बॉलीवूड

तुमचे आवडते कलाकार का जातात नैराश्याच्या आहारी

Trupti Paradkar  |  Aug 4, 2019
तुमचे आवडते कलाकार का जातात नैराश्याच्या आहारी

बॉलीवूडचा आणखी एक कलाकार मानसिक तणावाच्या आहारी गेल्याचं वृत्त आहे. विनोदी व्यक्तीमत्त्व, हटके डान्स स्टेप्सने एकेकाळी सिनेसृष्टी गाजवणारा सर्वांचा आवडता ‘हिरो नं 1’ गोविंदा आता डिप्रेशनमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. गोंविदा मागील काही दिवसांपासून नैराश्याच्या अधीन गेला आहे. मानसिक तणावामुळे त्यांच्या  वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनात सध्या कोलाहल माजलं आहे. मानसिक तणावाच्या आहारी गेल्यामुळे तो चित्रपटांच्या चांगल्या ऑफर्स धूडकावून लावत आहे. त्याच्या मनाला ग्रासलेली ही नकारात्मकता सध्या त्याचासाठी घातक ठरत असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय यामुळे सतत शिवीगाळ करणं, इतरांशी भांडणं केल्यामुळे त्याच्या जवळचे मित्रदेखील त्याच्यापासून दूरावत चालले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या अगदी जवळच्या मित्रांने हे वृत्त उघड केलं आहे. 

Instagram

कोणकोणत्या कलाकारांनी आतापर्यंत सहन केला आहे डिप्रेशनचा त्रास

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणला देखील मानसिक ताण आणि डिप्रेशनच्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र तिने यातून अगदी यशस्वीरित्या स्वतःची सुटका करून घेतली. बॉलीवूड अभिनेत्री मनिषा कोईराला, अनुष्का शर्मा, शाहरूख खान, वरूण धवन, रणदीप हुडा, शमा सिकंदर, हनी सिंह, कपिल शर्मा अशा अनेक सेलिब्रेटीजनां या मानसिक ताण-तणावाच्या विळख्याने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी यावर वेळीच योग्य ते उपचार करून स्वतःला मुक्त केलं आहे. या आजारपणापणातून बाहेर पडल्यावर या समस्येवर मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे असं या कलाकारांनी त्यांचं मत व्यक्त केलं होतं. 

कलाकार का जातात नैराश्याच्या आहारी

कलाकारांचं जीवन जसं बाहेरून दिसतं तसं मुळीच नसतं. कारण यशाच्या या शिखरावर पोहचण्यासाठी त्यांना अनेक आव्हानांना सतत तोंड द्यावं लागत असतं. यश मिळणं काही वेळा सोपं असतं पण मिळालेलं यश टिकवून ठेवण्यासाठी त्यांना सतत संघर्ष करावा लागत असतो. यश मिळवता मिळवता आरोग्य, कुटुंबिय, मित्रमंडळी त्यांच्यापासून कधी दूर जातात हे त्यांनादेखील कळत नाही. ज्यामुळे यशस्वी झाल्यावर आरोग्य आणि जवळच्या लोकांना पुन्हा मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतात. सिनेसृष्टीत टिकून राहण्यासाठी त्यांची जीवनशैली बदलून जाते. व्यसनं आणि इतर गोष्टी त्यांच्यासाठी नेहमीच्या होतात. यश  आणि पैसा हाती आल्यामुळे यशाच्या अपेक्षा अधिकच वाढत जातात. अपेक्षाभंग सहन करण्याची ताकद त्यांच्याजवळ उरत नाही. त्यामुळे अचानक अशा गोष्टी आयुष्यात घडू लागल्यास त्यांना ते सहन होत नाही. शिवाय वैयक्तिक आयुष्य, कामाचं प्रेशर, सामाजिक स्थान अशा अनेक गोष्टींमुळे त्यांचा मानसिक ताण सतत वाढत असतो. ज्यामुळे कलाकार नैराश्य अथवा डिप्रेशनच्या आहारी जातात. अनेक कलाकारांना या परिस्थितीवर मात न करता आल्यामुळे आत्महत्या केल्याची उदाहरणं जगासमोर आलेली आहेत. त्यामुळे यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे.

Instagram

यावर उपाय काय ?

नैराश्य कोणालाही येऊ शकते मग तो सेलिब्रेटी असो अथवा एखादा सर्वसामान्य माणूस ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. नैराश्याच्या अधीन जाण्यापेक्षा त्यावर उघडपणे बोलून त्यावर चांगल्याप्रकारे मात करता येऊ शकते. मानसिक आजारांवर मात करण्यासाठी वेळीच तज्ञ्ज डॉक्टरांचा सल्ला घेणं क्रमप्राप्त आहे. योग्य समूपदेशन, मेडिटेशन आणि अपेक्षांवर अकुंश ठेवून कलाकार अथवा इतर कोणतीही व्यक्ती या परिस्थितीतून स्वतःचा बचाव करू शकते. 

अधिक वाचा

मानसिक आजार म्हणजे काय आणि त्याचे काय आहेत प्रकार 

मानसिक ताणाला दूर ठेवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

‘मेडिटेशन’ ताणतणाव दूर करण्याचा प्राचीन फंडा

फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम  

Read More From बॉलीवूड