अॅस्ट्रो वर्ल्ड

घरात देवदेवतांचे असे फोटो मुळीच असू नयेत

Trupti Paradkar  |  Aug 26, 2021
why never keep such pictures of god in the house

भारतीय संस्कृतीत धार्मिक विधी, पूजापाठ, व्रतवैकल्यांना सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. घर हे मंदिराप्रमाणे मानलं जात असल्यामुळे घर घेतल्यावर सर्वात  आधी देवाच्या प्रतिमा अथवा मुर्तीची स्थापना केली जाते. मात्र वास्तू शास्त्रानुसार घरात  देवाचे फोटो अथवा मूर्ती असल्यामुळे घरात सकारात्मक उर्जा येते. मात्र जर चुकूनही तुम्ही चुकीच्या दिशेला अथवा चुकीच्या पद्धतीचे देवदेवतांचे फोटो घरात लावले. तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. यासाठी वास्तूशास्त्रानुसार जाणून घरात देवाचे कसे फोटो असू नयेत. 

मनाला शांत ठेवण्यासाठी फॉलो करा या वास्तू टिप्स

घरात देवांचे युद्धातील फोटो नसावे

भगवान श्रीकृष्ण अथवा भगवान श्रीराम यांना भारतात घरोघरी आराध्य देवतांचे स्थान आहे. मात्र बऱ्याचदा घरात श्रीकृष्ण  आणि श्रीरामाचे युद्धातील फोटो लावले जातात. युद्धातील फोटो घरात लावण्यामुळे घरात सतत अशांतता आणि भांडणाचे वातावरण निर्माण होते. ज्या घरात सतत भांडण अथवा वाद होतात त्या घरात लक्ष्मी माता वास करत नाही असं म्हणतात. यासाठीच देवदेवतांचे युद्ध करतानाचे फोटो घरात कधीच नसावेत. 

घरात गुडलकसाठी खरेदी करत असाल विंड चाइम तर लक्षात ठेवा या गोष्टी

रौद्ररुपधारी देवतांचे फोटो घरात लावू नका

वास्तूशास्त्रानुसारा घरात सुख, शांती, समाधान नांदण्यासाठी घरात लावणाऱ्या देवतांचे फोटो नेहमीम  सौम्य रूपातील आणि आर्शीवाद मुद्रेतील असावेत. घरात कधीच रुद्ररूप असलेले देवदेवतांचे फोटो लावू नयेत. कारण असे  फोटो लावल्यास घरातील वातावरण नकारात्मक होते. सतत असे रौद्ररुपी फोटो बघून मनात त्याच भावना निर्माण  होतात. शिवाय घरातील देवदेवतांचे फोटो कधीच  तुटलेले आणि मूर्ती कधीच भंगलेली असू नये. 

घरात मूर्ती स्थापन करताना ही चूक करू नका –

जर तुम्ही घरात देवदेवतांची मूर्ती स्थापन करणार असाल तर लक्षात ठेवा देवाचा चेहरा नेहमी तुम्हाला सहज दिसेल अशा दिशेला असावा. घरातील कोणत्याही दिशेतून मूर्तीची पाठ तुम्हाला दिसता कामा नये. कारण अशा प्रकारे घरात मुर्ती ठेवल्यास पूजाविधीचे शुभफळ मिळत नाही.  घरातील देवदेवतांच्या मूर्तीकडे पाहून नेहमी प्रसन्न वाटते. मनात जेव्हा अशी प्रसन्नता असते तेव्हा मनात सतत चांगले आणि शुभ विचार येतात. आपल्या मनात येणाऱ्या विचारांचा जीवनावर नकळत परिणाम होत असतो. आपली वास्तू सतत तथास्तू म्हणते असं मानलं जातं. यासाठी घरात देवाची मूर्ती अथवा प्रतिमा अशी असावी जी पाहिल्यावर तुम्हाला सतत प्रसन्न वाटेल. अशा वातावरणामुळे घरात सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य नांदते.

वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका

Read More From अॅस्ट्रो वर्ल्ड