ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
ponniyin selvan aishwarya rai bachchan

‘पोन्नियिन सेलवन’ मधून ऐश्वर्याचे पुनरागमन, पहिला लूक झाला जाहीर 

दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम सध्या त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट पोन्नियिन सेलवन”साठी चर्चेत आहेत. साऊथच्या उत्तम कलाकारांनी सजलेला हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होण्यास सज्ज आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवस जवळ येत असल्याने सध्या निर्माते चित्रपटासंबंधित अपडेट्स जाहीर करत आहेत. निर्मात्यांनी नुकतेच चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले होते, तर आता निर्मात्यांनी या चित्रपटातील सुपरस्टार विक्रम व ऐश्वर्या राय-बच्चनचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. ऐश्वर्याने काही काळ मोठ्या पडद्यावरून ब्रेक घेतल्यानंतर ती आता या चित्रपटातून पुनरागमन करते आहे. विक्रम व ऐश्वर्याचा हा लूक सोशल मीडियावर धुमाकूळ  घालतोय. विक्रम व ऐश्वर्याचा फर्स्ट लूक पाहून चाहते खूश झाले आहेत. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवत आता निर्मात्यांनी फर्स्ट लूकसह चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे.

ऐश्वर्या दिसणार राजकुमारी नंदिनीच्या भूमिकेत 

ऐश्वर्या राय बच्चन चार वर्षांनंतर दिग्दर्शक मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटात ती पझुवूरच्या राजकुमारी नंदिनीची भूमिका साकारणार आहे. आता या चित्रपटातील ऐश्वर्याचे फर्स्ट लूक पोस्टर समोर आले आहे. या चित्रपटात नंदिनीशिवाय ऐश्वर्या मंदाकिनी देवीच्या भूमिकेतही दिसणार आहे. म्हणजेच या चित्रपटात ऐश्वर्या डबल रोलमध्ये दिसणार आहे. तर पोन्नियिन सेलवनमध्ये विक्रम ‘आदित्य करिकलन’ आणि कार्ती ‘वंथियाथेवन’ या भूमिका साकारताना दिसणार आहे. 

हे पोस्टर शेअर करताना लायका प्रॉडक्शनने लिहिले, ‘सूडाचा चेहरा सुंदर आहे! पझुवूरची राणी नंदिनीला भेटा! Ponniyin Selvan: भाग एक 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये तामिळ, हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज होईल’. या चित्रपटात ऐश्वर्या ही नंदिनीच्या म्हणजेच पेरिया पजुवेत्तरैयारच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. पेरिया पजुवेत्तरैयार हे पात्र अभिनेता सरथकुमार साकारत आहे. या चित्रपटात ऐश्वर्या चोल राजघराण्याच्या पतनाचा कट रचताना दिसणार आहे.

विक्रमचा विस्मयकारक लूक 

सोमवारीच निर्मात्यांनी लायका प्रॉडक्शनच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ‘पोनियिन सेलवन मधील विक्रमचा लूक शेअर केला होता. रिलीज झालेल्या फर्स्ट लूकमध्ये विक्रमचा आदित्य या पात्राचा लूक खूपच जबरदस्त दिसत आहे. विक्रमचे पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, ‘चोलाच्या राजकुमाराचे स्वागत करा. जंगली वाघासारखा भयंकर योद्धा… आदित्य करिकलन!’’ विक्रमचे पोस्टर पाहून तो चित्रपटात किती देखणा आणि निडर दिसणार आहे याची कल्पना प्रेक्षकांना आलीच आहे. 

ADVERTISEMENT

मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट 

पोनियिन सेलवन हा दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा चित्रपट फ्लोअरवर आणण्यासाठी त्यांना एका दशकाहून अधिक काळ लागला. त्यांनी अनेक वेळा हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु बजेट आणि कास्टिंगच्या अडचणींमुळे त्यांची योजना अपूर्ण राहिली होती. पण आता त्यांना पोन्नियिन सेलवन  बनवण्यात यश आले आहे. या चित्रपटात चियान विक्रम, त्रिशा, कार्ती, ऐश्वर्या राय बच्चन, जयम रवी, प्रकाश राज, सरथकुमार, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ए आर रहमानने या पिरियड चित्रपटाला संगीत दिले आहे. 

काय आहे चित्रपटाची कथा

या चित्रपटाची कथा चोल साम्राज्याभोवती विणलेली आहे. ही कथा 10 व्या शतकाच्या आसपास घडते. हा चित्रपट चोल साम्राज्याच्या सत्तासंघर्षावर आधारित आहे. यात प्रेक्षकांना भारतीय इतिहासातील महान शासक, कावेरी नदीचे पुत्र, पोन्नियिन सेलवन यांची कथा बघायला मिळेल. तामिळ व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

‘पोन्नियिन सेलवन’: भाग एक 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होईल.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
06 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT