Care

न्यूट्रलाईझिंग शॅम्पू म्हणजे काय, केव्हा करावा त्याचा वापर

Vaidehi Raje  |  May 23, 2022
neutralizing shampoo

आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी सर्वोत्तम शॅम्पू निवडणे कधीही सोपे नसते. हल्ली अनेक ब्रँड्सच्या शॅम्पूजची मोठी रेंज बाजारात उपलब्ध आहे. इतकंच नाही तर नेहमीच्या शॅम्पू व्यतिरिक्त आजकाल न्यूट्रलायझिंग शॅम्पू देखील बाजारात पाहायला मिळतात. त्यांच्या नावात तर फरक आहेच पण या दोन प्रकारच्या शॅम्पूची केसांवर काम करण्याची पद्धतही वेगळी आहे. सामान्यतः न्यूट्रलाइजिंग शॅम्पू म्हटल्यावर लोक थोडे गोंधळतात. याचा नेमका उपयोग काय असा प्रश्न पडतो. आपल्या रेग्युलर शॅम्पू आणि न्यूट्रलायजिंग शॅम्पू यातील फरक जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तर जाणून घ्या न्यूट्रलायझिंग शॅम्पू आणि रेग्युलर शॅम्पू यातील फरक काय आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या केसांसाठी योग्य शॅम्पू निवडू शकाल. 

रेग्युलर शॅम्पू कशासाठी असतो 

आपले केस नियमित धुण्यासाठी रेग्युलर शॅम्पूचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्या स्कॅल्प आणि केसांचा प्रकार कुठला आहे हे लक्षात घेऊन तुम्ही स्वतःसाठी योग्य शॅम्पू निवडू शकता. उदाहरणार्थ, जर तुमची टाळू कोरडी असेल आणि तुम्हाला कोंडा होण्याची समस्या असेल, तर तुम्हाला अँटी डँड्रफ शॅम्पू वापरणे आवश्यक असते. तसेच जर तुम्ही हेअर कलर केला असेल किंवा केसांवर कुठली ट्रीटमेंट केली असेल किंवा केस हायलाईट केले असतील तर त्यासाठी खास तयार केलेला शॅम्पू तुम्हाला वापरावा लागतो. रेग्युलर शॅम्पूचे काम आहे की टाळू व केस स्वच्छ करणे, केसांमधील अतिरिक्त तेल, कोंडा, घाण, धूळ काढून टाकणे. 

What Is Neutralizing Shampoo

रेग्युलर शॅम्पूमध्ये कोणते घटक असतात  

रेग्युलर शॅम्पूमध्ये केस व टाळू स्वच्छ करण्यासाठी विविध घटक आणि कठोर रसायने वापरली जातात. यामुळे तुमचे केस तर स्वच्छ होतात, परंतु त्याचा जास्त वापर केल्याने केस कोरडे होतात. हे तुमच्या केसांमधून नैसर्गिक तेल काढून टाकू शकते. म्हणून, जर तुम्ही नियमितपणे केस धुवत असाल तर ऑरगॅनिक आणि नैसर्गिक घटक असलेले शॅम्पू शोधा ज्यामध्ये कोणतेही कृत्रिम रंग किंवा सुगंध नसतील.

What Is Neutralizing Shampoo

न्यूट्रलायजिंग शॅम्पू कशासाठी असतो 

न्यूट्रलायजिंग शॅम्पू हे अधिक प्रोसेस्ड आणि सॅच्युरेटेड शॅम्पू आहेत. त्यांचे मुख्य काम म्हणजे तुमच्या केसांची पीएच पातळी राखणे. तुम्ही नियमितपणे  हेअर प्रोडक्ट्स आणि हेअर रिलेक्सर्स वापरत असल्यास, तुम्हाला न्यूट्रलायजिंग शॅम्पू वापरण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या केसांमध्ये केमिकल प्रॉडक्ट्स वापरता तेव्हा ते तुमच्या केसांच्या पीएच पातळीवर परिणाम होतो. आणि ठराविक वेळेनंतर केसांची पीएच पातळी राखली नाही तर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे केस तुटू किंवा गळू शकतात.

न्यूट्रलायजिंग शॅम्पू का आवश्यक आहे

काही हेअर केअर प्रॉडक्ट्स स्वच्छ पाण्याने आणि रेग्युलर शॅम्पूने निघत नाहीत. आणि त्यांचे अवशेष केसांमध्ये राहतात. केसांची पीएच पातळी राखण्यासाठी तसेच केसांमधील व स्कॅल्पवरील बिल्टअप काढून टाकण्यासाठी न्यूट्रलायजिंग शॅम्पू आवश्यक आहे. 

केसांसाठी न्यूट्रलायजिंग शॅम्पू चांगले आहेत का 

न्यूट्रलायजिंग शॅम्पू केवळ विशिष्ट परिस्थितीतच तुमच्या केसांसाठी चांगला असतो. कारण हा सर्व प्रकारच्या केसांना चालणारा सामान्य शॅम्पू नसतो. जेव्हा तुम्ही रिलॅक्सर वापरता किंवा केसांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांचा तुमच्या केसांवर प्रयोग करता किंवा  तुमच्या केसांमध्ये क्षारता जास्त असल्यास तुमच्यासाठी न्यूट्रलायजिंग शॅम्पू आवश्यक आहे. यामुळे तुमच्या केसांना अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या केसांचा pH संतुलित राहतो,  केस तुटणे कमी होतो व केसांचा कोरडेपणा दूर होतो.  केस मऊ आणि निरोगी राहतात. 

तुमचे केस अल्कधर्मी असतील तरच त्यांचा वापर करणे योग्य आहे. तसेच, ते कधीही रेग्युलर शॅम्पू म्हणून वापरू नयेत.

Photo credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Care