बॉलीवूडमधील अभिनेते आणि रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर तब्बल एक वर्षानंतर न्यूयॉर्कहून भारतात आले आहेत. हे पूर्ण एक वर्ष ते न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरची ट्रीटमेंट घेत होते. या दरम्यान त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अभिनेत्री नीतू कपूरही तिकडेच होती. या ट्रीटमेंटच्या कठीण काळात रणबीर आणि आलिया हे सो कॉल्ड जोडपं बरेचदा त्यांच्या भेटीला गेलं होतं.
एक वर्षानंतर मुंबईत आगमन
ऋषी कपूर जरी भारतात नसले तरी त्यांच्या ट्रीटमेंटदरम्यानही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी जोडलेले होते. त्यांच्या फॅन्सनाही आता ऋषी कपूर यांना मुंबईत पाहून आनंद झाला आहे. तसंच त्यांच्यावर चांगल्या आरोग्य राहण्यासाठी शुभेच्छांचा वर्षावही होत आहे.
ब्रेन ट्युमरची लक्षणे (Symptoms Of Brain Tumor)
BACK HOME!!!!!! 11 Months 11days! Thank you all!
— Rishi Kapoor (@chintskap) September 9, 2019
घरी पोचताच ऋषी कपूर यांनीही आनंद व्यक्त केला आहे. त्यांनीही ट्विट केलं की, एका मोठ्या कालावधीनंतर ते घरी परतले आहेत.
अनेक सेलिब्रिटींनी घेतली होती न्यूयॉर्कमध्ये भेट
या एक वर्षाच्या काळात न्यूयॉर्कला गेलेल्या बहुतेक सेलिब्रिटीजनी ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांना भेट दिली होती. हा काळ ऋषी कपूर आणि कुटुंबियांसाठी कठीण असला तरी संपूर्ण बॉलीवूड आणि त्यांचे चाहते त्यांच्यासोबत होते. न्यूयॉर्कला गेलेल्या बहुतेक बॉलीवूड सेलेब्सनी ऋषी आणि नीतू कपूर यांची भेट घेतली होती. न्यूयॉर्कमध्ये अनुपम खेर आणि ऋषी कपूर एकमेकांना बरेचदा भेटत असत. त्यामुळे सोमवारी ऋषी कपूर भारतात येताच अनुपम खेर यांनी त्यांना ट्वीट करून शुभेच्छा दिल्या.
Dearest #NeetuKapoor and @chintskap!! Here is wishing you a safe trip back to India after being in New York for almost a year. I have mixed feelings. I am happy & sad at the same time. I am going to miss you terribly. We had a great time together. Thank you. Love & prayers.🙏😍 pic.twitter.com/ECxBhOUH1h
— Anupam Kher (@AnupamPKher) September 9, 2019
रणबीर आणि आलिया सदैव होते ऋषी कपूर यांच्यासोबत
रणबीर आणि आलियाने खास ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्यासोबत न्यू ईयर सेलिब्रेशनसुद्धा न्यूयॉर्कमध्ये केलं होतं. या सेलिब्रेशनला रणबीर कपूर, ऋषी आणि नीतू कपूर, रणबीरची बहीण रिधीमा, तिचा नवरा आणि मुलगी व आलिया हे उपस्थित होते. या स्पेशल सेलिब्रेशनचा फोटो नीतू कपूर यांनी इन्स्टावर शेअर केला होता. ज्यानंतर अशाही बातम्या येत होत्या की, ऋषी कपूर यांना रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे वेध लागले आहेत.
दीपिकानेही दिली होती भेट
रणबीर आणि दीपिका पदुकोण यांचं नातं बिनसलं तरी दीपिकाने मोठ्या मनाने ऋषी कपूर यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली होती. मेट गाला 2019 साठी न्यूयॉर्कला गेलेल्या डीप्पीने आवर्जून ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची भेट घेतली. याबाबतची खास पोस्टही नीतू कपूर यांनी इन्स्टावर शेअर केली होती.
ऋषी कपूर यांच्याबाबत पहिल्यांदा बातमी आली ती…
ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये कॅन्सर या आजारावर ट्रीटमेंट घेत असल्याबाबतचा खुलासा फिल्ममेकर राहुल रवैल यांनी सोशल मीडियावर केला होता. त्यांच्या पोस्टआधी कोणालाच माहीत नव्हतं की, ऋषि कपूर हे न्यूयॉर्कमध्ये कॅन्सर आजारावर उपचार करून घेत आहेत.
हेही वाचा –
सारा अली खानच्या वागणुकीवर ऋषी कपूर खूश
ऋषी कपूरला वेध रणबीर – आलियाच्या लग्नाचे
जेव्हा नीतू कपूर 38 वर्षांनी डेटवर जाते…