लाईफस्टाईल

टेबलवर सेक्स करणे का वाटते जोडप्यांना अधिक एक्साईटिंग

Dipali Naphade  |  Jun 14, 2022
why-table-sex-is-more-exciting-for-couples-in-marathi

कोणत्याही जोडप्याच्या आयुष्यात सेक्स हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. वेगवेगळ्या सेक्स पोझिशन्सचा (Sex Position) अनुभव घेणं आणि त्यातून सेक्सचा आनंद उपभोगणं हे अत्यंत सामान्य असलं तरीही त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेणंही अनेकांना आवडतं. सेक्स म्हटलं की केवळ बेडवर एखाद्या पोझिशन्समध्ये एकमेकांशी संभोग करणं अथवा एकमेकांना समाधान देणं असा होत नाही. तर रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून आपल्या नात्याला भक्कम करण्यासाठी काहीतरी वेगळे आणि उत्साहात्मक करणे अनेक जोडप्यांना आवडते. पण यासाठी नक्की काय करायचं असाही प्रश्न अनेकांना पडतो आणि मग त्यानंतर एक्साईटिंग असं टेबलवर सेक्स करणे (Sex on Table) अत्यंत लाभदायी ठरतं. हा एक वेगळाच अनुभव आहे. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत टेबलवर सेक्स केलं आहे, त्यांना आमचं म्हणणं नक्कीच पटेल.

टेबलचा होतो चांगला उपयोग 

टेबल सेक्स करणे हा एक वेगळा आणि नक्कीच चांगला अनुभव आहे. टेबलवर आपल्या जोडीदाराला बसवून Cowgirl पोझिशनमध्ये तुम्ही सेक्स करता, तेव्हा टेबलाचा चांगला आधार मिळतो, त्याशिवाय त्याच त्याच पोझिशनपेक्षा वेगळी पोझिशन असल्यामुळे सेक्स करण्याचा आनंद आणि समाधानही वेगळे असते. टेबलाचा आधार घेऊन सेक्स करताना अधिक जोर लावावा लागत नाही आणि त्याशिवाय तुमच्या जोडीदाराला आणि तुम्हालाही एक वेगळा आनंद मिळतो आणि Orgasm मिळविण्यास सोपे जाते. 

वेगळेपणा (Effective Simulation)

किचनच्या टेबलवर सेक्स करणे हे अत्यंत हॉटदेखील ठरू शकते. तुम्ही जर असं करत असाल तर तुम्ही यावेळी किचनच्या नळातील पाण्याचा अथवा फ्रिजमधील बर्फाचादेखील उपयोग करू शकता. टेबलवर तुमच्या जोडीदाराला झोपवून तुमच्या फँटसी पूर्ण करू शकता. मात्र तुमच्या जोडीदाराला कुठेही लागेल अथवा त्रासदायक ठरेल असं काहीही करू नका. जोडीदाराच्या परवानगीने या गोष्टी करणे तुम्हाला सेक्स करताना अधिक आनंद मिळवून देऊ शकते. तसंच बर्फ अथवा पाण्यामुळे सेक्स करताना अधिक उत्तेजना मिळते. तसंच तुमचे किचनमधील सिंक मोठे असेल अथवा टेबल मोठे असेल तर सेक्स करताना अधिक मजा येईल.  

ओरल सेक्ससाठी बेस्ट पोझिशन

तुम्हाला कधी ओरल सेक्सचा (Oral Sex) अनुभव घ्यायचा असेल तर टेबल हा उत्तम पर्याय आहे. या पोझिशनमध्ये दोघांनाही सेक्सचा आनंद घेता येतो. कारण या पोझिशनमध्ये तुमच्या जोडीदाराचा प्रायव्हेट पार्ट अर्थात Vagina आणि Penis पर्यंत व्यवस्थित पोहचता येते. याशिवाय महिलांना टेबलवर सेक्स करताना अधिक उत्तेजना मिळते आणि त्यामुळे आपल्या जोडीदारालादेखील अधिक चांगले सुख देता येते. याशिवाय टेबलवर सेक्स करताना तुम्ही काही सिरप (Syrup) अथवा व्हिप्ड क्रिमचाही (Whipped Cream) वापर करू शकता. तुम्ही किचनमधील टेबलवर असाल तर तुम्हाला या गोष्टींचा सहज वापर करून जोडीदाराबरोबर एका वेगळ्या सेक्सचा आनंदही घेता येईल. 

स्वच्छता करणे सोपे 

बेडवर सेक्स करताना अनेकदा कंडोम फुटणे अथवा स्पर्म्स चादरीवर येणे वा कधीकधी महिलांच्या योनीतून रक्त येणे असेही प्रकार घडतात. त्यामुळे चादर खराब होते. गाद्या खराब होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागते. मात्र सेक्स करताना हे सर्व नक्कीच डोक्यात नसते. टेबलवर सेक्स करताना याची काळजी घ्यावी लागत नाही. तसंच टेबल स्वच्छ करणे हे अगदी सहज आणि सोपे आहे. 

तुम्हीही त्याच त्याच सेक्स पोझिशनने कंटाळला असाल तर टेबल सेक्स करणे तुमच्यासाठीही एक्साईटिंग ठरू शकते. बऱ्याच जोडप्यांना टेबलवर सेक्स करणे हे अधिक एक्सायटिंग वाटणे याची हीच कारणे आहेत. तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From लाईफस्टाईल