वेकेशनवर जाणं म्हणजे प्रत्येकासाठी आनंदाचे क्षण असतात. कामासाठी, घरासाठी मेहनत केल्यावर वर्षातून एक ते दोन वेळा असा छोटा ब्रेक प्रत्येकाला हवा असतो. दिवाळीनंतर अथवा उन्हाळी सुट्टीत संपूर्ण फॅमिलीसोबत वेकेशनचे प्लॅन आखले जातात. तुम्ही देखील अशा एखाद्या फॅमिली वेकेशनचा बेत करत असाल तर त्याआधी तुम्हाला घरात या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. कारण वेकेशनसाठी चार-आठ दिवस जर तुम्ही घराबाहेर जाणार असाल वेकेशनच्या पॅकिंगसोबत या गोष्टी करणं गरजेचं आहे.
100+ Trekking Quotes In Marathi | Travel Quotes In Marathi
वेकेशनवर जाण्याआधी अशी घ्या घराची काळजी
घरातील सर्व मंडळी जेव्हा एखाद्या ठिकाणी वेकेशनवर जातात तेव्हा घर बंद ठेवावं लागतं. मग पुन्हा जेव्हा तुम्ही घरी परत येता तेव्हा त्रास होऊ नये यासाठी या गोष्टी वेकेशनवर जाण्याआधीच करायला हव्या.
- घरातील सर्व वीजेची उपकरणं स्वीचबोर्डपासून वेगळी करा आणि मेन स्वीच बंद करायला विसरू नका. घरातून बाहेर पडण्यापूर्वी एखादा रिमांडर लावून ही गोष्ट करा यामुळे विजेची बचत होईलच शिवाय तुम्ही घरात नसताना कोणतीही दुर्घटना होणार नाही. तसंच प्रवासाचा बेत आखताय मग पाहा ही नाशिक पर्यटन स्थळे (Nashik Tourist Places In Marathi)
- बाथरूम, टॉयलेट, किचन, बाल्कनी अशा ठिकाणी असलेले सर्व नळ नीट बंद करा. एखादा नळ लिक असेल तर घराचा मुख्य नळ बंद करा.
- जास्त दिवस घराबाहेर जाणार असाल तर फ्रिजमधील सर्व साहित्य काढून टाका आणि फ्रिजचे तापमान वाढवा ज्यामुळे फ्रिजमध्ये बर्फ साठणार नाही.
- किचनच्या ओटा आणि बेसिनमधील खरकटी भांडी स्वच्छ करा नाहीतर त्यावर जीवजंतू निर्माण होतील आणि घरात दुर्गंध निर्माण होईल.
- घराच्या सर्व खिडक्या, दरवाजे नीट बंद आहेत का हे तपासा.
- गॅस कनेक्शन बाहेर जाण्यापूर्वी बंद करा.
- झाडांना जाण्यापर्वी सतत पाणी देण्यासाठी पाण्याच्या बाटल्या गुंडाळून एखादी सुतळ त्यामध्ये सोडा ज्यामुळे काही दिवस ठिंबक सिंचन पद्धतीने झाडांना पाणी मिळेल.
- घरात साचलेला कचरा जाण्यापूर्वी बाहेर टाका नाहीतर त्या कचऱ्याला वास सुटेल आणि त्यात झुरळ आणि जीवजंतू निर्माण होतील.
- घराचे लॉक नीट बंद केले आहे का ते तपासा. सिक्युरिटी उपकरणे सुरू आहेत याची काळजी घ्या आणि मगच घराबाहेर पडा.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे (Historical Tourist Places In Maharashtra In Marathi)