आरोग्य

म्हणून महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असते…

Dipali Naphade  |  Jul 22, 2019
sleep

तुम्ही कधी विचार केला आहे का? जर दिवसभर तुमची झोप 8 तास पूर्ण झाली नसेल तर तुम्ही दिवसभर चिडचिड करता आणि तुमचं डोकं सतत दुखत राहातं. असं होण्याचं कारण आपल्या डोक्याला जितका जास्त आराम मिळायला हवा तितका तो मिळत नाही. मुख्यत्वे महिलांच्या बाबतीत हे जास्त घडताना दिसून येतं. त्यांना नेहमीच आपल्या झोपेशी तडजोड करावी लागते. आधी शिक्षणासाठी, मग मुलांच्या मागे आणि ऑफिसमुळे. बऱ्याच महिला सकाळी घरात सर्वात आधी उठतात आणि झोपतातही सर्वात नंतर. त्यामुळे त्यांच्या झोपेची वेळ ही अत्यंत कमी होते. पण हे महिलांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. जितकं काम तितकाच आराम करण्याची गरज प्रत्येकाला असते. एका रिसर्चमध्ये हे महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची आवश्यकता असते हे सिद्ध झालं आहे. 

रिसर्च नक्की काय सांगतो?

पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मेंदू हा जास्त जटील असतो आणि त्यामुळेच महिलांना पुरुषांपेक्षा किमान 20 मिनिट्स अधिक झोपेची गरज भासते. हा रिसर्च साधारण 210 पुरुष आणि महिलांवर करण्यात आला होता. त्याच्या परिणामामध्ये हे सिद्ध झालं आहे.

ही आहेत महत्त्वाची कारणं

GIPHY

– महिलांचा मेंदू हा पुरुषांच्या मेंदूच्या तुलनेत जास्त कार्यरत असतो

– मुलांची काळजी, घरातील महत्त्वाची कामं, जोडीदाराचं घोरणं या सगळ्यामुळे महिलांच्या झोपेवर परिणाम होत असतो

– पुरुषांंच्या तुलनेत महिला पाचपटीने सूचनेचं आदान प्रदान करतात

– मल्टीटास्किंग असल्यामुळे महिलांचा मेंदू हा जास्त थकतो

कोणत्या वयात किती हवी झोप

GIPHY

चांगल्या आणि गाढ झोपेसाठी खास टिप्स

Shutterstock

– कधीही रात्री आंघोळ केल्या केल्या झोपू नका. आपल्या शरीराचं तापमान हे सामान्य असतं. त्यामुळे तुम्ही सामन्य तापमान असतानाच झोपलात तर तुम्हाला चांगली आणि गाढ झोप लागते. 

– झोपण्यापूर्वी कधीही चहा, कॉफी अथवा कोणत्याही प्रकारचं एनर्जी ड्रिंक तुम्ही पिणं योग्य नाही. तर त्याऐवजी तुम्ही गरम दूध पिऊ शकता. त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते. 

– मोबाईल फोन अथवा टीव्ही बघत झोपायची सवय तुम्हाला असेल तर ही सवय लगेच सोडा. कारण यामुळे तुमची झोप उडते. तुमच्या डोळ्याला त्रास होण्याची शक्यता असते. 

– जेव्हा तुम्ही झोपण्यासाठी बेडवर आडवे व्हाल तेव्हा दिवसभराच्या गोष्टींंचा विचार मनात आणू नका. कारण या विचारांनी तुम्हाला सतत तुटक झोप लागते. नेहमी झोपताना चांगल्या आणि सकारात्मक गोष्टीचा विचार करा. 

महिलांना आपला मेंदू तल्लख ठेवण्यासाठी झोप मिळणं अत्यंत गरजेचं असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही वागा. पुरुष हे एकावेळी एकच काम करू शकतात. पण महिलांमध्ये एका वेळी अनेक काम करण्याची क्षमता असते. त्यामुळे महिलांचा मेंदू जास्त प्रमाणात काम करत असतो आणि त्याचमुळे महिलांना पुरुषांपेक्षा झोपेची जास्त आवश्यकता असतं असं रिसर्चमधून सिद्ध झालं आहे.

हेदेखील वाचा 

दिवसभर झोप येत असेल तर नक्की ट्राय करा ‘या’ टिप्स

तुम्हालाही होतोय का अपुऱ्या झोपेचा त्रास

तुम्हाला पोटावर झोपायची सवय असल्यास, त्वरीत बदला ही सवय

 

Read More From आरोग्य