Natural Care

कपाळावर टिकली लावण्यामुळे येत असेल खाज तर करा हे उपाय

Trupti Paradkar  |  Jan 14, 2021
कपाळावर टिकली लावण्यामुळे येत असेल खाज तर करा हे उपाय

 

 

साडी अथवा पंजाबी कुर्ता घातला की त्यावर लावलेली मोठी मॅचिंग टिकली तुमच्या सौंदर्यात अधिकच भर घालते. मात्र बऱ्याच जणींना आवडत असूनही टिकली लावता येत नाही. याचं कारण स्किन अॅलर्जी हे असू शकतं. कारण टिकलीला चिकटवण्यासाठी असलेल्या चिकट गोंदची त्यांना अॅलर्जी असते. टिकली लावली की त्या ठिकाणी या महिलांना खूप खाज येते, कधी कधी लाल पुरळ उठतं, लाल अथवा काळसर डाग उठतात. टिकलीच्या गोंदमध्ये वापरण्यात येणाऱ्या हानिकारक केमिकल्समुळे या त्वचेच्या समस्या निर्माण होतात. मात्र तुम्ही काही घरगुती उपाय करून या त्रासापासून मुक्त होऊ शकता आणि तुमच्या आवडीची टिकलीदेखील लावू शकता जाणून घ्या कसं.

तिळाच्या तेलाचा करा वापर –

 

जर तुम्हाला टिकलीच्या गोंदची अॅलर्जी असेल तर टिकली लावण्यापूर्वी कपाळावर थोडं तिळाचं तेल लावा. ज्यामुळे टिकलीचा गोंद तुमच्या त्वचेच्या संपर्कात येणार नाही. तिळाच्या तेलाचा  थर या गोंदपासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करेल. नियमित तिळाचं तेल लावण्यामुळे हळूहळू तुमच्या त्वचेची अॅलर्जी कमी देखील होईल.

कापूर आणि नारळाचं तेल आहे उत्तम –

 

त्वचेच्या कोणत्याही समस्येवर नारळाचं तेल फायदेशीर ठरतं. कारण या तेलात भरपूर प्रमाणेातत अॅंटि ऑक्सिडंट असतात. अॅलर्जीमुळे जर तुम्हाला खाज येत असेल तर नारळाच्या तेलात थोडा कापूर टाका. कापूर विरघळल्यानंतर ते तेल तुमच्या कपाळावर लावा. कापरामुळे तुमच्या कपाळावरील दाह कमी होईल आणि अॅलर्जीदेखील नष्ट होईल. नियमित रात्री झोपताना कपाळावर हे तेल लावण्यामुळे तुम्हाला टिकलीमुळे होणारा अॅलर्जीचा त्रास कमी जाणवू लागेल.

Shutterstock

कडूलिंबाचे तेल लावा –

 

कडूलिंबाच्या पानांप्रमाणेच कडूलिंबाचे तेलही तुमच्या सौंदर्यासाठी उत्तम ठरते. कारण यामुळे तुमच्या त्वचेचं  कोणतंही इनफेक्शन कमी होऊ शकतं. जर टिकली लावण्यापूर्वी तुम्ही थोडं कडूलिंबाचं तेल कपाळावर चोळलं तर तुम्हाला टिकली लावण्यानंतर येणारी खाज येणार नाही. टिकली मुळे होणारं इनफेक्शन, खाज कमी करण्यासाठी हे अॅंटिसेप्टिक तेल नक्कीच  फायदेशीर आहे.

जास्त चिकट गोंद असेलेली टिकली वापरू नका –

 

टिकलीने खाज येत  असेल तर अशा लोकांनी टिकलीचा वापर नक्कीच करू नये. मात्र काही खास प्रसंगी, सणसमारंभाला जर तुम्हाला टिकली लावण्याची हौस असेल तर जास्त चिकट गोंद नसेल अशी टिकली लावा. शिवाय थोड्यावेळासाठीच टिकली लावा. जास्त काळ टिकली कपाळावर असेल तर तितका वेळ तुमच्या त्वचेला खाज आणि इनफेक्शनचा त्रास होऊ शकतो. वर सांगितल्याप्रमाणे  नारळाचं तेल, कडूलिंबाचं तेल अथवा  तिळाचं तेल लावून काही काळापुरती टिकली तुम्ही नक्कीच लावू शकता. ज्यामुळे तुमच्या कपाळावर खाज येणार नाही. शिवाय हे घरगुती उपाय सतत केल्यामुळे तुमची अॅलर्जी कमी होऊ शकेल आणि तुम्ही तुमची आवडती टिकली नक्कीच लावू शकाल.

Instagram

टिकली ऐवजी कुंकू लावा –

 

जर सर्व उपाय करूनही तुम्हाला टिकली लावल्यावर खाज येतच असेल तर टिकली ऐवजी कुंकवाचा वापर करा. शुद्ध आणि केमिकल विरहित कुंकू वापरण्यामुळे तुम्हाला अॅलर्जीचा  त्रास होणार नाही. शिवाय कुंकू लावण्यामुळे तुमचे सौंदर्य अधिकच वाढेल. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

DIY : घरीच नैसर्गिक पद्धतीने तयार करा कुंकू

सणासुदीला ट्राय करा खणापासून तयार केलेले हे हटके आऊटफिट

मोठ्या आकाराचे कानातले घालूनही नाही दुखणार कान, फॉलो करा या टिप्स

Read More From Natural Care