तर तुम्ही केसांवर को-वॉशिंग नक्कीच करू शकता. मात्र यासाठी वापरण्यात येणारे कंडिशनर जास्त हेव्ही नसेल लाईटवेट असेल याची काळजी घ्या. केस निरोगी राहावेत यासाठी को-वॉशिंग केल्यावर हेअर सीरम लावा. ज्यामुळे केसांचा ओलावा आणि चमक टिकून राहिल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Care