सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सनी देओलने केलं आहे. मात्र मुलाच्या या बॉलीवूड डेब्यूबाबत तो जितका आनंदी आहे तितकाच चिंताग्रस्त सुद्धा आहे. कारण सनीच्या करणकडून फार अपेक्षा आहेत. सनीने बॉलीवूडमध्ये स्वतःच नाव कमवावं असं त्याला वाटत आहे. यासाठीच त्याने करणला बॉलीवूडमध्ये नेमक्या कोणत्या भूमिका निवडाव्या याबाबत आधीच एक सल्ला दिला आहे.
सनी देओलची करन कडून नेमकी काय आहे अपेक्षा
करणने त्याचे आजोबा आणि दिग्गज अभिनेता धर्मेंद्र, वडील सनी देओल आणि काका बॉली देओल, अभय देओल यांच्याकडून अभिनयाचे धडे घेतले आहेत. थोडक्यात करणचं संपूर्ण कुटूंबच या क्षेत्रात आहे. त्यामुळे करनला अभिनयाचं बाळकडू फार लहानपणीच मिळालं आहे. सहाजिकच करणसाठी एखाद्या चित्रपटातील खास भूमिका लिहीली जावी अशी सनी देओलची इच्छा आहे. करणने सनीच्या एखाद्या रिमेक चित्रपटात काम करावं असं त्याला मुळीच वाटत नाही. एका मुलाखतीत सनीने त्याच्या मनातील या भावना उघड केल्या आहेत. सनीच्या मते, करनने कोणत्याही रिमेकमध्ये मुळीच काम करू नये असं त्याला वाटतं. कारण रिमेक हे एखाद्या जुन्या हिट चित्रपटाचे असतात. मात्र ते चित्रपट त्या काळानुसार बनवलेले असतात. त्यामुळे ते त्याकाळी हिट होणं स्वाभाविक आहे. आताचे वातावरण अशा चित्रपटांच्या रिमेकसाठी मुळीच पोषक असू शकत नाही. लोक त्याकाळातील आठवणींना फक्त उजाळा देण्यासाठी असे रिमेक पाहतात. त्यामुळे रिमेकला हवा तसा न्याय मिळू शकत नाही. म्हणूनच सनीला त्याच्या मुलाने एखाद्या रिमेकमध्ये काम करावं असं मुळीच वाटत नाही. सनी त्याच्या मुलाच्या डेब्यूसाठी प्रचंड मेहनत घेत आहे. त्यामुळे करनने यापुढे नेहमी एखाद्या ओरिजनल भूमिकेसाठीच काम करावं असं त्याला वाटत आहे. लवकरच करन पल पल दिल के पासमधून प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सबर बाम्बा मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट येत्या 20 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
करणला बॉलीवूडच्या भाईजानने दिल्या शुभेच्छा
सलमान खान आणि धर्मेंद यांची चांगली बॉंडिंग आहे. त्यामुळे सनी देओलच्या मुलाच्या डेब्यूसाठी सलमान ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानचे हे ट्विट सोशल मीडियावर फारच व्हायरल झालं होतं. या ट्विटमधून सलमानने लिहीलं होतं की, आताच्या पिढीतील सर्वांत मोठी प्रेमकथा, ऑल दी बेस्ट. आणि त्याने पल पल दिल के पास है चं ट्रेलर यासोबत शेअर केलं होतं. या ट्विटवर सनी देओलने लगेच रिप्लाय दिला होता. त्याने सलमानचे आभार मानले होते कारण सलमाने या ट्विटच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना करणच्या चित्रपटाविषयी सांगितलं. यासर्व गोष्टींमुळे आता करणच्या पल पल दिल के पास बाबत चाहत्यांमध्ये फारच उत्सुकता दिसून येत आहे. शिवाय करन दिसायला त्याच्या वडीलांसारखाच असल्यामुळे त्याचा अभिनय पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. पल पल दिल के पास या चित्रपटाविषयी आणखी एक खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे शीर्षक करनचे आजोबा धर्मेंद्र यांच्या ब्लॅकमेल या चित्रपटातील गाण्याचे बोल आहेत. हे गाणं आजही अजरामर आहे. त्यामुळे धर्मेंद्र आणि सनीचे चाहते या चित्रपटाला नक्कीच गर्दी करतील असं वाटत आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा
कसौटी जिंदगी की मालिकेमध्ये कोमोलिका येणार परत, पुन्हा हिनाच्या प्रतीक्षेत
सुशांत सिंग राजपूतने दिला सारा अली खानसोबत काम करण्यास नकार
जान्हवी कपूरच्या लग्नाबाबत श्रीदेवीची होती ही ‘इच्छा’
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade