Mythology

तुम्हालाही स्वप्नात दिसतात या गोष्टी… जाणून घ्या त्याचा अर्थ

Leenal Gawade  |  Sep 5, 2019
तुम्हालाही स्वप्नात दिसतात या गोष्टी… जाणून घ्या त्याचा अर्थ

 

स्वप्न पाहायला कोणाला आवडत नाही. जे प्रत्यक्षात कधी होऊ शकत नाही त्या सगळ्या गोष्टी स्वप्नात पूर्ण होत असतात. त्यामुळेच अनेकांना स्वप्न पाहायला आवडतात. पण काही स्वप्न अशी असतात की ज्यामुळे तुमची झोपही उडते. तुम्हालाही स्वप्नात कधी कधी अशा गोष्टी दिसतात त्यांचा तुमच्या वास्तवाशी काहीच संबंध नसतो. पण त्या तरी तुमच्या स्वप्नात वारंवार दिसतात. या गोष्टी दिसण्यामागेही काही कारणं आहेत. जाणून घेऊयात तुमच्या स्वप्नात दिसणाऱ्या या गोष्टींचे अर्थ

आनंदी राहण्यासाठी डोक्यातील ‘डिलीट’ बटणाचा करा वापर

स्वप्नांमध्ये प्राणी दिसणे

shutterstock

 

अनेकांना स्वप्नांमध्ये प्राणी दिसतात म्हणजे कुत्रा, मांजर, मोर, हत्ती, साप, पाल, गरुड, बेडुक, मधमाशी, मुंग्या असं बरचं काही दिसतं. या प्रत्येक प्राण्यामागे काही तरी अर्थ दडलेला आहे तो जाणून घेऊया.

वाचा – ट्रेडींग कुत्र्याची नावे मराठी

मुंगी दिसणे:

मुंग्या या चिकाटीचे प्रतिक आहे. तुम्हाला स्वप्नात सतत मुंग्या दिसत असतील तर तुम्ही काहीतरी मोठे करण्याचा प्रयत्न करत आहात. आणि समजा या मुंग्या तुमच्या सतत अंगावर चढून तुम्हाला चावत आहेत असा भास तुम्हाला होत असेल तर कोणती तरी गोष्ट तुम्हाला नक्कीच सलत आहे.

 मांजर दिसणे:

काहींना स्वप्नात हमखास मांजर दिसते. आता मांजर हे अध्यात्माचे प्रतिक आहे. शिवाय ते महिलाशक्तीचे प्रतिक आहे. जर तुमच्या स्वप्नात येत असेल तर तुमच्या आयुष्यात फार मोठे रहस्य आहे. तर पांढरीशुभ्र मांजर हे अध्यात्माचे प्रतीक आहे. इतर कोणत्याही मांजर तुमच्या स्वप्नात येत असतील तर ते तुमच्या आरामदायी आयुष्याचे प्रतीक असते.

कुत्रा दिसणे:

आता तुम्ही डॉग पर्सन असाल किंवा नसाल जर तुमच्या स्वप्नात कुत्रा येत असेल तर कुत्रा हे मैत्री आणि निष्ठेचे प्रतीक आहे. जर तुम्हाला स्वप्नात भुंकणारा कुत्रा दिसत असेल तर तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यांना कळू शकते. जर तुम्हाला स्वप्नात कुत्रा तुम्हाला चावत आहे असे दिसत असेल तर याचा अर्थ तुम्हाला कोणतीतरी गोष्ट खुपत आहे. तुम्हाला काहीतरी फारच मनाला लागले आहे.  या शिवाय तुम्हाला स्वप्नात कुत्रा दिसत असेल आणि तुम्ही त्याच्यासोबत आनंदी असाल तर तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याची चांगली संधी मिळणार आहे.

स्वप्नात हत्ती दिसणे: 

काहींना स्वप्नात अगदी हमखास हत्ती दिसतो. हत्ती शक्ती, सार्वभौमत्व आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. जर तुमच्या स्वप्नात सतत हत्ती दिसत असेल तर तुम्हाला काहीतरी महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष देण्याची फारच गरज आहे. जर तुम्ही हत्तीवर आरुढ असल्याचे तुम्हाला दिसत असेल तर याचा अर्थ तुम्ही सगळी जबाबदारी घेणारे आहात किंवा तुमच्यावर सगळे अवलंबून आहेत.

गरुड दिसणे:

जर तुम्हाला स्वप्नात गरुड दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की, तुम्ही स्वतंत्र विचाराचे आहात. तुम्हाला स्वप्नात आकाशात उंच भरारी घेणारा गरुड दिसत असेल तर तुमची स्वप्न मोठी आहेत आणि तुम्हाला उंच उडायचे आहेत. जर तुम्हाला गरुड पिंजऱ्यात अडकलेले दिसत असेल तर याचा अर्थ तुम्हाला नात्यात कोणीतरी बांधून ठेवले आहे.

साप दिसणे:

अनेक जण सापाला घाबरतात पण त्यांच्या स्वप्नात साप आल्यानंतर मात्र खूप घाबरायला होते. साप तुमच्या स्वप्नात येत असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवायला नको. साप हे निसर्गाशी निगडीत असतात. त्यांना वातावरणातील बदल लगेचच कळू शकतो. त्यामुळे त्यांचे तुमच्या स्वप्नात दिसणे काही तरी नक्कीच सांगत असते. साप कात टाकत असेल तर  तुम्हाला फार एकटे वाटत आहे.

मोर दिसणे :

मोर पाहायला कोणाला आवडत नाही. पण मोर दिसणे हे अति आत्मविश्वास  आणि अहंकार दर्शवतो. तुम्हाला तुमच्या स्वप्नात मोर दिसू लागला की, तुम्ही समजून जा तुम्ही निरर्थक आत्मविश्वासात आहात. ज्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. योग्यवेळी काही गोष्टी नीट करण्याची तुम्हाला गरज आहे.

पाल दिसणे:

स्वप्नात काही जणांना पाल दिसण्याचेही तुम्ही ऐकले असेल. जर तुमच्या स्वप्नात आलेली पाल तुमच्यापासून लांब पळत असेल तर याचा अर्थ तुम्ही कोणत्या तरी गोष्टीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असाल. जर पाल तुम्हाला चावण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही काही गोष्ट करण्याच प्रयत्न करत असाल तर तुम्ही थांबायला हवे.जर तुम्हाला झाडावर पाल दिसत असेल तर तुम्ही तुमचे आखलेले बेत करु शकता.

डिटॉक्स वॉटरचे फायदे आणि बनवण्याची पद्धत

स्वप्नात मृत्यू दिसणे

 

अनेकांना स्वप्नात काही तरी वाईट घटना दिसत असते. ही वाईट घटना अनेकदा मृत्यू असते. म्हणजे काहींना स्वत:चा किंवा जवळच्या एखाद्या व्यक्तीचा अगदी हमखास मृत्यू दिसतो. असं स्वप्न पाहिल्यानंतर कोणालाही झोप पुन्हा लागणे कठीणच आहे म्हणा पण तुमच्या या स्वप्नामागेही काही अर्थ आहे.  याचा अर्थ एखाद्याच्या मृत्यूशी नसतो तर तुम्हाला अशा गोष्टी दिसू लागल्या की, समजून जावे आयुष्यातील कशाचा तरी अंत जवळ आलेला आहे.

उदा. एखादे नाते तुटणे,  मनात सुरु असलेली चिंता सोडवण्याचा प्रयत्न करणे, एखाद्या गोष्टीचा शेवट करण्याचा श्री गणेशा करणे असा याचा सर्वसाधारण अर्थ आहे

स्वप्नात सेक्स दिसणे

shutterstock

 

आता तुम्ही म्हणाल सेक्स ही तर चांगली भावना आहे. सुप्त मनात जोडीदारासोबत वेळ घालवायला मिळत नसल्यामुळे झोपेत कदाचित ही भावना मनात निर्माण होत असेल आणि त्यामुळेच तुमच्या स्वप्नात सेक्स येत असेल, असे तुम्हाला वाटत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. तुमच्या स्वप्नात सेक्स येण्याचा अर्थ तुम्ही अस्वस्थ आहात. तुम्ही एकटे आहात. तुमचे तुमच्या व्यक्तीसोबतचे अंतर तुम्हाला त्रास देत आहे. म्हणूनच तुम्हाला असे स्वप्न दिसू लागत. यात वासना नसते. तर प्रेम असते. पण ही प्रेम मिळवण्याची धडपड सेक्सकडे स्थिरावते. कारण सेक्सच्या अवस्थेत मिळणारा आनंद हा परमोच्च आनंद असतो.

झोपेत रडणे

 

अनेकांना असे काही स्वप्न पडते की, ते झोपेतून रडतच उठतात. त्यांना उठल्यानंतर इतकं वाईट वाटतं की, त्यांना पुन्हा झोप येत नाही. सतत ते का रडत होते याचा विचार करत राहतात. तुमच्या स्वप्नातही असेच काही येत असेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. कारण तुमच्या आयुष्यात सगळे काही चांगले होणार आहे. तुम्ही जर नोकरी, व्यवसायात चिंतीत असाल तर तुमचे प्रस्न सुटणार आहेत असा याचा अर्थ आहे.

Bra-Myths: ब्रा च्या बाबतीत या 9 गोष्टी आहे एकदम चुकीच्या

 

जर तुम्हालाही स्वप्नात या गोष्टी दिसत असतील तर त्याचा तुमच्या आयुष्याशी जवळचा संबंध आहे.

Read More From Mythology