Natural Care

ब्युटी प्रॉडक्टच्या अती वापरामुळे होऊ शकतं त्वचेचं नुकसान

Trupti Paradkar  |  Jul 10, 2020
ब्युटी प्रॉडक्टच्या अती वापरामुळे होऊ शकतं त्वचेचं नुकसान

सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी त्वचा आणि केसांची योग्य निगा राखणं गरजेचं आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सध्या सर्वांना घरीच सौंदर्योपचार करावे लागत आहेत. सौंदर्य खुलवण्यासाठी ब्युटी प्रॉडक्टचा वापर केला जातो. ब्युटी केअर रूटीन फॉलो करण्यासाठी त्वचा आणि केसांवर याचा वापर करणं गरजेचं असलं तरी त्याआधी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच माहीत असायला हवी. ती ही की, ब्युटी प्रॉडक्ट कितीही फायदेशीर असले तरी त्यांचा अती वापर तुमच्या सौंदर्यासाठी हानिकारक ठरू शकतो. प्रत्येक ब्युटी प्रॉडक्टवर त्यात असणाऱ्या घटकांची माहिती असते. शिवाय कोणतेही ब्युटी प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी ही माहिती नीट वाचा. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या त्वचा आणि केसांसाठी ते योग्य आहे का हे समजेल. त्याचप्रमाणे काही ब्युटी प्रॉडक्टच्या अती वापर केल्यामुळे तुमच्या त्वचा आणि केसांचे नुकसानदेखील होऊ शकते. यासाठी जाणून घ्या कोणत्या ब्युटी प्रॉडक्टचा किती वापर करावा. 

बॉडी स्क्रब

स्कीन केअर रूटीनमध्ये त्वचेला स्वच्छ करण्यासाठी ती वेळोवेळी स्क्रब करणंही महत्त्वाचं आहे. आजकाल बाजारात तयार बॉडी अथवा फेस स्क्रबर मिळतात. ज्यांचा वापर करून तुम्ही त्वचा नक्कीच स्वच्छ करू शकता. या स्क्रबरमुळे त्वचेवरील धुळ, माती, प्रदूषण आणि डेडस्कीन निघून जाण्यास मदत होते. मात्र लक्षात ठेवा या स्क्रबरचा वापर आठवड्यातून एक अथवा जास्तीत जास्त दोनदाच करा. जर तुम्ही या स्क्रबरचा यापेक्षा अधिक वापर केला तर तुमच्या त्वचेवर याचे चुकीचे परिणाम दिसू शकतात.

Shutterstock

क्लिंझिंग ब्रश –

आजकाल चेहरा स्वच्छ करण्यासाठी चेहऱ्यावर क्लिंझिंग ब्रशचा वापर केला जातो. बाजारात असे विविध क्लिंझिंग ब्रश विकत मिळतात. मात्र जर तुम्ही या ब्रशचा अती वापर केला तर तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं हे तुम्हाला माहीत आहे का ? त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि गरजेपुरताच या ब्रशचा वापर करा.

हेअर शॅंम्पू –

केस स्वच्छ करण्यासाठी शॅम्पूचा वापर करणं नेहमीच फायद्याचं आहे. मात्र त्याआधी तुम्हाला तुमच्या केसांचा प्रकार ओळखता यायला हवा. कारण जर तुम्ही केसांवर चुकीचा शॅंम्पू वापरला तर त्याचा फायदा नक्कीच होणार नाही. शिवाय दररोज केसांवर शॅम्पू करणंही योग्य नाही कारण अशामुळे तुमचे केस कोरडे आणि निस्तेज होऊ शकतात. यासाठी शॅंम्पू केसांवर आठवड्यातून दोन ते तीन वेळाच वापरा. 

Shutterstock

लिपस्टीक –

लिपस्टीक हा प्रत्येक स्त्रीचा एक जिव्हाळ्याचा विषय असू असतो. प्रत्येकीकडे तिच्या आवडीच्या रंगाच्या लिपस्टीकचं एक खास कलेक्शन असतं. मात्र दररोज आणि गरज नसताता लिपस्टीकचा वापर करू केल्यामुळे तुमच्या ओठांचे नुकसान होऊ शकते. लिपस्टीकच्या अती वापरामुळे तुमच्या ओठांचा नैसर्गिक रंग आणि मऊपणा कमी होऊ शकतो. यासाठी लिपस्टीकचा वापर कमीत कमी करा. 

Instagram

नेलपॉलिश –

नेलपॉलिशमुळे तुमची नखं सुंदर आणि हात आकर्षक दिसत असले तरी याचा वापर जाणिवपूर्वकच करायला हवा. कारण नेलपॉलिश ब्रँड तुमच्या नखांमधील नैसर्गिक चमक कमी करतात. म्हणूनच दररोज नखांवर नेलपॉलिश लावणं टाळा. ज्यामुळे नखांना पूरेसं ऑक्सिजन मिळेल आणि नखं नेलपॉलिश न लावताही सुंदर दिसतील. 

Shutterstock

फोटोसौजन्य – शटरस्टॉक आणि इन्साग्राम

अधिक वाचा –

नखांशिवाय नेलपेंटचा असाही होऊ शकतो वापर

नैसर्गिकरित्या मिळवा सुरकुत्यांपासून सुटका, सोपे घरगुती उपाय

चेहऱ्यावरील ओपन पोअर्स तुम्हाला असे करता येतील कमी

Read More From Natural Care