बॉलीवूड

सैफ आणि करिनाच्या दुसऱ्या बाळाचं काय असणार नाव, केला खुलासा

Trupti Paradkar  |  Dec 10, 2020
सैफ आणि करिनाच्या दुसऱ्या बाळाचं काय असणार नाव, केला खुलासा

करिनाची प्रेगनन्सी हा सध्या सोशल मीडियावरील एक चर्चेचा विषय आहे. कारण सैफ अली खान आणि करिना कपूर लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहेत. नवीन वर्षी फेब्रुवारीमध्ये करिनाच्या आणि सैफच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. करिना तिच्या प्रेगनन्सीमधील डाएट, फॅशन, स्टाईल, वर्क बॅलेन्स यासोबत आणखी बऱ्याच गोष्टींसाठी सध्या चर्चेत आहे. दररोज तिचे प्रेगनन्सीमधील स्टायलिश लुक ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या करिनाबाबत सुरू असलेली महत्त्वाची चर्चा म्हणजे तिच्या दुसऱ्या बाळाचं नाव काय असणार, कारण करिनाने याबाबत नुकताच एक मोठा खुलासादेखील केला आहे.

करिनाने दुसऱ्या बाळाच्या नावाबाबत केला खुलासा –

करिना कपूरने नुकताच तिच्या व्हॉट वुमेन वॉन्ट या शोमधील एका एपिसोडमध्ये तिच्या दुसऱ्या बाळाच्या नावाबाबत एका गोष्टींचा खुलासा केला आहे. या एपिसोडमध्ये तिच्या सोबत अभिनेत्री नेहा धुपियासोबत होती आणि तिने करिनाला प्रश्न विचारला की, तुझ्या दुसऱ्या बाळाचं काय नाव असेल ? हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं की, करिनाच्या पहिल्या बाळाच्याबाबत म्हणजेच तैमूरच्या नावावरून अनेक वाद झाले होते. त्यामुळे ती आता तिच्या दुसऱ्या बाळाच्या नावाबाबत काय विचार करत आहे हे चाहत्यांना नक्कीच जाणून घ्यायचं होतं. मात्र करिनाने यावर उत्तर दिलं की, तैमूरच्या वेळी वादानंतर आता आम्ही आमच्या दुसऱ्या बाळाच्या नावाचा अजून काहीच विचार केलेला नाही. करिना आणि सैफ त्यांच्या दुसऱ्या बाळाचं नाव सर्वांना बाळाच्या जन्मानंतरच सांगणार आणि सरप्राईझ देणार असं त्यांचं प्लॅनिंग आहे. त्यावर नेहाने तिला वादविवाद टाळण्यासाठी एक सल्ला दिला. नेहा म्हणाली की तू सरळ तुझ्या बाळाच्या नावासाठी लोकांकडून पोल घेऊ शकतेस. ज्यामुळे तुला बाळाच्या नावाचे अनेक पर्याय मिळतील. त्यावर करिना म्हणाली की मला आता यावर विचार करायचा नाही. मी आणि सैफ या गोष्टीचा सामना मी बाळ झाल्यावर करू.

करिना कधी होणार आहे पुन्हा आई

करिना आणि सैफने ते दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत ही गुडन्यूज चाहत्यांना ऑगस्टमध्ये दिली होती. सैफच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केली होती.  करिना गरोदर झाली तेव्हा लॉकडाऊन सुरू होतं. मात्र नंतर गरोदरपणाच्या  पाचव्या महिन्यानंतरही करिनाने तिची लॉकडाऊनमध्ये राहिलेली सर्व कामं प्रामाणिकपणे पूर्ण केली. मागच्याच महिन्यात तिने अमिर खानसोबत लाल सिंह चड्डाचं शूटिंग पूर्ण केलं. इतर कामे आणि फोटोशूटही ती लागोपाठ करताना दिसत होती. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यावर ती सैफ आणि तैमूरसोबत त्यांच्या पतौडी हाऊसमध्ये वेकेशनवर गेली होती. तिथे काही दिवस आराम केल्यावर काही दिवसांपूर्वीच सैफ,करिना आणि तैमूर हिमाचल प्रदेशमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसले होते. हिमाचलमध्ये सैफच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं त्यावेळी करिना आणि तैमूर त्याच्यासोबत तिथे गेले होते.   पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान करिना तिच्या दुसऱ्या बाळाची आई होणार आहे. त्यामुळे आता  ती  हा गरोदरपणाचा काळ आनंदात आणि मजेत घालवत आहे.  

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

Bigg Boss14 : राहुल, निकी, अली गोनी येणार परत, सुत्रांनी दिली माहिती

गायिका सावनी रविंद्र असा करणार 2020 चा सांगितीक शेवट

प्रियांकाचा आनंद गगनात मावेना, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळणार गुडन्यूज

Read More From बॉलीवूड