लग्न ठरल्यानंतर आपल्याला लग्नात सुंदर दिसायचं असतं आणि त्यासाठी फिटदेखील राहायचं असतं. लग्न ठरल्यावर फिट दिसायचं असेल आणि अप्रतिम फिटनेस राखायचा असेल तर अगदी लग्न ठरलेल्या दिवसापासून तुम्ही रोज योगासन करणे हा उत्तम उपाय आहे. तुम्ही अधिक बारीक आणि फिट होण्यासाठी योगासनामधील अशी काही आसने आहेत जी केल्यानंतर तुम्हाला लग्नामध्ये स्वतःला अगदी फिट राखणं शक्य होतं. लग्नामध्ये तुम्हाला वजन कमी करून बारीक व्हायचं असेल तर तुम्ही नक्कीच या लेखातून आम्ही दिलेली माहिती वाचायला हवी. असे कोणते योग (Yoga)आहेत जे तुम्हाला बारीक आणि स्लिम ट्रीम करू शकतात ते जाणून घ्या. आम्ही या लेखातून तुम्हाला असे तीन योगासने सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही लग्न ठरलेल्या दिवसापासून सुरूवात केली तर तुमच्या लग्नाच्या दिवशी तुम्ही नक्कीच फिट असाल.
सर्वांगासन
Freepik
सर्वांगासनामध्ये तुमच्या संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो आणि त्यामुळे तुमचे शरीर अधिक लवचिक होण्यास मदत मिळते. हे आसन कसे करायचे ते जाणून घ्या.
- सर्वात पहिले योगा मॅट घालून घ्या. त्यावर कमरेच्या बाजूने झोपा. त्यानंतर तुम्ही अतिशय हलक्या पद्धतीने तुमचे पाय, नितंब आणि पाठ वरच्या बाजूने उचला आणि खांद्याच्या वर दिसतील अशा रेषेत घ्या
- तुमच्या हाताचे कोपरे एकमेकांजवळ आणा आणि तुमचे हात तुमच्या पाठीच्या जवळ खांद्याच्या रेषेत येतील असे ठेवा. कोपर जमिनीवर आणि हात पाठीवर दाबून ठेवा. त्यानंतर पाय आणि पाठीचा कणा हा अगदी सरळ रेषेत ठेवा.
- तुमच्या शरीराचे वजन हे तुमचे डोकं आणि मान यावर न जाता तुमच्या खांद्यावर आणि हातावर तुम्हाला पेलता यायला हवे
- पाय याच रेषेत स्थिर ठेवा. त्यानंतर तुमच्या टाचा अशा स्वरूपात उचला की, तुम्ही छताला पाय टेकवणार आहात. पायाचा अंगठा सरळ रेषेत आणा. त्यानंतर पायाची बोटे ही छताच्या दिशेने वर करा. तुमची मान दुखणार नाही याकडे लक्ष द्या. मानेवर जरा जरी ताण जाणवला तरीही हे आसन तुम्ही सोडून द्या
- आसन सोडताना पहिले गुडघे कपाळाच्या दिशेने घेऊन या. हात जमिनीवर आणा. हाताचे तळवे जमिनीवर टेकवा. डोकं न उचलता हळूहळू पाय खाली आणा. सरळ रेषेत झोपा आणि साधारण एक मिनिट आराम करा.
सर्वांगासनाचा फायदा –
- थायरॉईड आणि पॅराथायरॉईड ग्रंथीना चालना देते
- हात आणि खांद्यांना मजबूती मिळवून देते. तसंच पाठीचा कणा अधिक लवचिक होतो
- मेंदूला चांगला रक्तपुरवठा मिळतो
- पोटातील चरबी कमी करण्यास मदत मिळते. तसंच अपचन, मलावरोधाचा त्रास असेल तर यामुळे हा त्रास कमी होऊन पोट स्वच्छ राखण्यास मदत मिळते
त्रिकोणासन
Freepik
त्रिकोणासनामुळेही तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. हे आसन नक्की कसे करायचे आणि याचा काय फायदा आहे ते आपण जाणून घेऊया.
- योगा मॅटवर उभे राहा. दोन्ही पायांच्या दरम्यान साधारण तीन ते चार फूटाचे अंतर ठेवा
- उजवा पाय 90 अंशाच्या कोनात ठेवा. आपल्या उजव्या पायाच्या टाचांजवळ हात टेकवा. दुसरा हात वर करा
साधारण 8 सेकंद तसेच राहा आणि मग पुन्हा हळूहळू उभे राहा - डाव्या पायासह पुन्हा तसेच करा
- हे करत असताना श्वास हळूवार घेतत राहा. शरीर वाकताना कंबर सरळ रेषेत आहे की नाही याकडे लक्ष द्या. हात खाली टेकवताना डोके वरच्या हाताकडे ठेवा. जेणेकरून शरीराला चांगला व्यायाम होऊ शकेल
त्रिकोणासनाचे फायदे –
- पोटाची चरबी कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो
- वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. आपला लठ्ठपणा कमी होऊन पोटातील चरबी कमी होते. या आसनामुळे पोटावर ताण येतो आणि चरबी कमी होण्यास मदत मिळते
- सतत काम करून पाठीचे दुखणे असेल तर त्यासाठीही तुम्ही नियमित त्रिकोणासन करू शकता
धनुरासन
Shutterstock
धनुरासनामुळे पाय, हात, पाठीचे, कंबरेचे आणि पोटाचे स्नायू बळकट होतात. मुख्यतः पाठीची लवचिकता वाढण्यास मदत होते. शरीरातील तणाव आणि आळसदेखील कमी होतो.
- योगा मॅटवर पोटाच्या बाजूने झोपावे. दोन्ही पायांमध्ये किंचितसे अंतर ठेवावे. हात शरीराजवळ ठेवावेत.
- पाय गुडघ्यात मोडून हातानं पायाचे घोटे पकडावेत. घोटे पकडताना अंगठा आतील बाजूस असावा.
- श्वासोच्छवास सुरू ठेवत पाय आणि डोके एकाच वेळेस वर उचलावेत. ही प्रक्रिया अतिशय हळूवार करावी.
- आपल्या क्षमतेनुसार धनुरासनाच्या अंतिम स्थितीमध्ये राहावे. अंतिम स्थितीत तुमचे शरीर धनुष्यबाणाप्रमाणे दिसेल याची काळजी घ्यावी
धनुरासनाचे फायदे –
- पोटावर जोर येऊन तुमची चरबी कमी होण्यास आणि पोटाचा आकार योग्य होण्यास मदत मिळते
- हात, पाठ आणि पोटाचे स्नायू अधिक बळकट होतात
- लवकरात लवकर पोट कमी करण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक