घर कसे असावे? यावर प्रत्येकाची मत वेगवेगळी असते. घर बांधताना घरात कोणतीही बाधा येऊ नये याची काळजी आपण घेतो. घरात कोणत्याही अडचणी येऊ नये म्हणून आपण घरात पूजा घालतो. अनेक जण वास्तुशास्त्रानुसार दिशांप्रमाणे घरात बांधकाम करुन घेतात. पण एकदा का घर बांधून झालं की काही छोट्या छोट्या चुका करुन आपण घरात नकारात्मक उर्जा ओढवून घेतो. काही सोप्या गोष्टी तुम्ही लक्षात धेतल्या तर तुमच्या घरात कायम आनंद आणि सकारात्मक उर्जा राहील. आपल्या घरात असलेले दरवाज्यांच्या मागे आपण अनेकदा कोणाला दिसत नाही म्हणून कपडे किंवा सामनाच्या पिशव्या लावून ठेवतो. तुम्ही असे करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा.
दाराच्या मागे नसावी अडगळ
दाराच्या मागे अडगळ का नसावी ते घेऊया जाणून
- दाराच्या मागे जर तुम्ही बाहेर घातलेले घामाचे कपडे लावत असाल तर आताच तसं लावणं बंद करा . कारण तुमच्या घामाच्या कपड्याने घरात एक उदास वातावरण तयार होते. घरात किंवा रुममध्ये एक नकारात्मक उर्जा असल्यासारखे जाणवते.
- दारामागे कपडे लावलेले अनेकदा आपण काढत नाही. कपड्यांचा त्या मागे ढिग साचत राहतो. घरी कोणी आल्यानंतर कपड्यांचा ढिग दिसला तर तुम्हाला कसे वाटते? आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. दारामागील अडगळ ही आपल्या घरातील अशांतवृत्ती आणि गचाळपणा दर्शवते. त्यामुळे दारामागे कपडे लावत असाल तर ते कमी करा. त्यावर कपड्यांचा ढिग साचू देऊ नका.
- असं म्हणतात आपल्या घरात लक्ष्मीचा संचार सतत सुरु असतो. विशेषत: तिन्ही सांजेला आपल्या घरात लक्ष्मी येते. तिने घरात येण्यासाठी मार्ग मोकळा असायला हवा. दारामागे अडगळ असेल तर दरवाजा पूर्णपणे उघडा राहत नाही. दरवाजा उघडायला अडचण असल्यासारखी वाटते. त्यामुळे तुम्ही दारामागून अडचण काढा.
- दारामागे खूप जणांना प्लास्टिकच्या पिशव्या जमवायची सवय असते. तुम्हीही अशाप्रकारे प्लास्टिकच्या पिशव्या किंवा आणलेले काय काय मागे लावून ठेवत असाल तर तुम्ही ते काढून टाका. कारण त्यामुळे घरात नकारात्मक उर्जा राहते.
- मोडलेले तुटलेली भांडी किंवा अशा काही तुटलेल्या वस्तू तुम्ही दाराच्या मागे अजिबात ठेवू नका. कारण त्यामुळेही घरात नकारात्मक उर्जा राहते.
घरात ठेवा आनंदी आनंद
घरात आनंद टिकवण्यासाठी खूप मोठ्या उपायांची किंवा काही खर्च करण्याची गरज नसते. आनंदी राहणे हे केवळ आपल्या हातात असते. त्यामुळे घरात काय करावे ते जाणून घेऊया.
- घरात जागच्या वस्तू जागी ठेवा.
- किचनमध्ये कचरा खूप साचू देऊ नका. कारण त्यामुळे नकारात्मक उर्जा निर्माण होते.
- घऱात एखाद्या गोष्टीवरुन भांडण झाले असेल तर तो राग रुसवा विसरुन तुम्हाला घराचे काम नीट करता यायला हवे. घरातील इतर कोणतीही काम अडवून धरता कामा नये.
- घातलेले घाणेरडे कपडे अडचणीत ठेवू नका. ते वेळच्या वेळी धुवून घ्या
आता घरातील दरवाज्यामागे काहीही ठेवू नका. थोडे मोकळी जागा असू द्या.
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade