Fitness

जेवणानंतर लगेचच पाणी पिता का, मग तुमचं आरोग्य आहे धोक्यात

Harshada Shirsekar  |  Nov 27, 2019
जेवणानंतर लगेचच पाणी पिता का, मग तुमचं आरोग्य आहे धोक्यात

पाणी म्हणजे जीवन…  पाण्याशिवाय जीवसृष्टी जिवंत राहणं अशक्य आहे. आपल्या शरीरातही 60 टक्के पाण्याचा समावेश आहे. जीवनदान म्हणून लाभलेल्या याच पाण्यामुळे आपल्या आरोग्याचे प्रचंड नुकसान देखील होतं, असं कधी ऐकलं आहे? पण हे खरं आहे. पाणी कधी प्यावे, कधी पिऊ नये, कसं प्यावं, ठरलेल्या वेळीच का प्यावे… या छोट्याछोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून तुम्ही शरीराचं मोठं नुकसान करत आहात. जेवणानंतर लगेचच पाणी पिऊ नये, असं आपण अनेकदा ऐकलं असेल. पण याचं पालन केलं आहे का? जेवणानंतर तुुम्हाला लगेचच पाणी पिण्याची सवय असेल तर ती बदलणं गरजेचं आहे. अन्यथा गंभीर परिणांना सामोरं जाण्याची शक्यता आहे. 

(वाचा : निरोगी आरोग्याचं रहस्य, सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ)

जेवणानंतर लगेचच पाणी पिऊ नये, कारण…

1. जेवणानंतर पाणी प्यायल्यास पचनक्रियेत बिघाड होण्याची शक्यता असते.
2. अन्नपदार्थांचे सेवन केल्यानंतर प्रोटीन आणि अन्य पोषकतत्त्वे संपूर्ण शरीरापर्यंत पोहोचण्यास थोडा वेळ लागतो. खाल्ल्यानंतर लगेच पाणी पोटात गेल्यास या प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो. यामुळे जेवणानंतर जवळपास 30 मिनिटे पाण्याचा एकही घोट पिऊ नये.
3. आहारतज्ज्ञांच्या मते, आपण जे काही खातो ते पचण्यास जवळपास दोन तासांचा अवधी लागतो. जेवण अन्ननलिकेतून पोटापर्यंत पोहोचते. यादरम्यान पोटात तयार होणारे द्रव पदार्थ पचनक्रियेत मदत करतात. पोषक घटक शरीराला मिळाल्यानंतर विषारी घटक मलाच्या स्वरुपात शरीराबाहेर फेकले जातात. पण समजा याचवेळेस जर तुम्ही पाणी प्यायलात तर ही प्रक्रिया पूर्णतः बिघडते.
4. गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्या देखील वाढतात.
5. जेवणानंतर पाणी प्यायल्यानं शरीराचं तापमानदेखील बदलते. याचा जेवण्यासाठी आवश्यक असलेल्या तापमानावर परिणाम होतो.
6. पचनक्रिया बिघडल्यानं शरीरात प्रचंड प्रमाणात जेवण तसंच राहतं. याचं ग्लुकोज तयार होऊन त्याचं चरबीमध्ये रुपांतर होतं. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा यांसारख्या आजारांची समस्या निर्माण होऊ शकते.
यामुळे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी पिणं जितकं गरजेचं आहे, तितकंच आरोग्याच्या दृष्टीनं पाणी कोणत्या वेळेस प्यावं हे ठरवणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे.

(वाचा : बिनधास्त खा तळलेले पदार्थ, फॉलो करा ‘या’ हेल्दी टिप्स)

जेवणानंतर पाणी न पिण्यासंदर्भात आयुर्वेदात काय म्हटलं आहे ?

आयुर्वेदातही जेवणानंतर लगेचच पाणी पिण्यास मनाई आहे. जेवणानंतर पाणी पिणं म्हणजे शरीरासाठी विषसमान असल्याचं आयुर्वेदात सांगितलं गेलं आहे. आयुर्वेदानुसार, जे काही आपण खातो ते पोटाच्या उलट दिशेला असणाऱ्या जठराग्निमध्ये जाऊन पचते. जेवण केल्यानंतर जठराग्नि तब्बल तासभर सक्रिय असते. अन्नपदार्थ पचवण्यासाठी जठरातील अग्नि मदत करते. त्यामुळे जेवणानंतर तुम्ही पाणी प्यायल्यात तर ती अग्नि शांत होते. परिणामी पचनप्रक्रियेत अडचणी निर्माण होतात. ही समस्या लक्षात घेऊनच आयुर्वेद म्हणतं की, जेवणानंतर एक तास पाणी पिऊ नये. निरोगी आरोग्याची ही गुरूकिल्ली आहे. 

(वाचा : सावधान! तुम्हाला कमी झोपण्याची सवय आहे, होतील ‘हे’ गंभीर आजार)

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Fitness