home / लाईफस्टाईल
आई व्हायचंय…तर गर्भावस्थेबद्दल सर्व गोष्टी घ्या जाणून

आई व्हायचंय…तर गर्भावस्थेबद्दल सर्व गोष्टी घ्या जाणून

मातृत्त्व ही प्रत्येक स्त्री ची इच्छा असते. आताच्या धकाधकीच्या जीवनात मात्र ही बाब फारच जिकरीची झाली आहे. आता अनेक महिला लग्नानंतर नोकरी करत असतात. त्यामुळे मातृत्व स्वीकारण्याची, मुलाची जबाबदारी घेण्याची त्यांची इच्छा तर असते पण त्यांच्या मनात भीतीही असते. आई व्हायचं असल्यास, अनेक प्रश्न मनामध्ये हल्ली घोळू लागतात. आईची गर्भावस्था, प्रेगनन्सी टेस्ट, ही प्रेगनन्सी टेस्ट साधारण कधी करायची, गर्भावस्थेमध्ये आहार कसा आणि काय घ्यायचा असे एक ना अनेक प्रश्न आजकाल सतावत असतात. हल्ली महिला आपल्या बाळासाठी खूपच काळजी घेताना दिसतात. अशा अवस्थेमध्ये प्रत्येक स्त्री ला वैद्यकीय सहाय्य मिळणं अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी फोर्टिस हॉस्पिटल, हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी येथील स्त्रीरोगतज्ज्ञ, गायनॅक आणि सर्जन डॉ. मंजिरी मेहता यांनी गर्भावस्थादरम्यान महिलांनी नक्की कशी काळजी घ्यायला हवी याची माहिती दिली आहे. तुम्हालाही आई व्हायचंय…तर मग या गोष्टी तुम्ही वाचून नक्की लक्षात ठेवायला हव्यात.

गर्भवती (प्रेगनंट) असल्याचं पक्कं होणं

Pregnancy-kit
गर्भावस्थेचं सुरुवातीचं आणि अगदी सामान्य लक्षण म्हणजे तुम्हाला मळमळणं, कंबरेमध्ये दुखणं, ताकद नसणं, तसंच तुमचे स्तन सुजणं अथवा मासिक पाळी चुकणं हे आहे. ही सर्व प्राथमिक लक्षणं आहेत हे सर्वसामान्यतः सर्वांनाच सर्वज्ञात असतं. पण गर्भावस्था बऱ्याचदा ही लक्षणं दर्शवतं असं नाही. काहीवेळा असाधारण लक्षणंही असतात. त्यामुळे तुम्ही योग्य मार्गाने आपण गर्भवती अर्थात गरोदर  आहोत की नाही याची चाचणी करून घ्यायला हवी. यासाठी आता बाजारामध्ये विशिष्ट प्रेगनन्सी टेस्ट किट्स मिळतात. त्यातून तुम्हाला तुमच्या लघ्वीची परीक्षा करून आपण गरोदर आहोत की नाही हे समजू शकतं. या किट्समध्ये असलेल्या दोन्ही पट्ट्यावर लाल रेघ दिसल्यास, तुम्ही गरोदर आहात हे सिद्ध होतं. त्यानंतर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन यावर शिक्कामोर्तब करून घेऊ शकता. यातून हे सिद्ध होतंच पण तरीही तुम्हाला अनिश्चित वाटत असल्यास, तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन पुन्हा एकदा खात्री करून घेऊ शकता.

डॉक्टरांशी चर्चा महत्त्वाची

Gynaecologist
डॉक्टरांकडून तुम्ही गरोदर असल्याचं सिद्ध झाल्यानंतर नियमित स्वरुपात तुम्हाला डॉक्टरांकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे. बाळासंदर्भात कोणताही धोका तुम्ही पत्करू नये. नियमित योग्यरित्या तुम्ही तुमच्या गर्भातील बाळाची चाचणी करून घ्यायला हवी. त्याचप्रमाणे चिकित्सकांशी चर्चाही महत्त्वाची आहे. तुम्हाला नक्की यादरम्यान काय वाटत आहे अथवा काय होत आहे हे त्या क्षणी तुमच्या डॉक्टरांना सांगणं आणि त्याचा काही उलट परिणाम नाही ना हे जाणून घेणं गरजेचं आहे. या चाचण्यांमधूनच तुमची आणि तुमच्या बाळाच्या आरोग्याची योग्य तऱ्हेने चाचणी होते. त्यामुळे यामध्ये कोणतीही हयगय होऊ देऊ नये.

तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेले इंजेक्शन्स योग्यवेळी घ्यावे. त्याचप्रमाणे दिलेली औषधंही वेळोवेळी घ्यावीत. त्यामुळे तुम्ही सर्व प्रकारच्या आजारांपासून या नऊ महिन्यांमध्ये दूर राहता. काही विशिष्ट महिन्यांमध्ये विशिष्ट इंजेक्शन्स आणि औषधं गरोदर महिलांना देण्यात येतात. त्यामुळे अगदी आपण गरोदर आहोत हे कळल्यापासून तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी नियमित संवाद साधायला हवा.

Also Read Postpartum Care: Tips for the Recovery Process In Marathi

गर्भावस्थेत योग्य वेळी योग्य आहार

Pregnancy Food
विटामिन आणि तुम्हाला आवश्यक असणारा सर्व आहार गर्भावस्थेच्या वेळी ग्रहण करायला हवा. तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या शरीरासाठी आवश्यक असणारा प्रत्येक आहार डॉक्टर आणि अगदी तुमच्या घरातील अनुभवी लोक तुम्हाला सांगत असतात. त्याप्रमाणे योग्य वेळी तुम्ही तो आहार घ्यायला हवा. गर्भावस्थेमध्ये तुम्ही अल्कोहोल घेणं अजिबात योग्य नाही. तसंच कोणत्याही कॅफेनचा अंश तुमच्या पोटामध्ये जाऊ देऊ नये. या पदार्थांचं सेवन केल्यास, तुमचं बाळ अपरिपक्व अवस्थेत जन्माला येण्याची शक्यता असते आणि शिवाय बाळाचं वजन कमी असण्याचादेखील धोका असतो.

गर्भावस्थेमध्ये खूप भूक लागते. अशावेळी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये फॉलिक अॅसिडयुक्त आहार अर्थात हिरव्या रंगाच्या भाज्या, वाटाणे, कोबी यासारख्या भाज्या खायल्या हव्यात. फॉलिक अॅसिड अर्थात विटामिन बी9 हे गर्भावस्थेमध्ये आवश्यक असतं. तुमच्या शरीराची वाढ करण्यासाठी आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी हे विटामिन योग्य असतं. बऱ्याच समस्यांपासून हे विटामिन सुटका देतं.

तुमच्या आहारामध्ये कॅल्शियम असणंंदेखील महत्त्वाचं आहे पण त्यासाठी तुम्ही पाश्चराईज्ड डेअरीमधील उत्पादन वापरू नका. शिवाय तुम्ही विकत घेत असलेल्या वस्तूंची योग्य पडताळणी करून पाहा. गर्भावस्थेमध्ये तुम्ही ताजी फलं आणि भाज्यांचा जास्तीत जास्त वापर करा आणि लोहयुक्त आहार अर्थात खजूर, सफरचंद याचा आहारामध्ये समावेश करा.

गर्भावस्थादरम्यान व्यायाम

Pregnancy Exercises
गर्भावस्थेदरम्यान तुम्हाला निरोगी राहणं अत्यंत गरजेचं असतं. मुलाला जन्म देताना तुम्हाला तुमचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके योग्य ठेवणंही आवश्यक असतं. त्यासाठी ऊर्जेची अत्यंत आवश्यकता भासते. त्यासाठीच तुम्हाला नऊ महिने बाळाच्या वाढीप्रमाणेच तुमच्या शरीराची काळजी घेणंही आवश्यक आहे. व्यायामाने तुमची ऊर्जा व्यवस्थित राहते. त्यामुळे नऊ महिने तुम्ही गर्भावस्थेला साजेसे व्यायाम करत राहायला हवेत. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुमच्या शरीराला नक्की काय आणि कोणते व्यायाम आवश्यक आहेत ते पाहून व्यायाम करावेत. योग, अॅरोबिक्स आणि चालण्याचा व्यायाम हा या दिवसांमध्ये उत्कृष्ट पर्याय आहे. पण त्याआधी डॉक्टरांशी चर्चा गरजेची आहे.

हेदेखील पाहा –

फोटो सौजन्य – Pexels

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

कुटुंबाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी – टीप्स

निरोगी आरोग्य आणि सौंदर्यासाठी वापरा बहुगुणी ‘नारळाचे तेल’

अंगाला खाज का येते आणि काय असतात त्यावर उपाय

Major Symptoms Of Pregnancy In Marathi

05 Mar 2019

Read More

read more articles like this
good points logo

good points text