लाईफस्टाईल

5 सप्टेंबरला का साजरा केला जातो शिक्षक दिन

Aaditi Datar  |  Sep 4, 2021
5 सप्टेंबरला का साजरा केला जातो शिक्षक दिन

आपल्या देशात दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी शाळांमध्ये खास शिक्षकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम विद्यार्थांकडून आयोजित केले जातात. शिक्षक असो वा गुरू यांचं आपल्या जीवनता महत्त्वपूर्ण स्थान आहे. दरवर्षी आपण आवर्जून शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, शिक्षक दिन 5 सप्टेंबरलाच का साजरा केला जातो आणि तो भारतात कसा साजरा केला जातो.

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला सर्वात जास्त गरज असते ती शिक्षणाची. शिक्षक हे देशाचं भविष्य आणि युवांना घडवणारे असतात. प्राचीन काळापासून आपल्याकडे गुरू-शिष्याची परंपरा आहे. त्यामुळे तरूणपिढी घडवण्यात पूर्वापारपासून शिक्षकांची मुख्य भूमिका राहिली आहे. गुरूंकडून मिळालेलं ज्ञान आणि मार्गदर्शनामुळे आपण आयुष्यातील यशाच्या शिखरांपर्यंत पोचतो. शिक्षक दिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी शिक्षकांचा सन्मान केला जातो. 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतात 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा केला जातो. ते एक महान शिक्षक होते. जे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते.

सर्वपल्ली राधाकृष्ण एक महान आदर्श शिक्षक होते आणि त्यांना शिक्षणाप्रती प्रेमही होते. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये सरकारतर्फे शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या दिवशी पुरस्कार दिला जातो. असं म्हणतात की, गुरू म्हणजेच शिक्षकांविना योग्य रस्त्यावर चालता येत नाही. ते मार्गदर्शन करतात. तेव्हाच ते विद्यार्थी चांगली व्यक्ती बनतात आणि योग्य मार्गावर चालतात. त्यामुळे हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही की, जन्मदात्यापेक्षा महत्त्व शिक्षकांना आपल्या आयुष्यात आहे. जे आपल्याला जीवनाला योग्यरित्या घडवतात. 

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची माहिती

डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1988 रोजी तामिळनाडूतील तिरूतनी गावातील गरीब कुटुंबात झाला. आर्थिकरित्या दुर्बल असूनही त्यांना लिहीण्यावाचण्याची फार आवड होती. त्यांचं सुरूवातीचं शिक्षण तिरूवल्लुरच्या गौडी शाळेत आणि तिरूपती मिशन स्कूलमध्ये झालं. नंतर मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. 1916 मध्ये त्यांनी दर्शन शास्त्रात एमए केलं आणि मद्रास रेसिंडेन्सी कॉलेमध्ये या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. 16 व्या वर्षीच त्यांचं लग्न सिवाकामु यांच्या शी झाला. 1954 साली शिक्षण आणि राजकारणात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल त्यांना भारत सन्मानाने गौरवण्यात आलं. 

राजकारणात येण्याआधी त्यांना आपल्या जीवनाची 40 वर्ष शिक्षण क्षेत्राला दिली. त्यांचा असा विश्वास होता की, शिक्षणाशिवाय माणूस कधीच त्यांच्या ध्येयापर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात एक शिक्षक असणं आवश्यक आहे. 

भारतात कसा साजरा केला जातो हा दिवस 

या दिवशी शाळांमध्ये अभ्यास केला जात नाही परंतु अनेक कार्यक्रम सादर केले जातात. विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटवस्तू देतात आणि गुरू-शिष्य परंपरा कायम ठेवण्याचा संकल्प करतात. आता युनेस्कोनेही या दिवसाला शिक्षक दिवस म्हणून 5 ऑक्टोबरला मान्यता दिली आहे. त्यामुळे तब्बल 100 देशांमध्ये आता शिक्षक दिन साजरा केला जातो. तुम्हीही हा दिवस आपल्या शिक्षकांप्रती प्रेम दाखवून नक्की साजरा करा.

Read More From लाईफस्टाईल