अभिनेता – गायक – निवेदक अशा ऑल राऊंडर असणाऱ्या आदित्य नारायणने नुकतेच आपले 10 वर्षांचे नाते लग्नामध्ये बदलले आहे. अभिनेत्री श्वेता अगरवालशी आदित्य या महिन्याच्या सुरूवातीला विवाहबद्ध झाला. आदित्यचे अनेक चाहते आहेत आणि त्याच्याबद्दल सर्वांनाच जाणून घेण्याची उत्सुकता असते. लग्नानंतर आदित्य नव्या घरामध्ये शिफ्ट होणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी वाऱ्यासारखी पसरली आणि त्या बातमीमध्ये आदित्यच्या घराची किंमतही सांगण्यात आली होती. मात्र आता आदित्यने स्वतः आपल्या घराची किंमत सांगितली असून तुम्हाला घराची किंमत ऐकून धक्का बसेल. सामान्य माणसाच्या आवाक्यातही नसणारे घर आदित्यने घेतले आहे. मीडियाने चुकीची किंमत सांगितली असल्याचे आदित्यने स्पष्ट केले आहे.
एका चुकीमुळे या स्टार्सचं करिअर आलं धोक्यात, करिअरला लागला ब्रेक
आदित्य नारायणच्या नव्या घराची किंमत ऐकाल तर व्हाल थक्क
आदित्य नारायणने 4 कोटीचा फ्लॅट विकत घेतला अशी बातमी मध्यंतरी पसरली होती. पण आदित्यने यावर स्पष्टीकरण देत म्हटले, ‘हा हा बस इतकीच किंंमत? बाजारामध्ये तुम्ही कमी किंमत सांगितली. या फ्लॅटची खरी किंमत आहे 10.50 कोटी. लहानपणापासून काम करतोय. चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून केलेले काम आणि टीव्हीवर मिळणारे पैसे कधीपासून जमा करतोय तेव्हाच हे घर घेऊ शकलोय’. आदित्य सध्या इंडियन आयडॉल या रियालिटी शो चा निवेदक म्हणून काम करत आहे. आदित्य गेली अनेक वर्ष काम करत असून त्याचा फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. सध्या आदित्य लग्नानंतर पत्नीसह वेळ घालवत असून त्याने तिच्याविषयी काही मजेशीर गोष्टीही सांगितल्या आहेत, आदित्य म्हणाला ‘माझी पत्नी अत्यंत आळशी असून फारच कमी महत्वाकांक्षी आहे. ती दिवसभर काहीही काम न करता पण राहू शकते. पण दुसऱ्या बाजूला ती अत्यंत समजूतदार व्यक्ती आहे. ती जे काम निवडते. ते अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण करते. लग्नानंतर तिला काय करायचं हे तिने ठरवायचं आहे. माझ्याकडून तिला कोणतेही बंधन नाही. तिला पुढे काम करायचं आहे की नाही हे मला अजून माहीत नाही.’
गायिका सावनी रविंद्र असा करणार 2020 चा सांगितीक शेवट
श्वेताला करायची आहे ऑर्गेनिक शेती
श्वेता अगरवाल ही मूळची केमिकल इंजिनिअर असून ती अभिनेत्रीही होती. मात्र सध्या ती फॅशन डिझाईनरचे काम करत असून आदित्यच्या सर्व कपड्यांचे डिझाईन नेहमी श्वेताच करते. त्याशिवाय अनेक मुलांच्या कपड्यांचे डिझाईन करण्याचे काम श्वेता करते. त्याशिवाय श्वेताला ऑर्गेनिक शेती करायची आहे. दरम्यान आदित्यने स्पष्ट केली की दोघांनाही जेवण बनवणे आणि खाणे अत्यंत आवडते. तर श्वेता अत्यंत कमी बोलते. तिचे ऐकण्यासाठी कान टवकारावे लागतात असंही आदित्यने सांगितलं. तर आदित्य स्वतः अत्यंत बडबडा असून शांतता आणि आरडाओरडा असं वेगळं कॉम्बिनेशन आमचं असल्याचं आदित्यने सांगितलं. आदित्यने आपल्या आई-वडिलांच्या घराजवळच दोन – तीन इमारती सोडून नवा फ्लॅट घेतला आहे. सध्या तिथे काम चालू असून दोन ते तीन महिन्यात हे जोडपं शिफ्ट होणार आहे आणि आपल्या संसाराला सुरूवात करेल. सध्या आदित्य आणि श्वेता हे उदित आणि दीपा यांच्या घरातच राहत असून आपला हनीमून काळ मजेत घालवत आहेत.
प्रियांकाचा आनंद गगनात मावेना, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळणार गुडन्यूज
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक