ADVERTISEMENT
home / Budget Trips
#foodie असाल तर मग तुम्ही अहमदाबादला जायलाच हवं

#foodie असाल तर मग तुम्ही अहमदाबादला जायलाच हवं

वीकेंडला कुठेतरी छान बाहेर जाण्याचा बेत तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी अहमदाबाद एक बेस्ट डेस्टिनेशन असू शकतं. मी नुकताच अहमदाबादचा प्रवास केला आणि मला असं जाणवलं की, #foodie असणाऱ्यांसाठी अहमदाबाद एक बेस्ट डेस्टिनेशन आहे. कारण इथे प्रत्येक पाऊलाला तुम्हाला काहीना काही तरी वेगळे खायला नक्की मिळेल. तुम्हालाही डिसेंबरच्या निमित्ताने काही वीकेंड प्लॅन करायची इच्छा असेल तर तुम्ही माझ्याप्रमाणे तुमची शॉर्ट टूर आखू शकता

अहमदाबादचा वीकेंड प्लॅन असल्यामुळे आम्ही फ्लाईटने जाण्याचा निर्णय घेतला. कारण आम्हाला थोडा वेळ वाचवायचा होता आणि आराम करायचा होता. शुक्रवारी रात्रीची फ्लाईट पकडून आम्ही थेट पोहोचलो अहमदाबादला. रात्री पोहोचल्यामुळे बाहेरचं फारसं काही दिसत नसलं तरी पहिला अनुभव आला तो म्हणजे अहमदाबादच्या रस्त्यांचा. रात्रीच्यावेळी मोकळे आणि खड्डेविरहीत रस्ते पाहून वाटलं कदाचित एअरपोर्टचा परिसर म्हणून रस्त्यात खड्डे नसावे. पण पुढे पुढे गेल्यानंतर रस्ते चांगलेच असल्याचे जाणवले. प्रश्त रस्ते, मोकळे फुटपाथ यामुळे अहमदाबाद पहिलेच माझ्या मनात भरले. 

भारतात एकट्या प्रवाश्यांसाठी उत्तम ठिकाणे (Places For Solo Travelers In India In Marathi)

दुसऱ्या दिवशीचा नाश्ता आम्हाला अगदी अहमदाबादी स्टाईल करायचा होता. म्हणूनच मोटेरा स्टेडिअमकडे असलेल्या एका स्टॉलवर आम्ही गेलो. जलाराम खमण हाऊस असे या स्टॉलचे नाव होते. गुजराती लोक नाश्त्याला फाफडा, जिलेबी आणि फक्त ढोकळा किंवा ठेपला खातात असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. कारण तुम्हाला या सोबत सकाळी सकाळी पात्रा, सुरळीच्या वड्या, पांढरा चटणी ढोकळा, शेव खमणी अशी भरपूर व्हरायटी यामध्ये तुम्हाला मिळते. ते ही अगदी 30 रुपये प्लेट. इथला ढोकळा इतका मऊ आणि ओलसर आहे की तो तोंडात टाकल्यानंतर छान विरघळतो. पण याची चव जीभेवर तशीच राहते. सुरळीच्या वड्या, पात्रा यांची चव तर आणखीनच न्यारी. या ढोकळासोबत चटणी येत असली तरी सोबत दिली जाणारी कढी (दह्यात बेसन घालून केलेली कढी) दिली जाते. गरमा गरम कढी आणि सोबत हे सगळे पदार्थ मस्त लागतात. हे एकदमच वेगळं कॉम्बिनेशन आहे.

ADVERTISEMENT

भरपेट न्याहारी केल्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिट अंतरावर असलेल्या अडलज वाव (Adlaj stepwell) पाहायला गेलो. वाव म्हणजे विहीर. पण ही विहीर पायऱ्यांमध्ये बांधण्यात आली आहे.  गांधीनगरमधील अडलज या परिसरात ही वाव ही आहे. साधारण 1499 पासून ही विहीर या ठिकाणी बांधायला घेतली असे म्हटले जाते. राणी रुदाबाई यांनी पती राजा राणा सिंह यांच्या आठवणीमध्ये बांधली. भारतीय कोरीवकामाचे उत्तम  उदाहरण असलेली ही विहीर आहे. सुरुवातीला आत काय असेल असा प्रश्न पडतो. पण तुम्ही जसे या विहिरीच्या परीसरात जाता तसा तुम्हाला थंडावा जाणवू लागतो. येथे असलेली विहीर सध्या बंद करण्यात आली आहे. पण या परीसरात बांधलेल्या पायऱ्या या पायऱ्यांचे दगडावर केलेले कोरीव काम पाहण्यासारखे आहे. 

त्यानंतर आम्ही थेट निघालो ते त्रिमंदीरसाठी. 40 हजार स्क्वेअर फूटाचे हे जैन, वैष्णव आणि शैव यांचे हे मंदिर आहे. संपूर्ण संगमरवराने बनवलेलं हे मंदिर थंड आणि शांत आहे. इथे आल्यावर तुम्हाला हमखास मन:शांती मिळेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयटनरीमध्ये हे ठिकाण नक्की ठेवा.

भारतात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहेत ही ठिकाणं (Best Treks In India In Marathi)

ADVERTISEMENT

इतकं सगळं केल्यानंतर भूक लागणं स्वाभाविक होतं. दुपारच्या जेवणासाठी आम्हाला थाळी खायची होती. म्हणून आम्ही थाळी खाण्यासाठी गांधीनगर हायवेवरील बोडकदेव परीसरातील गोरथन थाळ या ठिकाणी गेलो. या ठिकाणी तुम्हाला उत्तम गुजराती जेवण मिळू शकेल. या थाळीमध्ये तुम्हाला तीन प्रकारच्या भाज्या, रोटी, खिचडी, दोन प्रकारचे गोड, भाकरी असे भरपूर काही होते. त्यामुळे ही थाळी खाताना आमची खूप दमछाक झाली. ही थाळी 350 रुपयांची होती. पण या थाळीतील बरेच पदार्थ चाखता आले नाही.

ही थाळी खाल्ल्यानंतर आम्ही इतके ढेपाळलो की, आम्हाला काहीच करण्याची इच्छा नव्हती. पण तरीही आम्ही भद्रा फोर्ट परीसरात गेलो. पण तिथे गेल्यानंतर एक गोष्ट कळली की, हा किल्ला पाहण्यासारख्या अवस्थेत नाही.  किल्ल्याची ही जागा अगदीच खराब झाली आहे. या परीसरात तुम्हाला बाजार पाहायला मिळतील.इथून थोड्याच अतंरावर तुम्हाला सिद्दी सय्यदची जाळी दिसते. एकाच दगडावर कोरण्यात आलेली ही जाळी फारच सुंदर असून अहमदाबादचा लोगो ही यावर आधारीत आहे. या ठिकाणाहून फक्त रस्ता ओलांडून लागते ते न्यू लकी रेस्टॉरंट. या ठिकाणी तुम्हाला मिळतो मस्त आल्याचा चहा आणि बन मस्का.  पांढरे लोणी या बनला लावण्यात येते. हे थोडे अळणी लागत असले तरी याची चव छान आहे.

ADVERTISEMENT

अहमदाबाद ड्राय  राज्य असल्यामुळे आपल्याला मद्यपान,पब असे नाईट लाईफ दिसत नाही. पण असे असले तरी फुडीसाठी या ठिकाणी माणेक चौक आहे. त्यामुळे थोडासा आराम करुन आम्ही माणिक चौकात गेलो. माणिक चौक म्हणजे अहमदामधील बेस्ट नाईट खाऊगल्ली. सकाळी ज्वेलर्सची दुकान आणि रात्री 9 नंतर खाऊगल्ली. या खाऊगल्लीत इतकी गर्दी असते की पाय ठेवायला जागा नसते.  इथे सँडवीचचे वेगवेगळे प्रकार, डोसा, पावभाजी, पुलाव, पास्ता, पिझ्झा,चाटचे प्रकार, आईस्क्रिम, फालुदा, मुखवासाचे प्रकार असं सगळं मिळेल. तुम्ही गेलात तर येथील घुगरा सँडवीच नक्की खाऊन पाहा.

पहिल्या दिवशी आम्ही बरेच फिरलो होतो. त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी उशिरा जाण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी आम्ही पहिल्या दिवशी केलेला नाश्ता केला. रविवार असल्यामुळे अहमदाबाद थोडं थंड होतं. आमचा आजचा दिवस शॉपिंगचा होता. या ठिकाणी असलेले लॉ गार्डन म्हणजे मुंबईतील फॅशन स्ट्रिट. घागरा चोली, बेडशीट, मोजडी, ब्लाऊजचे वेगवेगळे प्रकार असं बरचं काही तुम्हाला येथे दिसेल.

ADVERTISEMENT

दुपारचे जेवण येथूनच काही अंतरावर असलेल्या म्युनिसिपल मार्केटमध्ये आम्ही केलं. त्यावर उतारा म्हणजे येथे मिळणार छासवालाकडील छास… साधारण 4 वाजता आम्ही काकरीया लेक परिसरात गेलो.  तलावपाळी, चौपाटीला ज्या प्रकारे लोक जातात. अगदी तसंच हे ठिकाण आहे. इथे तुम्हाला निवांत वेळ घालवता येईल.

आता अहमदाबादमध्ये आलो  आणि खिचडी खाल्ली नाही असे कसे होईल. या ठिकाणी आल्यानंतर आम्ही खिचडी एक्सेट्रा या ठिकाणी गेलो. मणिनगर रेल्वेस्टेशन बाहेर असलेल्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो. येथील खिचडी इतकी अप्रतिम होती की तुम्ही या ठिकाणी आवर्जून खिचडी त्यावर मस्त ताक ओतून खावे असे वाटते.या खिचडीने आम्ही आमच्या दोन दिवसाच्या टूरचा शेवट केला. अहमदाबादमधील प्रत्येक ठिकाणं ही पाहण्यासारखी आहे आणि तिथे खाण्यासारखे भरपूर आहे.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

28 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT