Long Hair

सुंदर केसांसाठी ट्राय करा रेडिमेड पण नॅचरल सप्लिमेंट्स

Leenal Gawade  |  Aug 10, 2021
सुंदर केसांसाठी सप्लिमेंट

वाढते प्रदूषण आणि बदलेले लाईफस्टाईल याचा परिणाम अप्रत्यक्षरित्या आरोग्यावर होऊ लागला आहे. अगदी लहानमुलींचे केसही हल्ली गळू लागले आहेत. खूप जणांना केसगळतीमुळे काय करावे आणि काय करु नये असे वाटू लागते. हल्ली बाजारात असे काही नॅचरल सप्लिमेंट मिळतात. जे तुमच्या केसांमध्ये अवघ्या काहीच दिवसांमध्ये बदल घडवून आणतात. जर तुमच्या केसांमध्ये तुम्हाला काहीही बाकीचे सगळे उपाय करुन बदल जाणवत नसेल तर तुम्ही या काही नॅचरल सप्लिमेंट घेऊ शकता. त्यामुळे केसांमध्ये बदल होण्यास नक्कीच मदत मिळते. जाणून घेऊया सुंदर केसांसाठी रेडिमेड पण नॅचरल सप्लिमेंट

केस गळत असतील तर वापरा भृंगराज तेल, जाणून घ्या फायदे

हेअर गमीस 

केसांसाठी आवश्यक असलेले घटक म्हणजे बायोटीन, मल्टी विटामिन्स आणि झिंक हे घटक असलेले गमीज हल्ली बाजारात मिळतात. एखाद्या जेली कँडीप्रमाणे या असतात. हे खाल्ल्यामुळे तुमच्या केसांना आवश्यक असलेले घटक मिळतात. या गमीज दिवसाला एकच कोणत्याही जेवणानंतर खायचे असतात. शरीरामध्ये झालेली कमतरता भरुन काढण्याचे काम या गमीज करतात. या गमीज अजिबात कोणत्याही औषधाप्रमाणे लागत नाहीत तर या छान चॉकलेट प्रमाणे लागतात त्यामुळे त्या खाताना त्याची चव चांगलीच लागते. साधारण 15 दिवसानंतर तुम्हाला यामध्ये झालेला फरक दिसू लागतो. केसांच्या वाढीला चालना देत केसांना सुंदर आणि चमकदार करण्याचे काम हेअर गमीज करतात. त्यामुळे तुम्ही साधारण महिनाभर तरी याचे सेवन करा. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळेल.

कच्चे मूग खाण्याने मिळतो शरीराला फायदा, जाणून घ्या

हेअर डिफ्युज टॅबलेट

केसांसाठी बाजारात आणखी काही अशा सप्लिमेंट मिळतात. ज्या तुम्हाला एखाद्या कोल्ड्रिंक प्रमाणे प्यायच्या असतात. या पाण्यात विरघळतात. ज्यामुळे ते गोड पाणी प्यायला फारच जास्त मजा येते. यामध्ये केसांना आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या घटकांचा समावेश असतो. या गोळ्या हेअरटाईड डब्यामध्ये असतात. या गोळ्या पाण्या टाकल्यानंतर पटकन विरघळतात. त्या पूर्ण विरघळल्यानंतर तुम्ही हे पाणी पिऊ शकता. तुम्हाला केसांमध्ये झालेला फरक हा साधारण आठवडाभरांनंतर दिसू लागतो. हा फरक तुम्हाला नक्कीच आवडेल असा आहे. त्यामुळे तुम्ही त्याचे सेवन नक्की करा. रोज रात्री जेवणानंतर झोपताना तुम्ही हे सप्लिमेंट घ्या 

आता सुंदर केसांसाठी हे सप्लिमेंट नक्की ट्राय करा. 

वर्जिन हेअर म्हणजे काय, त्यावर प्रयोग करताना या गोष्टी ठेवाव्यात लक्षात

काखेतील पुळी किंवा संसर्ग टळण्यासाठी अशी घ्या काळजी

Read More From Long Hair