लाईफस्टाईल

महिलांना #Insurance ची गरज का आहे

Aaditi Datar  |  Sep 11, 2019
महिलांना #Insurance ची गरज का आहे

खरंतर ही हेडलाईन वाचून अर्ध्या महिला हा लेख वाचणार नाहीत. कारण बऱ्याच महिलांना या विषयाबाबत जाणून घेण्यात उत्सुकता नाही. पण विमा ही आजच्या काळाची गरज आहे. भारतातील लोकसंख्येपैकी स्त्रियांची संख्या निम्मी आहे आणि असा देश जिथे आत्तापर्यंत स्त्रिया कुटूंबातील मुख्य नोकरदार मानल्या जात नव्ह्त्या. या विचारसरणीत गेल्या काही वर्षात बदल झाला आहे. परिणामी नोकरदार महिलांच्या संख्येत स्थिर वाढ झाली आहे. तरीही, IRDI ने नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार एक बाब समोर आली आहे. 68% पुरुषांच्या तुलनेत फक्त 32% महिलांनी मागील वर्षी कोणत्याही प्रकारचे विमा विकत घेतले आहेत. ही एक चिंतेची बाब आहे.

महिलांनी विमा का खरेदी करावा?

वास्तविक, प्रश्न ‘का नाही’ असा असावा. महिला कोणत्याही कुटूंबातील मुख्य काळजीवाहू असतात. त्या एक दिवसदेखील आजारी पडल्या  तर कुटुंबाचे संतुलन बिघडते. एवढंच नाहीतर सर्व क्षेत्रांत त्या पुरुषांप्रमाणेच, किंबहुना काही क्षेत्रात त्यांच्यापेक्षा जास्तच अग्रेसर आहेत. जिथे 68% पुरुष विमा उत्पादने खरेदी करत आहेत, तर महिलांची संख्या इतकी कमी का आहे?

Shutterstock

गेल्या दशकात विमा उद्योगात हळूवार पण स्थिर प्रगती दिसून आली आहे, ज्यात लिंग गतिशीलतेचा प्रश्न आहे. स्त्रियांना लक्षात घेऊन बनवण्यात आलेल्या विम्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले आहे – मग ती गृहिणी असो वा व्यावसायिकरित्या कार्यरत महिला. विमा कंपन्यांनी महिला ग्राहकांचे महत्त्व जाणण्यास सुरूवात केली आहे आणि महिलांना आकर्षित करण्यासाठी महिला-केंद्रित विमा योजना तयार केल्या आहेत. तरीही, गेल्या वर्षी स्त्रियांनी  खरेदी केलेल्या विम्याचे कमी प्रमाण लक्षात घेता, महिलांना विम्याची आवश्यकता का आहे, याची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांना योग्य विमा योजना निवडण्यात मदत करण्यासाठी पुष्कळ गोष्टी करणे आवश्यक आहे.

योग्य विम्याची निवड

Shutterstock

स्त्रियांच्या वैयक्तिक / व्यावसायिक स्थितीनुसार विमा खरेदी करताना त्यांच्या धोरणात कोणताही फरक असू नये. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, विमा अडचणींपासून आर्थिक संरक्षण देतो. ज्या अडचणी विशिष्ट प्रकारच्या दुर्घटनांमुळे उद्भवू शकतात. पण कधी कधी खरेदी केलेला विमा हा एखाद्या महिलेच्या कार्यरत स्थितीवर अवलंबून असतो. अर्थात विम्यांमध्ये असेही काही प्लॅन्स आहेत जे सर्वांसाठी समान आहेत. शिवाय, महिलांसाठी प्रीमियम सामान्यत: कमी असतो. जे स्त्रियांसाठी विमा घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यास आणखी एक कारण आहे.

उद्योजिका महिलांसाठी विम्याचं महत्त्व

– जीवन विमा पॉलिसी विमाधारकास अपंगत्व किंवा मृत्यूमुळे झालेल्या उत्पन्नात होणाऱ्या नुकसानापासून वाचवते आणि म्हणूनच सर्व श्रमिक महिलांनी हा विमा विकत घेतला  पाहिजे.

– निवृत्तीवेतन / सेवानिवृत्ती योजना म्हणजे गुंतवणूकीची साधने ज्याद्वारे एखादी व्यक्ती त्यांच्या उत्पन्नातील काही भाग बचतीमध्ये वाटप करू शकते. काही कालावधीत ही बचत जमा होते आणि विमाधारकास पूर्व-निर्धारित मुदतीच्या शेवटी किंवा सेवानिवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न मिळते.

Shutterstock

माता आणि मातृत्वासाठी इच्छुक महिलांकरिता विमा

जाणून घेऊया अशा विमा योजना ज्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर नक्कीच पडतील उपयोगी

1. आरोग्य विमा योजना : आरोग्य विमा योजना विमाधारकास कोणत्याही आजारांमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक नुकसानापासून किंवा अगदी बाळंतपणासारख्या जीवनाच्या घटनांसाठी  संरक्षण करते. आजकालच्या काळात आवश्यक असलेल्या अधूनमधून तपासणी देखील ते कव्हर करतात. जीवनशैली आणि दुर्बल आजारांची वेगवान वाढ महिलांसाठी विमाधारक राहणे अधिक महत्वाचे बनवते. गंभीर आजार, प्रसूती, जन्मजात जन्म दोष, अपंगत्व इत्यादींसाठी ऍड -ऑन्स देखील गरजेनुसार खरेदी करता येतात.

2. जीवन विमा योजना : मृत्यूची आणि मुदतपूर्तीच्या फायद्याची ऑफर देणारी, जीवन विमा सर्व स्त्रियांसाठी, गुंतवणूकीच्या पोर्टफोलिओचा एक महत्वाचा भाग बनली पाहिजे. विमाधारकाला जिवंत असल्यास मॅच्युरिटी कालावधीनंतर एकरकमी (विम्याची रक्कम) मिळते. त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तींना ही रक्कम मिळते.

3.मोटर विमा योजना : स्वत: चे वाहन चालविणार्‍या कोणत्याही महिलेसाठी मोटर विमा असणे आवश्यक आहे. या योजना इतरांना झालेलं नुकसान, अपघात किंवा जखमांमुळे होणार्‍या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळतं. भारतात थर्ड पार्टी मोटर विमा अनिवार्य आहे, परंतु सर्वसमावेशक विमा मालकास मनाची शांतता देऊ शकते.

*या लेखातील माहिती ही श्री. आनंद प्रभुदेसाई यांनी दिलेली असून ते ‘टर्टलमिंट’मध्ये सह-संस्थापक आहेत.*

हेही वाचा –

घरच्या घरी सुरू करा बिझनेस…आजच व्हा स्वावलंबी

सध्या गरज आहे ती म्युच्युअल फंडाची…महिलांनीही गुंतवा म्युच्युअल फंडात पैसे

महिलावर्गाने नवीन जॉब स्वीकारताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Read More From लाईफस्टाईल