गंगूबाई काठियावाडीमधून हॉलीवूड आणि आरआरआर चित्रपटातून टॉलीवूड गाजवल्यावर आता आलिया हॉलीवूडमध्ये एन्ट्री करत आहे. लवकरच तिच्या आगामी हॉलीवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होत आहे. आलिया आता जगभरातील चाहत्यांना तिच्या अभिनय आणि सौंदर्याने घायाळ करेल.आलिया भटने सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने ती हॉलीवूड डेब्यूसाठी नेहमीप्रमाणे नर्व्हस झाल्याचं शेअर केलं आहे.
आलिया भटचं हॉलीवूड पदार्पण
आलिया भट नेटफ्लिक्सवर स्पाय थ्रिलर हार्ट ऑफ स्टोनमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाची शूटिंग सुरू झाल्याने आता लवकरच ती आंतरराष्ट्रीय ख्यातीची अभिनेत्री होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत गेल गॅडोट असणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन टॉम हर्पर करत आहे. आलियाने शूटिंग सुरू होण्यापूर्वी चाहत्यांसोबच ही गोष्ट सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केली आहे. आलियाने शेअर केलं आहे की, “मी माझ्या पहिल्या हॉलीवूड चित्रपटाचं शूटिंग सुरु करत आहे. मला या क्षणी पुन्हा एकदा न्यू कमर असल्यासारखं वाटतंय. मी खूपच नर्व्हस आहे. मला शुभेच्छा द्या”
‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये काय असेल आलियाची भूमिका
बॉलीवूड कलाकारांना हॉलीवूड चित्रपटाची भुरळ नेहमीच पडते. त्यामुळे हॉलीवूड चित्रपटात काम करणं हे अनेक कलाकारांचे स्वप्न असतं. आलिया भटचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे. कारण रणबीर आलियाच्या लग्नानंतर आलियाच्या फॉलोव्हर्समध्येही चांगलीच वाढ झाली आहे. आता आलियाच्या या प्रसिद्धीचा फायदा हॉलीवूडलाही मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्राम फॉलोव्हर्सच्या लिस्टमध्ये आलियाने हॉलीवूड कलाकारांनाही मागे टाकल्याची चर्चा होती. आता तर तिचे फॉलोव्हर्स जगभरातून वाढण्याची शक्यता आहे. असं असलं तरी हार्ट ऑफ स्टोनमध्ये आलियाची भूमिका काय असेल, तिचा लुक नेमका कसा असेल यावरून अजून पडदा बाजूला व्हायचा आहे. मात्र आलियाने तिचं शूटिंग सुरू झाल्याची गोष्ट स्वतःच शेअर केल्यामुळे ती लवकरच हॉलीवूड अभिनेत्री होणार यात शंका नाही. आलियाने शेअर केलेला फोटो या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात असलेला आहे. या शूटिंगसाठी आलिया खूप उत्साही असल्याचं दिसत आहे. आलिया आणि रणबीरचा ‘ब्रम्हास्त्र’ही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यामुळे या बहुचर्चित चित्रपटासोबत आता आलियाच्या या आगामी हॉलीवूड चित्रपटाचीदेखील चाहते नक्कीच वाट पाहत आहेत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक