नात्यात गैरसमज निर्माण झाला की, असे नाते टिकवणे फारच कठीण जाते. कधी कधी काही नाती ही तोडता येणे कठीण असते. विशेषत: बाळ झाल्यानंतर नाते पटकन तोडणे कठीण जाते. हल्ली खूप जणांचे नाते हे अगदी लग्नाच्या काहीच वर्षात अशा अवस्थेत येऊन पोहोचते की, एकमेकांशिवाय राहू न शकणारे एकमेकांचे तोंड बघणेही नापसंत करतात. कितीही जणांनी समजावले तरी देखील दोन व्यक्की काही केल्या समजून घेण्याच्या मन: स्थितीत नसतात. समजावून सांगण्यासाठी अशी व्यक्ती लागते जी तुम्हाला समजून घेऊ शकते आणि तुमची चुकी न दाखवता तुम्हाला एकत्र आणण्यासाठी मदत करते. मॅरेज कॉऊन्सिलर हे तुमच्या नात्यात आलेल्या दुराव्याबद्दल जाणून घेते आणि तुम्हाला योग्य असा सल्ला देते.
अधिक वाचा : मानसिक आरोग्य आणि वंध्यत्व
मॅरेज कॉऊन्सिलर काय करतात?
एखादी केस ज्यावेळी घटस्फोटासाठी कोर्टाकडे येते त्यावेळी घटस्फोट हा अगदी पटकन आणि सहजासहजी दिला जात नाही. नाते टिकवून ठेवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातो. मॅरेज कॉऊन्सिलअर हे काही सेशन्स घेतात. ज्यामध्ये तुमच्या मूळ समस्येला सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा या काही सेशन्स आणि थेरपीचा उपयोग हा खूप जणांना होतो. त्यामधील वाद हा बऱ्यापैकी आटोक्यात आणण्यात मदत होते. या व्यक्ती खास सायकोलॉजी ( Psychology) मधील तज्ज्ञ असतात. त्यांना अगदी बोलण्यावरुन आणि हालचालीवरुनही बऱ्याच गोष्टी कळून येतात.
तुमच्या नात्यात कधी आहे या कॉऊन्सिलरची गरज
केवळ घटस्फोटासाठी कोर्टात आलेल्या जोडप्यांसाठीच नाही. तर इतर वेळीही आयुष्यात अशा समस्या उद्भवत असतील तर तुम्ही कॉऊन्सिलरची मदत घेऊ शकतात. पण तुमच्या नात्यातन कॉऊन्सिलरची गरज कधी आहे ते घेऊया जाणून
- क्षुल्लक कारणावरुन तुमच्यात भांडण होत असतील. रागावर नियंत्रण राहात नसेल तर अशावेळी तुम्हाला कॉऊन्सिलिंगची नितांत गरज आहे.
- कपलमध्ये होणारी भांडणं ही कोणत्याही तिसऱ्या किंवा घरातल्या माणसांनी सोडवण्यासारखी नसतील तर अशावेळी तुम्ही कॉऊन्सिलरची मदत घेऊ शकता.
- एकमेकांना वेळ देणे हे ज्यावेळी नात्यात कमी होऊ लागते. दुसऱ्या जोडीदाराची गरज भासेनाशी होते अशावेळी वेळीच तुम्ही नाते सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते.
- नात्यात खोटे बोलणे होत असेल तरी देखील त्याचा छडा लावून भांडण करण्यापेक्षा कॉऊन्सिलरची मदत घेऊन हे प्रकरण मिटवायचा प्रयत्न खूप लवकर करता येईल.
- अनेकदा नात्यात चुका असूनही आपण त्या मान्य करायला तयार नसतो. अशावेळी अशा मित्राची गरज असते जो आपल्याला आरसा दाखवू शकेल.
आता वेळीच कॉऊन्सिलरची मदत घेऊन तुमच्या नात्यात आलेल्या अडचणी दूर करा.
अधिक वाचा: अधिक वयाच्या मुलामुलीला डेट करण्याचं प्रमाण का वाढलंय