आमीर खान बॉलीवूडमध्ये परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने तयार केलेला अथवा एखादी भूमिका साकारलेला चित्रपट पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असते. कारण एखादी भूमिका असो वा संपूर्ण चित्रपट आमीर त्यात स्वतःचा जीव ओततो. काही दिवसांपूर्वीच आमीर खान आणि भारताचा बुद्धीबळ ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी एकत्र बुद्धीबळ खेळले होते. वास्तविक हा चॅरिटी सामना होता. या सामन्यामधून मिळणाऱ्या पैशांमधून कोरोना महामारीसाठी देणगी देण्यात आली होती. मात्र चाहत्यांसाठी आमीर आणि विश्वनाथन आनंद एकत्र येणं ही एक पर्वणीच ठरली. आमीर खानने या सामन्यात सामाजिक कार्यासाठी भाग घेतलेला असला तरी त्याने या सामन्यानंतर त्या्च्या मनातील सुप्त इच्छादेखील व्यक्त केली आहे. आमीरला आता मोठ्या पदड्यावर विश्वनाथन आनंद साकारायचा आहे.
का आणि कसा साकारायचा आहे आमीरला विश्वनाथन आनंद
आमीर आणि विश्वनाथन आनंद यांच्यात रंगलेल्या सामन्यानंतर एक फन चॅटमध्ये भाग घेतला होता. ज्यामध्ये आमीरने त्याच्या मनातील इच्छा व्यक्त केली आहे. या मुलाखतीत आमीरला विचारण्यात आलं होतं की जर तुला विश्वनाथन आनंदच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका मिळाली तर तुला ती करायला आवडेल का? यावर आमीरने हसत हाय काय प्रश्न आहे, हा माझ्या प्रश्नांमधील एक सोपा प्रश्न आहे असं म्हणत याचं उत्तर दिलं होतं. तो म्हणाला होता की, विशी ( आमीर खान विश्वनाथन आनंदला प्रेमाने विशी म्हणतो) साकारणं ही माझ्यासाठी सन्मानाची आणि आनंदाची गोष्ट असेल. त्याच्या मेंदू जाणून घेणं ही एक रोमांचक गोष्ट आहे. कारण मी जेव्हा एखादी काल्पनिक भूमिका साकारतो तेव्हा त्या व्यक्तीच्या विचार म्हणजेच मेंदूप्रमाणे विचार करण्याचा प्रयत्न करतो. विशी तर असं प्रभावी व्यक्तीमत्त्व आहे ज्याचा मेंदू नेमका कसा विचार करतो यावर मी खूप वेळ घेऊन अभ्यास करेन. यासाठी मी त्याच्या पत्नी आणि कुटुंबासोबत चर्चा करेन ज्यामुळे तो काय आणि कसा विचार करतो हे जाणून घेता येईल. मग जेव्हा मी मोठ्या पडद्यावर विशी साकारेन तेव्ही विशीलाच सरप्राईझ करेन. विश्वनाथनला हे उत्तर ऐकून हसू आवरता आलं नाही.
लवकरच प्रदर्शित होणार लाल सिंह चड्ढा
आमीरचा आगामी चित्रपट लाल सिंह चड्ढा कोरोना महामारीमुळे बराच रखडला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करिना कपूर असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदनने केलेलं आहे. लाल सिंह चड्ढा हॉलीवूडच्या फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट 2020 च्या ख्रिसमसला प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे आता हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोनामुळे अनेक चित्रपट मागच्या दीड वर्षापासून रखडले आहेत. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आहे. या काळात झालेले लॉकडाऊन आता काही प्रमाणात शिथील होत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होतात हे सर्व बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे लवकरच आमीरचा लाल सिंह चड्ढा प्रेक्षकांना पाहता येईल अशी अपेक्षा आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
नव्या फोटोशूटमध्ये श्रुती मराठेच्या घायाळ करणाऱ्या अदा, चाहते फिदा
अविका गौरचा कौतुकास्पद निर्णय, नाकारली या कारणासाठी जाहिरात
प्रेक्षकांसाठी अभिनयाची ‘अजूनही बरसात आहे’ मुक्ता आणि उमेश एकत्र