Age Care

पावसाळ्यातही त्वचेसाठी सनस्क्रिन महत्वाचे, नाहीतर होतील हे त्रास

Leenal Gawade  |  Jun 18, 2019
पावसाळ्यातही त्वचेसाठी सनस्क्रिन महत्वाचे, नाहीतर होतील हे त्रास

रणरणत्या उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरु झाला की अनेकांना बरं वाटतं. बरं वाटण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक महत्वाचे कारण असे की, पावसाळ्यात बोचरं उन नसतं. म्हणजेच तुमची त्वचा टॅन होण्याची शक्यता फारच कमी असते. तुम्हालाही असं वाटत असेल की, उन्हाळ्यात त्वचा टॅन होत नाही. सूर्य किरणांचा त्रास तुम्हाला होत नाही. त्वचेवर सनस्क्रिन लावण्याची गरज नाही. असे तुम्हालाही वाटत असेल तर तुम्हाला हे वाचण्याची गरज आहे. कारण पावसाळ्यातही त्वचेसाठी सनस्क्रिन महत्वाचे असते, नाहीतर तुम्हाला त्वचेशी निगडीत त्रास होऊ शकतात. उन्हाळ्यात सनस्क्रिन का गरजेचे आहे ते जाणून घेऊया

अतिनील किरणांचा होऊ शकतो त्रास

shutterstock

बाहेर ढगाळ वातावरण असेल किंवा धो धो पाऊस कोसळत असेल. पण लक्षात घ्या ढगांमुळे सूर्य हा लपला जातो पण तरीही त्याची अतिनील किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचतात. या अतिनील किरणांचा तुमच्या त्वचेवर जसा परिणाम उन्हाळ्यात होतो. अगदी तसाच तो पावसाळ्यात होऊ शकतो.तुम्ही सनस्क्रिन न लावता घराबाहेर पडाल तर त्याचा त्रास तुम्हाला तुमच्या त्वचेवर लगेचच जाणवून येईल. सूर्याच्या अतिनील किरणांना रोखायचे असेल तर तुम्ही सनस्क्रिन हे लावायलाच हवे. तर तुमची त्वचा चांगली राहील.

Also Read About टॅनिंग ऑइलचे फायदे

चेहऱ्यांना वाचवा सुरकुत्यांपासून

Shutterstock

चेहरा चांगला टवटवीत दिसावा असे प्रत्येकाला वाटते. जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर तुमचा चेहर थोराड दिसू लागतो. अतिनील किरणांचा त्रास जास्त झाला की, तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात. या अतिनील किरणांना तुमच्या त्वचेवर येण्यापासून रोखण्यासाठी तुम्हाला अगदी पावसाळ्यातही सनस्क्रिन लावणे आवश्यक असते.

चेहरा काळवंडण्याची भिती पावसाळ्यातही

shutterstock

अनेकांना पावसाळा आला की जास्त आनंद होतो. त्यांना वाटते की, आता चेहरा काळवंडण्याचे दिवस गेले. पण सूर्याचा प्रकाश या ढगांमधूनही येत असतो. त्यामुळे चेहरा काळवंडण्याची भिती ही या वातावरणातसुद्धा असते. पण फरक इतकाच की, तुमच्या चेहऱ्यात झालेला हा बदल लगेचच जाणवत नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमची त्वचा अनइव्हन नको असेल तर मात्र तुम्ही सनस्क्रिन लावायला हवे.

योग्य सनस्क्रिनची निवड महत्वाची

shutterstock

आता सनस्क्रिन लावण्याचा सल्ला देताना योग्य सनस्क्रिन लावणे देखील महत्वाचे असते. पावसाळ्यासाठी सनस्क्रिन निवडताना तुम्हाला सिलिकॉन बेस सनस्क्रिन निवडणे आवश्यक असते. असे सनस्क्रिन तुमचा चेहरा तेलकट करत तर नाहीच. शिवाय ते पावसात निघून जाण्याची भितीही फारच कमी असते. त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रतीने सनस्क्रिन या दिवसांसाठी निवडा.

*पावसाळ्यात जास्त SPF जास्त निवडण्याची गरज नसते. तुम्ही अगदी 10 ते 50 पर्यंतचे सनस्क्रिन निवडण्यास काहीच हरकत नाही.

कसे लावाल सनस्क्रिन

त्यामुळे आता हवामान कोणतेही असो. तुम्हाला घराबाहेर पडताना तुम्हाला सनस्क्रिन लावल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही. तुमच्या त्वचेला शोभतील असे सनस्क्रिन योग्य सल्ला घेऊन  निवड. आणि आम्ही दिलेल्या टीप्स नक्कीच लक्षात ठेवा.

Read More From Age Care