मुंबईत थंडी पडू लागताच सगळ्यांच्या वॉर्डरोबमधील स्वेटर आणि शॉल्स बाहेर पडतात. वर्षभर हे लोकरी किंवा वुलनचे कपडे आपण वॉर्डरोबमध्ये ठेवलेले असतात आणि थंडीतच त्यांचा शरीराला उब मिळवण्यासाठी उपयोग केला जातो. पण काहींना मात्र लोकरीचे स्वेटर किंवा शाल म्हटल्यावर मात्र थोडं टेन्शनच येतं. कारण आहे वुलन अलर्जी. तुम्हाला माहीत आहे का या अलर्जीबद्दल. जाणून घेऊया काय आहे नेमकी वुलन अलर्जी आणि त्यावरील उपाय.
वुलन अलर्जीची लक्षणं
लोकरी किंवा वुलनचे कपडे घातल्यावर चेहरा लाल होणं, शरीरावर सूज येणं, स्कीन स्केली किंवा पापुद्रेदार होणं, नाक चोंदणं, खाज येणं आणि रॅशेस येणं. दरवर्षी जवळपास 10 ते 15 टक्के महिलांना वुलन अलर्जीच्या समस्येचा सामना करावा लागतो.
- त्वचेच्या संपर्कात येताच रेडनेस येणं
जर तुम्हाला लोकरीचे कपडे घातल्यावर जर तुम्हाला खाज येऊ लागली किंवा स्कीनवर फोड आले तर समजून जा की तुम्हाला वुलन अलर्जी आहे. साधारणतः हा त्रास हातांना किंवा पायाला होतो. एक्सपर्ट्सनुसार, लोकरी आणि त्वचेमध्ये होणाऱ्या घर्षणामुळे हा त्रास होतो. ज्यामुळे त्वचा खाज येणं किंवा लाल होणंयासारखा त्रास होतो.
- सर्दी नाही स्कीन अलर्जी
काहींना त्वचेला खाज येण्यासोबतच सर्दीसारखंही होतं. एवढंच नाहीतर डोळ्यातूनही काहीवेळा पाणी येतं. आपल्याला वाटतं की, थंडीमुळे सर्दी झाली आहे पण खरंतर ही सर्दी होते स्कीन अलर्जीमुळे.
- संवेदनशील त्वचा असल्यास
जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर डॉक्टरांच्यानुसार, ही अलर्जी होण्याची शक्यता जास्त असते. जास्तकरून महिला, मुलं आणि वयोवृद्धांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते. दुसरं कारण म्हणजे त्वचा कोरडी होणं. जर त्वचा संवेदनशील असेल आणि सोबतच त्वचा कोरडी झाली असेल तर ही अलर्जी होण्याची शक्यता जास्त असते.
वुलन अलर्जीवरील उपाय
- वुलन अलर्जीवर खरंतर काही परमनंट उपाय नाही. पण थोड्या वेळासाठी औषधांनी याचा त्रास कमी होऊ शकतो. पण औषधांचा परिणाम संपताच पुन्हा ही अलर्जी जाणवतेच.
- यावरील अजून एक उपाय म्हणजे फुल स्लीव्ह्सचे आणि कॉटन इनरवेअर घालणे. यामुळे तुमची त्वचा लोकरीच्या थेट संपर्कात येणार नाही म्हणजे अलर्जी टाळता येईल.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
हेही वाचा
पावसाळ्यात तुम्हालाही जाणवतात का हे Skin Problems
डोळ्यांखाली येणारी खाज, होणारी जळजळ घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय