लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील फार महत्वाचा असा क्षण आहे. लग्न जुळताना आपला जोडीदार योग्य असावा. त्याचे ग्रहमान आपल्याशी जुळते असावे असे खूप जणांना वाटते. लग्नाच्या गाठी जुळण्यासाठी ग्रह ताऱ्यांची दिशा, राशी आणि त्यांचे अनुमान हे अनुकूल असतील तरच संसार सुखाचा होतो. असा खूप जणांचा विश्वास आहे. काही बाबतीत या गोष्टी खऱ्या आहेत असेही म्हणावे लागते. ग्रह- तारे यांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी किंवा त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी योगायोगाच्या गोष्टी या फार महत्वाच्या असतात. लग्न जुळवताना पत्रिका जुळते की, नाही हे पाहणाऱ्यांमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला षडाष्टक योग याची संपूर्ण माहिती असायला हवी. षडाष्टक योग म्हणजे काय? तो कसा ओळखायचा? त्याचे फायदे- तोटे काय याची माहिती आपल्याला असायला हवी. दोन ग्रह जेव्हा एकत्र येत असतात. तेव्हा त्यातून चांगले आणि वाईट असे फलित निघत असते. लग्न कुंडलीत असलेली ही षडाष्टक जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत.
षडाष्टयक योग म्हणजे काय?
षडाष्टयक या शब्दाची फोड केली तर षड + अष्टक असा होतो. याचा अर्थ 6 आणि 8 असा आपण प्रमाण मराठीमध्ये म्हणू शकतो. आता याचे मुल्यमापन कसे करावे असा विचार करत असाल तर षड आणि अष्टक असे करताना एखादी रास ही दुसऱ्या राशीपासून सहाव्या आणि आठव्या स्थानावर येत असेल तर त्या ठिकाणी षडाष्टयक योग होतो असे समजावे.
राशीचक्रातील पहिली रास ही मेष असेल तर त्यापासून येणारी सहावी रास कन्या रास येते. कन्या राशीला पहिल्या स्थानावर ठेवले तर मेष रास ही आठव्या स्थानावर येते. अशाप्रकारे षडाष्टक योग हा बनत असतो. एका राशीपासून दुसरी रास ही सहा आणि आठ याच्या घरात असायला नको. कारण अशा ठिकाणी षडाष्टक योग बनत असतो.
उदा. मिथुन आणि वृश्चिक
कर्क आणि धनु
सिंह आणि मकर
कन्या आणि कुंभ
तुळ आणि मीन
वृषभ आणि तुळ
राशीचक्रातील या राशी एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या स्थानावर आहे. या ठिकाणी षडाष्टक योग होतो.
अधिक वाचा: शनि ग्रहाला शांत करण्यासाठी हे ठरेल फायद्याचे, नक्की वाचा
षडाष्टक योगाचे दोन प्रकार
षडाष्टयक योग म्हणजे काय हे जाणून घेतल्यानंतर या योगाच्या दोन प्रकारांविषयीही माहिती घेणे गरजेचे आहे. षडाष्टयक योगाचे दोन प्रमुख प्रकार म्हणजे
1. मृत्यूषडाष्टयक 2. प्रितिषडाष्टयक
मृत्यूषडाष्टक योग : या दोन प्रमुख प्रकारांबद्दल सांगायचे झाले तर याच्या नावांवर तुम्ही अजिबात जाऊ नका. मृत्यूषडाष्टकाचा मृत्यूशी काहीही संबंध नाही हे जाणून घ्या. हा प्रेम, भावना यांच्याशी संबधित असल्यामुळे या भावनांचा यात अंत होतो. म्हणून याला मृत्यूषडाष्टक असे म्हणतात. असा योग बनत असेल तर या राशीच्या लोकांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही. एक उत्तर तर दुसरा दक्षिण अशी या व्यक्तिंची अवस्था असते. काहीही केले तरी या योगाचे लोक एकमेकांशी पटवून घेत नाहीत. अशांची मुळात पत्रिकाच जुळत नाही. पत्रिकेत असा योग असेल तर असे लग्न मुद्दाम करु नये.
प्रितिषडाष्टक योग : दुसरीकडे प्रितिषडाष्टक याचा विचार केला तर असा योग पत्रिकेत संभवत असेल तर लग्न करता येऊ शकते. दोघांमध्ये कुरबुरी झाल्या तरी देखील लग्न जुळवून ठेवण्याची क्षमता दोघांमध्येही असते. त्यामुळे हे लग्न टिकून राहण्यास मदत मिळते. अशा व्यक्ती या लग्न करु शकतात.
षडाष्टक योगाची माहिती घेतल्यानंतर लग्नासंदर्भातील तुमच्या शंका नक्कीच दूर झाल्या असतील. या शिवाय लग्नाची कुंडली पाहताना नेमके काय करावे याची माहितीही अवश्य घ्या
अधिक वाचा : वैवाहिक जीवनात असेल तणाव तर शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी हे करा