ADVERTISEMENT
home / मनोरंजन
a fakt tuch

” A फक्त तूच’ चित्रपटात ऋषिकेश वांबुरकर महत्त्वपूर्ण भूमिकेत

शुभमंगल ऑनलाइन, अजूनही बरसात आहे अशा मालिकांमधून घराघराच पोहोचलेला अभिनेता ऋषिकेश वांबुरकर आता चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.  ‘A फक्त तूच’ या आगामी चित्रपटात ऋषिकेश महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून, सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे.  ऋषिकेश साकारतोय पक्याची भूमिका  मूळचा औरंगाबादचा असलेला ऋषिकेश प्रशिक्षित कलावंत आहे. त्यानं औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातून नाटक आणि अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे. कॉमेडी बिमेडी, कॉमेडीची बुलेट ट्रेन अशा विनोदी कार्यक्रमांसह शुभमंगल ऑनलाइन, चांदणे शिंपित जाशी, अजूनही बरसात आहे अशा लोकप्रिय  मालिकांतून त्यानं आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. त्यानंतर आत जयदीप फिल्म प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या चित्रपटाची निर्मिती आणि रंगनाथ बबन पाचंगे  दिग्दर्शन करत असलेल्या   ‘A फक्त तूच’ या चित्रपटात ऋषिकेशची महत्त्वाची भूमिका आहे. अभिनेता चिन्मय उदगीरकर, सुरुची आडारकर यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. 

अधिक वाचा – Bigg Boss 15: अभिजित बिचुकलेने Kiss मागत ओलांडल्या मर्यादा, हद्द पार

काय म्हणाला ऋषिकेश 

चित्रपटातील भूमिकेविषयी ऋषिकेश म्हणाला, की A फक्त तूच या चित्रपटातील पक्या ही भूमिका वाचताना आणि प्रत्यक्ष भूमिका साकारणं हा वेगळा अनुभव आहे. दिग्दर्शक आणि कलाकारांमध्ये उत्तम ट्युनिंग जुळून आलं. या चित्रपटाचा भाग होता आलं याचा फार आनंद आहे. चित्रपटातील  माझ्या लुकवर विशेष काम केलेलं आहे. आतापर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये हा चित्रपट नक्कीच वेगळा ठरेल. तसंच या चित्रपटातील भूमिका नक्की प्रेक्षकांना आवडेल असा विश्वासही ऋषिकेशने दर्शविला आहे. 

अधिक वाचा – फॅन्ड्रीची शालू होतेय दिवसेंदिवस बोल्ड, बघा तिचा ग्लॅमरस अंदाज

ADVERTISEMENT

वेगळ्या नात्याची कथा 

A फक्त तूच… कारण आपलं नातं वेगळं आहे असं नाव असलेल्या या चित्रपटाद्वारे एक वेगळी आणि रोमँटिक कथा चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. अहमदनगर आणि परिसरातल्या उत्तमोत्तम लोकेशन्सवर हा चित्रपट चित्रित करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या वर्षात प्रेक्षकांना उत्तम कलाकृती पाहायला मिळेल. टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेले चिन्मय उदगीरकर (Chinmay Udgirkar) आणि सुरुची आडारकर (Sururchi Adarkar) “A फक्त तूच” या चित्रपटात एकत्र येत आहेत. एका वेगळ्या नात्याची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार असून दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाचं टीजर पोस्टर श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणी लाँच करण्यात आलं. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. चिन्मय आणि सुरूची या दोघांनाही मालिकांमधून प्रेक्षकांनी पाहिले आहे आणि त्यांचे काम प्रेक्षकांना खूपच आवडले आहे. दोघांचाही चाहतावर्ग मोठा आहे. तसंच पहिल्यांदाच ही जोडी प्रेक्षकांसमोर एकत्र येत आहे. तर त्यांच्यासोबत शिल्पा ठाकरेही या चित्रपटात दिसणार आहे. जयदीप फिल्म प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन रंगनाथ बबन पाचंगे करत आहेत.चित्रपटाची पटकथा, संवाद प्रफुल एस. चरपे यांचे आहे. राजू भोसले क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, मंगेश भिमराज जोंधळे कार्यकारी निर्माता आहेत तर रणजित माने यांनी छायांकन, सागर गायकवाड यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी  निभावली आहे.

अधिक वाचा – छोरी’चा येणार सीक्वल, लवकरच उलगडणार पुढील कथानक

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

17 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT