Care

ड्राय शॅम्पू म्हणजे काय, तो कसा वापरावा

Vaidehi Raje  |  Apr 7, 2022
dry shampoo

ड्राय शॅम्पू हे केसांसाठी वापरले जाणारे उत्पादन आहे जे तुमच्या केसांमधील तेल, चिकटपणा आणि घाण कमी करण्याचा दावा करते. ओले शॅम्पू आणि कंडिशनर वापरण्यासाठी आपल्याला केस आधी ओले करावे लागतात आणि मग धुवावे लागतात. पण ड्राय शॅम्पू हे केस कोरडे असताना  केसांना लावले जाऊ शकतात म्हणून त्यांना ड्राय शॅम्पू असे म्हणतात. ड्राय शॅम्पू लावल्यावर तुम्हाला तुमचे केस धुण्याची गरज नाही. ड्राय शॅम्पू हे बऱ्याचदा स्प्रे स्वरूपात असतात आणि ते आपण टाळूवर स्प्रे करायचे असतात. काही लोक व्यायाम केल्यानंतर केस धुवायला वेळ नसेल तर ते तेलकट आणि चिकट दिसू नयेत म्हणून किंवा सलूनमध्ये ब्लो ड्राय केलेले केस जास्त काळ सुंदर दिसावेत म्हणून ड्राय शॅम्पूची मदत घेतात. काही लोक  Oily Scalp आणि कोंड्यापासून वाचण्यासाठी अनेक घरगुती उपाय देखील करतात.

ड्राय शॅम्पू कसा काम करतो? 

Dry Shampoo

आपली टाळू ही केसांच्या फॉलिकल्सने झाकलेली असते. हे फॉलिकल्स फक्त केस उगवण्याचे काम करत नाहीत तर ते सिबम देखील तयार करतात. सिबम हे नैसर्गिक तेल आपल्या त्वचेत तयार होते जे आपली टाळू सॉफ्ट ठेवते आणि केसांना एक विशिष्ट टेक्श्चर देते. सेबम आणखी एक महत्त्वाचा उद्देश पूर्ण करते. ते म्हणजे तुमचे केस मऊ करते आणि त्याखालील त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते. पण जेव्हा तुम्ही व्यायाम करत असाल किंवा बाहेर उन्हात किंवा प्रदूषण असलेल्या ठिकाणी असाल किंवा दिवसभर फिरत असाल तेव्हा तेल आणि घाम तुमच्या केसांमध्ये जमा होतो. तुमच्या डोक्यावर काही प्रमाणात तेल असणे सामान्य असले तरी, जास्त प्रमाणात तेल स्त्रवले तर तुमचे केस चिकट, तेलकट व निस्तेज दिसतात. 

रोज केस रोज धुणे, ब्लो-ड्राय करणे आणि स्टाईल करणे वेळखाऊ असू शकते. तसेच रोज रोज केस धुणे हे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी देखील चांगले नाही. पण जर आपल्याला चिकट तेलकट केस नको असतील तर अशा वेळी ड्राय शॅम्पू आपल्या मदतीला धावून येतो. ड्राय शॅम्पूमध्ये अल्कोहोल किंवा स्टार्च- बेस्ड सक्रिय घटक असतात जे केसांमधील तेल आणि घाम शोषून घेतात. तुमच्या केसांमधून तेल शोषले गेल्याने ते अधिक स्वच्छ दिसतात. बर्‍याच ड्राय शॅम्पूमध्ये नैसर्गिक किंवा कृत्रिम सुगंधही मिसळलेला असतो ज्यामुळे तो केसांवर स्प्रे केल्यावर केसांना सुगंध येतो व आपल्यालाही फ्रेश वाटते.

ड्राय शॅम्पू कसा वापरावा 

तुम्ही ड्राय शॅम्पू कसा वापरावा हे तुमच्या केसांचा प्रकार कोणता आहे, केसांचे टेक्श्चर कसे आहे, केसांची लांबी आणि तेलकटपणा यावर ठरते. ड्राय शॅम्पू वापरण्यासाठी केस कोरडे असले पाहिजेत. केसांवर ड्राय शॅम्पू स्प्रे करताना केसांमध्ये कोणत्याही पिना, रबरबँड वगैरे लावलेल्या नसाव्यात. ड्राय शॅम्पूचा कॅन तुमच्या डोक्यापासून 6 इंच दूर धरा आणि थोड्या प्रमाणात थेट केसांच्या मुळांमध्ये स्प्रे करा.तसेच कानांच्या वर, डोक्याच्या मागच्या बाजूला, आणि मानेच्या बाजूलाही स्प्रे करा. त्यानंतर बोटांनी केसांना मसाज करा.तुम्हाला बाऊन्सी लूक हवा असेल तर ड्राय शॅम्पू स्प्रे केल्यावर केसांवर ब्लो ड्रायरमधून थंड हवा ब्लो करा. यानंतर केस तुम्हाला हवे तसे स्टाईल करा. 

ड्राय शॅम्पूचे काय तोटे आहेत

Dry Shampoo

ड्राय शॅम्पू जर तुम्ही कमी प्रमाणात वापरत असाल तर त्याचे फारसे तोटे नाहीत. व्यायामानंतर केस धुण्यासाठी वेळ नसेल तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ड्राय शॅम्पू वापरत असाल तर त्याचे नकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवणार नाहीत. पण सलग दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस ड्राय शॅम्पू वापरल्याने तुमच्या टाळूची जळजळ होऊ शकते किंवा टाळू कोरडी पडू शकते. ड्राय शॅम्पूमुळे टाळूच्या त्वचेचे पोअर्स ब्लॉक होऊ शकतात त्यामुळे टाळूवर वेदनादायक मुरुम किंवा पुरळ येऊ शकते.

इमर्जन्सीसाठी कधीतरी ड्राय शॅम्पू वापरण्यात काही गैर नाही पण त्याचा अतिवापर करणे योग्य नाही. 

Photo Credit- istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Care