Acne

पावसाळ्यात या कारणामुळे होऊ शकते #acne ची समस्या

Trupti Paradkar  |  Aug 2, 2019
पावसाळ्यात या कारणामुळे होऊ शकते #acne ची समस्या

पावसाळा ऋतू प्रत्येकाला हवाहवासा वाटत असला तरी या काळात अनेक त्वचेच्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागू शकतं. पावसाळ्यात वातावरणात दमटपणा वाढलेला असतो. त्यामुळे जर पावसात भिजल्यावर तुम्ही बराचवेळ तसेच राहीला तर तुम्हाला त्वचेच्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. शिवाय या वातावरणात त्वचा डिहायड्रेड होण्याची आणि त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. जर या काळात तुम्ही त्वचेची योग्य काळजी  घेतली नाही तर तुम्हाला acne चा त्रास सहन करावा लागू शकतो. यासाठीच या काळात पिंपल्स अथवा acne होण्यामागची कारणं जरूर जाणून घ्या

पावसाळ्यात जास्त पिंपल्स येण्यामागचं कारण

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता आणि उष्णता दोन्ही अचानक वाढतात. कधी गरम होतं तर कधी गारवा जाणवतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेमध्ये sebum चं प्रमाण वाढू लागतं. असं झाल्यामुळे त्वचेवर तेलकटपणाचा थर निर्माण होतो. तैलग्रंथींमधून अतिरिक्त तेलाची निर्मिती झाल्यामुळे त्वचा चिकट होते. अशा त्वचेवर जीवजंतूंचे पोषण चांगले होते. तेलकट त्वचेवर धुळ, प्रदूषण, माती चिकटते आणि त्वचेला इनफेक्शनचा धोका निर्माण होतो. त्वचेच्या आतील छिद्रे यामुळे बंद होतात आणि त्वचेवर पिंपल्स अथवा acne दिसू लागतात. 

पिंपल्स आल्यामुळे त्वचा  कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. बऱ्याचदा काही लोकांना इतर ऋतूंमध्ये पिंपल्स येत नाहीत मात्र पावसाळ्यात हमखास पिंपल्स अथवा पुरळ येतं. यामागे वातावरणात झालेला हा बदल कारणीभूत असू शकतो. शिवाय या काळात फक्त चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत तर हात, पाय, पाठ, मान अशा कोणत्याही भागावर पुरळ अथवा acne येऊ शकतात. यासाठीच पावसाळ्यात या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

पावसाळ्यात acne समस्या दूर ठेवण्यासाठी सोप्या टिप्स

अधिक वाचा

चेहऱ्यावरील पिंपल्स गेले पण डागांचे काय, करा हे घरगुती उपाय

‘या’ लाईफ चेजिंग मेकअप टीप्स तुम्हाला माहित असायलाच हव्या

पिंपल्स आल्यानंतर कधीच करु नका या 5 चुका

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

 

 

 

 

Read More From Acne