ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Alia Bhatt trolled for endorsing sugar products

आता ‘या’ जाहिरातींमुळे ट्रोल होतेय आलिया भट

बॉलीवूड कलाकारांवर प्रेक्षकांचं बारीक लक्ष असतं. त्यांची एखादी गोष्ट आवडली तर ती लगेच व्हायरल होते, त्याचप्रमाणे एखादी गोष्ट नाही आवडली तर त्यांना ट्रोलही केलं जातं. बॉलीवूड कलाकार अशा ऑनलाईन ट्रोलिंगचे नेहमी शिकार होतात. बऱ्याचदा या ट्रोलिंगची कारणंही भन्नाट आणि विचित्र असतात. मात्र कधी कधी या ट्रोलिंगमागे समाजहितही असू शकतं. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट सध्या अशाच एका ट्रोलिंगची शिकार झाली आहे. यामागचं कारण तिने केलेल्या काही जाहिरात आणि दिलेली मुलाखत यांच्यामधील विरोधाभास आहे.

आलिया भट का होतेय ट्रोल

आलिया भट एका शुगर ड्रिंक्सच्या जाहिरातीमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. एवढंच नाही तर साखरेचे पदार्थ असलेले अनेक पदार्थ ती जाहिरातीमधून प्रमोट करत असते. असं असतानाही तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती साखरेचे पदार्थ खात नाही. कलंक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिलेल्या एका मुलखतीत तिने स्पष्ट केलं होतं की साखरेमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. एवढंच नाही तर तेव्हा तिने प्रेक्षकांना फळांमधून मिळणारी नैसर्गिक साखर सेवन करण्याचा सल्लाही दिला होता.  मात्र आता याच गोष्टीला विरोधात्मक असणाऱ्या एका शुगरड्रिंक्सची जाहिरात करताना ती दिसून आली. जर एखादी व्यक्ती स्वतः साखरेचे पदार्थ खात नसेल तर तिने अशा जाहिरातीत काम करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. कारण आरोग्यासाठी साखर मुळीच हिताची नाही हे माहीत असताना फक्त पैसे मिळणार म्हणून आलिया अशा जाहिरात करत आहे. आलिया भटने अशा कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम आणि चॉकलेट्सच्या अनेक जाहिरात केल्या आहेत, ज्यामध्ये साखर असते. सहाजिकच अशी दुहेरी भूमिका घेतल्यामुळे आलियाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

पैशांसाठी काही पण…

बॉलीवूड स्टार्संना डोक्यावर घेणारे नेटकरी एकदा भडकले की ते त्या सेलिब्रेटीला वाईट पद्धतीने ट्रोल करू लागतात. आलियाच्या या दुहेरी भूमिकेमुळे नेटकरी चांगलेच संतापले आहेत. सोशल मीडियावर त्यामुळे तिच्या जाहिरातीच्या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रकारच्या कंमेट्स मिळत आहेत. एका युझरने लिहिलं आहे की, “काय पाखंडीपणा आहे, पैशांसाठी हे लोक काही पण करू शकतात” एकाने ट्वीट केलं आहे की, “पैशांसाठी लोकांना विषपण विकत देतील, कारण साखरेला स्लो पॉईझन असंही म्हटलं जातं”   नेटकऱ्यांच्या मते असे प्रॉडक्टस लोकांनी विकत घेणं बंद करायला हवं. अशा उत्पादनांवर बंदी घातली तरच या खोटेपणाला आळा घातला जाईल. मात्र याबाबत अजूनही आलियाने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
09 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT