ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
आदित्य रॉय कपूरने स्वीकारलं ‘दी ग्रेट खली’सोबत पुश – अप चॅलेंज, पाहा कोण जिंकलं

आदित्य रॉय कपूरने स्वीकारलं ‘दी ग्रेट खली’सोबत पुश – अप चॅलेंज, पाहा कोण जिंकलं

आदित्य रॉय कपूर आणि कुस्तीपटू दिलीप सिंह राणा म्हणजेच ग्रेट खली यांच्यामध्ये रंगलेलं पुश – अप चॅलेंज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याची चर्चा सगळीकडे होत आहे. कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरटेंनमेंटमध्ये हे चॅलेंज आदित्यने स्वीकारलं होतं. याचं कारण होतं खलीने आदित्य आणि संजना सांघीला त्याच्या अॅकेडमीत आमंत्रित केलं होतं. त्यावेळी आदित्य आणि खलीमध्ये ही स्पर्धा लागली होती. ज्याचं खास कारण होतं ओम दी बेटल विथ इन या चित्रपटाचं प्रमोशन… 

प्रमोशन फंडा

आदित्य आणि संजना ओम दी बेटल विथ इन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जालंधरला गेले होते. जेव्हा त्यांना खलीने त्यांच्या अॅकेडमीत आमंत्रित केलं होतं. त्यावेळी आदित्यने खलीसोबत हे चॅलेंज स्वीकारलं आणि त्याचा व्हिडिओ पाहता पाहता व्हायरल झाला. या व्हिडिओत दिसत आहे की आदित्य खलीसोबत पुश – अप करत आहे. आजूबाजूला असलेले लोक दोघांना चिअर अप करत आहेत. व्हिडिओचा शेवट खूपच रंजक आहे. कारण या व्हिडिओत चक्क दी ग्रेट खली थकतो आणि मध्येच थांबतो तर पुश – अप चॅलेंज अभिनेता आदित्य जिंकताना दिसत आहे. याचा अर्थ या स्पर्धेत आदित्यने चक्क खलीला हरवलं आहे. मात्र चाहत्यांनी लक्षात ठेवावं की ही स्पर्धा मस्ती आणि मजेत घेण्यात आली होती. त्यामुळे आदित्यला खलीला हरवण्याचा काहीच हेतू नव्हता. कारण हा सर्व घाट चित्रपटाच्या प्रमोशनसाठी घालण्यात आला होता. चाहत्यांना मात्र  हा रिझल्ट आवडला दिसत नाही तर काहींनी खेळाडूवृत्तीने त्यावर कंमेट्स दिल्या आहेत. खलीच्या चाहत्यांनी तर खलीला आदित्यला एक मुक्का मारून प्रसिद्ध करण्याचं चॅलेंज दिलं आहे.

काय आहे …ओम दी बेटल विथ इन

ओम दी बेटल विथ इन 1 एक जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कपिल वर्मा यांनी केलं आहे. या चित्रपटात आदित्य आणि संजना सांघीसह प्राची शाह, जॅकी श्रॉफ, आशुतोष राणा आणि प्रकाश राज असणार आहेत. यासोबतच आदित्यकडे गुमराह हा चित्रपट आहे ज्यात त्याच्यासोबत मृणाल ठाकुर असणार आहे. हा चित्रपट क्राइम थ्रिलर असेल. तमिळ चित्रपट थडमचा हा हिंदी रिमेक असणार आहे. यात आदित्यचा डबल रोल असेल तर मृणाल पोलिस अधिकारी असणार आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक.

ADVERTISEMENT
27 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT