फेब्रुवारी महिना हा मुळातच प्रेमाचा, प्रियकर आणि प्रेयसीचे प्रेम फुलण्याचा महिना. प्रियकर–प्रेयसी एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमाच्या भावना या महिन्यातील व्हॅलेंटाईन्स डे च्या निमित्ताने एकमेकांकडे व्यक्त करतात. प्रेमात पडलेला प्रत्येक जण हा प्रेमाच्या नशेत धूंद असतो. आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीसोबतची पहिली भेट ही नेहमीच अविस्मरणीय असते आणि त्या भेटीची नशा काही औरच. ही नशा प्रियकराला कधीच उतरू नये असं नेहमीचं वाटतं. असंच प्रेमाचं गारूड करणारं आणि प्रेमाचा नवा रंग-ढंग घेऊन तुमच्या भेटीस आलंय, वात्सल्य स्टुडिओ आणि व्हाईट क्नाईट प्रोडक्शन प्रस्तुत ‘राधा’ मराठी म्युझिक अल्बम मधील ‘अजुन अजुन’ हे रोमँटिक गाणं. YouTube वरच्या Cafe Marathi चॅनेलवर प्रेक्षकांना हे ‘अजुन अजुन’ हे व्हिडिओ गाणं पाहायला मिळेल.
या सुंदर लव्ह साँगमध्ये प्रेयसीची भेट झाल्यानंतरही तिच्याच आठवणीत दिवसभर रमलेला प्रियकर आपल्याला दिसेल. हे गाणं ऐकायला फारच सुंदर आहे. सॉफ्ट म्युझिकमुळे पुन्हा पुन्हा ऐकावंस वाटतं.
राहुल पुणे आणि अपूर्वा गायकवाड हे कपल या गाण्यामध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसतंय. गाण्याचे गीतकार, संगीतकार पुष्पक परदेशी आहेत. कॅफेमराठीने एक पाऊल पुढे टाकत पहिल्यांदाच आपल्या YouTube चॅनेलवर हा म्युझिक अल्बम प्रदर्शित केला आहे.
वात्सल्य स्टुडिओ आणि व्हाईट क्नाईट प्रोडक्शन यांनी या आधीही बरीच गाणी प्रस्तुत केली आहेत. पण हे गाणं मात्र प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी पर्वणी ठरणार आहे. या गाण्याचं सर्व शूटिंग हे औरंगाबाद येथे झालं आहे. या गाण्याचं दिग्दर्शन अमेय खाडे आणि सागर जैन यांनी केलं असून संगीत व्यवस्था आणि निर्मिती अंकराज यांनी केली आहे. या गाण्याचं छायाचित्रण अमेय खाडे यांनी केलं आहे. तर सागर जैन यांनी एडिटिंग केलं आहे. क्रिएटीव्ह डिरेक्शन आणि प्रोडक्शन हेडची मुख्य जबाबदारी अनिरुद्ध तुगावे यांनी पार पडली आहे. तसंच फोटोग्राफी प्रवीण राठोड आणि सबटाईटल अपूर्वा कामत यांनी केलं आहे.
आजच्या तरुण पिढीला प्रेम आणि प्रेमाचा खरा अर्थ सांगणार असं हे गाणं असून प्रेम काय असतं आणि ते कसं जगावं हे या गाण्यातून आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळणार आहे.
हेही वाचा –
तरूणाईसाठी नवीन लव्ह साँग ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’