त्वचेची काळजी

नारळ तेलाचा अती वापर ठरेल घातक, होतील या त्वचेच्या समस्या

Trupti Paradkar  |  Jun 24, 2021
नारळ तेलाचा अती वापर ठरेल घातक, होतील या त्वचेच्या समस्या

नारळाचे तेल सामान्यपणे भारतीय स्वयंपाकात वापरले जाते. पदार्थ तळण्यासाठी, फोडणीसाठी अथवा शॅलो फ्राय करण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल वापरण्यात येते. नारळाच्या ताज्या तेलात तळलेल्या पदार्थांना एक प्रकारचा सुंगध येतो. नारळाच्या तेलात लोह, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असतं. यासाठीच ताणतणावातुन मुक्त होण्यासाठी रात्री झोपताना नारळाच्या तेलाचा मसाज करण्याचा सल्ला दिला जातो. नारळाचे तेल अतिशय गुणकारी असल्यामुळे केस आणि त्वचेसाठी या तेलाचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. नारळाच्या तेलात अनेक औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या केसांची वाढ चांगली होते आणि त्वचेच्या काही समस्या सहज दूर होतात. जरी नारळाचे तेल केस आणि त्वचेसाठी चांगले असले तरी कोणत्याही गोष्टीचा अतीवापर करणे नेहमीच टाळावे. कारण नारळाचे तेल त्वचेसाठी अतीप्रमाणात वापरणे तुमच्या त्वचेसाठी घातक ठरू शकते. यासाठीच जाणून घ्या नारळाच्या तेलाचा अती वापर केल्यास त्वचेवर काय परिणाम  होतात.

अती प्रमाणात नारळाचे तेल त्वचेवर का लावू नये (Why coconut oil is bad for your skin)

केस आणि त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी नारळाचे तेल उत्तम मानले जाते. कारण नारळाच्या तेलात त्वचेला पोषक अनेक गुणधर्म असतात. अनेकांना अंघोळीनंतर केस आणि त्वचेवर नारळाचे तेल लावण्याची सवय असते. काहींना रात्री नियमित केस आणि त्वचेवर नारळाचे तेल लावण्याची सवय असते. दिवसभरात एकदा कमी  प्रमाणात केस  आणि  त्वचेवर नारळाचे तेल लावणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते. मात्र नारळाच्या तेलाचा त्वचेवर सतत अती वापर करणं मुळीच योग्य नाही. जाणून घ्या यामुळे काय परिणाम होऊ शकतो.

चेहऱ्यावर राठ केस येणे-

आपण पाहतो की अनेक मुलींच्या चेहऱ्यावर जाड आणि राठ केस असतात. चेहऱ्यावर केस हॉर्मोनल  असंतुलनामुळे येऊ शकतात. मात्र जर तु्म्ही चेहऱ्यावर अती प्रमाणात नारळाचे तेल लावत असाल तरी तुमच्या चेहऱ्यावरील केस वाढू शकतात. कारण नारळाच्या तेलामुळे केसांची वाढ जोमाने होते. यासाठीच चेहऱ्यावर नारळाचे तेल प्रमाणात लावावे.

pixels

पिंपल्स वाढू लागणे –

जर तुम्ही चेहऱ्यावर अती प्रमाणात नारळाचे तेल लावले तर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. कारण यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील तैलग्रंथींना चालना मिळते आणि त्वचेखाली तेलाची निर्मिती वाढते. ज्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

चेहरा लाल होणे –

जर तुम्ही अती प्रमाणात नारळाचे तेल चेहऱ्यावर लावले तर तुमचा चेहरा लाल पडू शकतो. कारण नारळाचे तेल इतर फेशिअल ऑईल प्रमाणे सौम्य नसते. याचा वापर तुम्ही स्काल्पवर करू शकता पण चेहऱ्याच्या त्वचेसाठी ते नक्कीच फायदेशीर नाही. अती वापर केल्यास त्यामुळे तुमच्या त्वचेवर लालसरपणा अथवा रॅशेस वाढू शकतात. शिवाय ते उष्ण असल्यामुळे तुमच्या त्वचेवर जळजळ निर्माण होते.

यासाठीच नारळाच्या तेलाचा चेहऱ्यावर अती वापर करू नये. याशिवाय जाणून घ्या केस  आणि त्वचेवर नारळाचा  वापर कसा आणि किती प्रमाणात करावा. वाचा निरोगी आरोग्य आणि सौंदर्यासाठी वापरा बहुगुणी ‘नारळाचे तेल’ (Benefits Of Coconut Oil In Marathi)

तुम्हाला नारळाचे तेल अती प्रमाणात वापरल्यामुळे त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागला आहे का काय आहे तुमचा अनुभव आणि कशा वाटल्या आमच्या ब्युटी टिप्स हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा.

फोटोसौजन्य – pixels

अधिक वाचा –

पावसाळ्यात भिजण्याआधी अशी तयार करा तुमची त्वचा

खडबडीत त्वचेला मेकअपने द्या असा स्मूथ लुक

Read More From त्वचेची काळजी