ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
सोनू सूद पुन्हा एकदा गरिबांच्या मदतीला, ट्विट व्हायरल

सोनू सूद पुन्हा एकदा गरिबांच्या मदतीला, ट्विट व्हायरल

कोविड काळात (Coronavirus) सामान्य अर्थात गरिबांचा देवदून बनलेला सोनू सूद पुन्हा एकदा गरिबांच्या मदतीला धाऊन आला आहे. सोनू सूदला काही दिवसांपूर्वीच कोरोना झाला होता. आता सोनूची तब्बेत पुन्हा एकदा सुधारणा होत असतानाच या कोविड काळात सोनू त्यात हिमतीने पुन्हा एकदा पुढे आला आहे. एक कलाकार म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही सोनू सूदने आपली वेगळी ओळख या काळात निर्माण केली आहे. ज्यांच्याकडे पैसा नाही अथवा ज्यांना मदतीची गरज आहे अशा व्यक्ती तर सोनू सूदला देवच मानत आहेत. या कठीण काळात त्याने अनेकांना मदत केली असून पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला आहे. सध्या कोरोनाच्या रूग्णांची संख्या भरभरून वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे खूपच लोकांना हाल सहन करावे लागत आहेत आणि अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सोनू सूदने महत्वाचे पाऊल उचलले आहे. 

प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मालिकांचे चित्रीकरण वेगळ्या ठिकाणी

कोविडसाठी तयार केला नवा प्लॅटफॉर्म

सध्या भारतातील कोविडचे चित्र हे फारच भयावह आहे. पण अनेक जण पैशाच्या स्वरूपात आणि मदतीच्या स्वरूपात पुढे येत आहेत. सोनू सूद हे नाव त्यात खूपच वर आहे. अनेक राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा असून हॉस्पिटल्समध्ये बेड्सदेखील उपलब्ध नाहीत. अनेकांना रांगा लाऊन नंबर लावावा लागत आहे. तोपर्यंत अनेक लोकांचा जीवही जात आहे. अशा परिस्थितीत आता या समस्यांचा विचार करून सोनू सूदने टेलिग्राम या अॅपवरून एक नवा प्लॅटफॉर्म कोविडसाठी आणला आहे. यासंदर्भात सोनू सूदने केलेले ट्विट हे व्हायरल होत आहे. या ट्विटमधून सोनू सूदने कोविड मोहिमेत स्वतःला जोडून घ्या असे एक प्रकारे जनतेलाही आवाहन केले आहे. ‘आता संपूर्ण देश एकत्र येईल. माझ्यासोबत टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून इंडिया फाईट्स विथ कोविड या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हा’ असं ट्विट करत या मोहिमेच्या माध्यमातून गरजवंत लोकांना रूग्णालयात बेड, औषधे आणि ऑक्सिजन उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले आहे. सोनूने केलेले हे ट्विट व्हायरल होत असून ज्यांना गरज आहे अशा व्यक्तींना याचा लाभ घ्यावा असंही सांगण्यात आले आहे. 

जागतिक पुस्तक दिनानिमित्त मालिकांमधील कलाकारांनी व्यक्त केले वाचनप्रेम

ADVERTISEMENT

लस खरेदीसाठीही आवाहन

लस बनविणाऱ्या कंपनीने सध्या काही दिवसांपूर्वीच या लसीची किंमत जाहीर केली आहे. त्यानुसार सरकारला ही लस 400 रूपयांना तर खाजगी रूग्णालयाला ही लस 600 रूपयांना मिळणार आहे. यावरदेखील सोनू सूदने ट्विट करत म्हटले की, ‘प्रत्येकाला लस मिळणे गरजेचे आहे आणि तो डोस मोफत मिळायला हवा. किंमत ठरवायला हवी हे नक्कीच गरजेचे आहे. पण जे कोणी ही लस खरेदी करण्यासाठी सक्षम आहेत त्यांनी पुढे येऊन स्वतःहून मदत करावी. व्यवसाय तर नंतरही करू शकतो’. दरम्यान आता 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना पुढच्या महिन्यापासून लसीकरण सुरू करून लस मोफत देणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे आता एक आशा निर्माण झाली असून लवकरच परिस्थिती सुरळीत होईल अशी आशा सगळे व्यक्त करत आहेत. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी मदत करावी असे आवाहनही सोनू सूदने केले आहे. 

अवघ्या 4 दिवसांत अर्जुन रामपालची कोरोनावर मात

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

25 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT