आरोग्य

फर्टिलिटी टेस्ट (Fertility Test) म्हणजे काय माहीत आहे का, प्रत्येक महिलेने हे वाचावेच

Leenal Gawade  |  Sep 28, 2021
जाणून घ्या काय आहे फर्टिलिटी टेस्ट

आई होणे हे प्रत्येक महिलेचे स्वप्न असते. लग्नानंतर अगदी विनासयास आई होण्यास कोणालाही आनंद देणारे असते. पण सध्याचे वातावरण पाहता खूप जणांना आई होण्यास अडथळे निर्माण होतात. आई होणे हे स्त्री- पुरुष या दोघांच्या हाती सर्वस्वी असते. त्यामुळे त्याचा दोष एकालाच देऊन चालत नाही. विज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. तुम्ही आई- बाबा होण्याची शक्यता वर्तवणारी किंवा तुमच्या शारीरिक क्षमता सांगणारी अशी ही फर्टिलिटी टेस्ट नावाने ओळखली जाते.  फर्टिलिटी टेस्ट म्हणजे काय हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही त्याची माहिती नक्की वाचायला हवी. खरंतर प्रत्येक महिलेसाठी ही माहिती फारच उपयोगाची आहे जाणून घेऊया या विषयी अधिक 

गरोदरपणात भेडसावणाऱ्या चिंता आणि भीती (Anxiety) वर कशी कराल मात

फर्टिलिटी टेस्ट (Fertility Test) म्हणजे काय?

आता सगळ्यात आधी कोणालाही प्रश्न पडेल तो म्हणजे ही टेस्ट कशासाठी केली जाते. फर्टिलिटी टेस्ट ही शरीरातील FSH (follicle stimulating hormones) तपासण्यासाठी केली जाते.  तुमच्या गर्भाशयात  म्हणजेच ओव्हरीजमध्ये किती फर्टिलिटी एग्ज किती आहे ते तपासण्यासाठी केली जाते. जसे वय वाढते तसे याचे प्रमाण कमी होऊ लागते.  पिट्युटरी ग्लँड्समधून ओव्हरीजमध्ये बीजांडे यांची निर्मिती होत असते. त्याचे प्रमाण किती हे जाणून घेण्यासाठीच ही चाचणी करावी लागते. अनेकदा आई होऊ इच्छिणाऱ्या जोडप्याला अगदी सहज मुलं होत नसतील तर त्यांना अशी टेस्ट किंवा चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो.

कशी करावी फर्टिलिटी टेस्ट (Fertility Test)  

गायनॅकलॉजिस्टकडे गेल्यानंतर जर तुम्हाला अशी टेस्ट म्हणजेच फर्टिलिटी टेस्ट (Fertility Test)  करण्याचा सल्ला दिला असेल  तर हल्ली घरीच करण्यासाठी असा किट मिळतो. त्यावर लघवीचे थेंब घालून ही टेस्ट केली जाते. त्यावरुन तुमचा फर्टिलिटी रेट काढला जातो. ज्यामुळे तुमची आई होण्याची क्षमता कळते.

घरी आणून टेस्ट करताना बराच वेळ द्यावा  लागतो ही चाचणी समजून घेणे गरजेचे असते. FSH किट घरात मागून घेतल्यानंतर तुम्ही त्याची योग्य माहिती घेऊन मगच ती करायला हवी. प्रेग्नंसी टेस्ट सारखा हा किट असतो जो वापरणे सोपे असते. पिरेड्सच्या तिसऱ्या दिवशी ही चाचणी करता येते. प्रत्येक महिन्यात यामध्ये बदल होऊ शकतात.

STD ( Sexually Transmitted Diesease) ज्यामुळे शरीरात अनेक बदल होतात. शरीर संबध असताना हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे फर्टिलिटी रेट कमी होण्याची शक्यता असते. याचे निदान योग्य झाले तरी देखील तुम्हाला फर्टिलिटीची क्षमता करु शकते.त्यासाठी खास ब्लड टेस्ट कराव्या लागतात. 

आता तुम्हीही नक्की करुन घ्या फर्टिलिटी टेस्ट

Read More From आरोग्य