ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
करिना कपूरची ‘लाल सिंह चड्ढा’साठी अशी झाली निवड

करिना कपूरची ‘लाल सिंह चड्ढा’साठी अशी झाली निवड

आमिर खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट लाल सिंह चड्ढा येत्या 11 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. गेली दोन वर्षे आमिरचे चाहते या चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत. जसं जसं चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याचा दिवस जवळ येत आहे. या चित्रपटाबाबत अनेक रोचक आणि मजेशीर गोष्टी समोर येत आहेत. नुकतंच आमिर खानने याबाबत आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. आमिरने सांगितलं की करिना कपूर आधी या चित्रपटात काम करणार नव्हती मात्र एका वेगळ्याच कारणामुळे करिनाची या चित्रपटासाठी निवड झाली.

आमिरने केलं जाहीर

लाल सिंह चड्ढाच्या प्रमोशनसाठी आमिर खान आणि करिना कपूर ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सीझनमध्ये सहभागी झाले होते. ज्यावेळी करण जौहरने आमिर खान आणि करिनासोबत नेहमीप्रमाणे मजेशीर चर्चा केली. करणने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना आमिरने या चित्रपटाबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. त्याच्या मते करिना या चित्रपटासाठी फर्स्ट चॉइस नव्हती. कारण चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरने  एका नवोदित अभिनेत्रीची चित्रपटासाठी निवड केली होती. त्या अभिनेत्रीची निवड करण्यासाठी जो व्हिडिओ दाखवण्यात आला त्यात जाहिरातीमध्ये करिना कपूरदेखील होती. आमिर खान आणि अद्वैत चंदन एका वेगळ्या कारणासाठी तो व्हिडिओ पाहत होते. त्यांनी व्हिडिओ पाहून करिना कपूरची चित्रपटासाठी निवड केली.

लाल सिंह चड्ढासाठी का झाली करिना कपूरची निवड

लाल सिंह चड्ढासाठी आमिर खानला महिला पात्रामध्ये 18 ते 50 वयोगटाचा लाइफ स्पॅन दाखवणारा चेहरा हवा होता. सुरुवातीला निवड करणारी अभिनेत्री योग्य होती पण या दोन्ही वयोगटात शोभेल अशी नव्हती. ज्यामुळे जेव्हा आमिरने जाहिरात पाहिली तेव्हा त्याला आणि अद्वैतला करिना कपूरमध्ये त्याच्या चित्रपटाची हिरॉइन दिसू लागली. आमिर आणि अद्वैत करिनाला पाहताच एकमेकांकडे पाहत एकाच क्षणात म्हणाले की “करिना” आणि अशा प्रकारे करिना लाल सिंह चड्ढाची हिरॉइन झाली. ती जाहिरात एका सोन्याच्या दागिन्यांची होती ज्यामध्ये करिनासोबत मानुषी छिल्लर होती. थोडक्यात जर करिना या चित्रपटाची अभिनेत्री झाली नसती तर आज मानुषी छिल्लर लाल सिंह चड्ढामध्ये झळकली असती.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm आले आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
04 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT