लांबसडक आणि काळेभोर केस स्त्रीच्या सौंदर्यात अधिक भर घालतात. एखादीचे असे लांब केस पाहिले की आपल्याही असे लांब केस हवे असे वाटू लागते. मात्र लांब केसांची निगा राखणं वाटतं तिकतं सोपं नक्कीच नाही. प्रदूषण, धुळ, माती आणि वातावरणातील बदल यांचा केसांवर सतत परिणाम होत असतो. यासाठीच ज्यांचे लांबसडक केस असतील त्यांनी केसांची निगा राखताना या चुका जाणिवपूर्वक टाळाव्या.
लांब केस असतील तर टाळा या चुका
लांब केस धुताना आणि विंचरताना काही गोष्टी टाळल्या तर या केसांची निगा राखणं नक्कीच सोपं जातं.
- केस लांब असतील तर सोडवण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणून जर तुम्ही दररोज केस विंचरत नसाल तर ही चूक कधीच करू नका. कारण यामुळे तुमच्या केसांचा गुंता अधिक वाढेल आणि चिकटपणामुळे केसांचे इनफेक्शन होईल.
- लांब केसांवर कंडिशनर लावण्याचा कंटाळा करू नका. कारण त्यामुळे केस मऊ आणि मजबूत होतात. यासाठी केस धुतल्यावर थोडं कंडिशनर हातावर घ्या आणि केसांच्या टोकाकडे लावा.
- लांब केसांवर प्लास्टिकचा कंगवा अथवा हेअर ब्रश वापरू नका. कारण त्यामुळे तुमचे केस मोठ्या प्रमाणावर गळू शकतात. स्काल्प निरोगी राहण्यासाठी चांगल्या ब्रॅंडचे कंगवे आणि ब्रश वापरा.
- केस लांब असावे असं जरी वाटत असलं तरी दोन ते तीन महिन्यातून एकदा केस ट्रिम करणं गरजेचं आहे. असं नाही केलं तर केसांची वाढ कमी होते.
- रात्री झोपताना केस मोकळे सोडू नका. लांब केस असल्यामुळे ते घट्ट बांधून ठेवणे बऱ्याचदा शक्य नसते. मात्र जर तुम्ही ते मोकळे ठेवून झोपलात तर तुमचे केस झोपेत ताणून तुटण्याची शक्यता अधिक वाढते.
- लांब केसांचा हाय पोनीटेल सतत बांधू नका. जरी ही हेअर स्टाईल छान दिसत अशती तरी असे केस वर सतत बांधून ठेवल्यामुळे तुमचे केस कमजोर होतात आणि तुटू लागतात. यासाठी लांब केसांची सैल हेअर स्टाईल करा.
- केसांना नियमित हेअर मसाज न करणे ही खूप मोठी चूक ठरेल. यासाठी केसांना आठवड्यातून दोनदा तेलाने मसाज करा ज्यामुळे केस मजबूत होतील.
- हेअर स्टाईल केल्यावर ती लवकर खराब होऊ नये यासाठी केसांवर हेअर स्प्रे लावणार असाल. तर सावध राहा कारण यामुळे तुमचे केस अधिक रूक्ष आणि कमजोर होतील.
- जर तुमचे केस लांब असतील तर मुळीच बॅक कोंबिग करू नका. कारण यामुळे तुमच्या केसांचा व्हॉल्युम वाढेल पण केसांचे नुकसान जास्त होईल.
- केस धुतल्यावर लगेच सुकावे यासाठी हेअर ड्राअर, हेअर स्ट्रेटनर वापरण्याची अनेकांना सवय असते. मात्र असं केल्यायमुळे तुमचे लांबसडक केस कमजोर होतील आणि गळू लागतील.
घरगुती उपाय करून तुमचे केस करा डिटॉक्स, जाणून घ्या पद्धत
कोरड्या आणि निस्तेज केसांची पावसाळ्यात अशी घ्या काळजी