ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
लंडनमध्ये चमचमीत वडापाव आणि पावभाजीवर अमृता-पुष्करने मारला ताव

लंडनमध्ये चमचमीत वडापाव आणि पावभाजीवर अमृता-पुष्करने मारला ताव

चमचमीत वडापाव आणि चटकदार पावभाजी असं नुसतं वाचलं तरी तोंडाला पाणी सुटतं. सेलिब्रिटीही त्याबाबतीत वेगळे नाही. देशात राहून या सगळ्या गोष्टी अगदी सहज मिळतात. पण ज्यावेळी परदेशात शूट सुरु असतं आणि असे चुरचुरीत पदार्थ खायला मिळाले की, त्याची मजा फार वेगळीच असते. आगामी मराठी चित्रपट ‘वेल डन बेबी’ या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये पार पडले आहे. या शूटदरम्यानचा मजेदार किस्से अमृता खानविलकर आणि पुष्कर जोगने शेअर केले आहेत. लंडनमधील एक आठवण सांगताना त्यांनी आवर्जून एक गोष्ट सांगितली ती म्हणजे लंडनमध्ये चमचमीत वडापाव आणि पावभाजी खाण्याची… चला जाणून घेऊया ही गंमत

दिया मिर्झा लवकरच होणार आई, फोटो व्हायरल

वडापाववर मारला ताव

हल्ली अनेक मराठी चित्रपटांचे शूट हे परदेशात होते. या नव्या चित्रपटाचे शूटिंगही लंडनमध्ये पार पडले आहे. आता लंडन म्हटल्यावर तिथे भारतीय पदार्थांचा आस्वाद घेता येणे शक्य नाही. पण ज्यावेळी अमृता आणि पुष्करला लंडन येथील एका इंडियन रेस्टॉरंटविषयी माहिती होती. भारतीय पद्धतीचे पदार्थ खाण्यासाठी तो सगळ्या क्रूला तेथे घेऊन गेला. असे अमृताने सांगितले. या रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्यांनी पावभाजी, पाणीपुरी, शेवपुरी, वडापाव, थालिपीठ आणि गरमा गरम आल्याचा चहा अशा पदार्थांवर ताव मारला.

अर्जून कपूरने शेअर केला मंगळसूत्राचा फोटो, मलायकासाठी केलं का खरेदी

ADVERTISEMENT

सेटवर केली धमाल

कोव्हिड काळामुळे अनेक चित्रपटाचे चित्रीकरण रखडलेले होते. अनेक मराठी चित्रपट हे पूर्ण होऊनही प्रदर्शित होऊ शकले नाहीत. असाच हा चित्रपट . या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण हे लंडनमध्ये झालेले आहे. लंडन हे पुष्करसाठी काही नवे नाही. तो अनेकदा केसरी टूर्ससोबत वेगवेगळ्या देशांची सफर करुन आला आहे. त्याला अनेक चांगल्या गोष्टी आणि खाद्यसंस्कृती या माहीत झाल्या आहेत.  लंडनमध्ये शूटच्या दरम्यानही त्याला अनेक जागा माहीत होत्या. पुष्करने दिलेल्या माहितीनुसार लंडन हे त्याचे सगळ्यात आवडीचे ठिकाण आहे. तो बरेचदा लंडनला गेल्यामुळे आणि तेथील निसर्गसोंदर्यामुळे तो या जागेच्या प्रेमात आहे. 

फ्रँड्री’मधली शालू या कारणामुळे पुन्हा आली चर्चेत

असा असणार चित्रपट

खूप दिवसंनंतर या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक नवा चित्रपट पाहता येणार आहे. ही एका जोडप्याची कथा असून एकमेकांसोबत पटत नसल्यामुळे ते घटस्फोट घेण्याच्या मार्गावर असतात. पण अशा मनस्थितीत असताना त्यांच्या जीवनात एक आनंदाची गोष्ट येते. ते लवकरच आई-बाबा होणार ही गोष्ट त्यांच्या आयुष्यात बराच बदल घडवून आणतो. पण आता आयुष्यात एक नवी व्यक्ती येणार म्हटल्यावर त्यांनी घेतलेला वेगळे होणाचा निर्णय नेमका तसाच राहील की ते पुन्हा एकत्र येतील हे दाखवणारा हा चित्रपट असणार आहे. 

ओटीटीवर होणार रिलीज

कोरोनामुळे वर्षभर चित्रपट रिलीज झाले नाहीत. पण पुन्हा एकदा चित्रपट थिएटरध्ये नव्या नियमांसह रिलीज होऊ लागले. पण आता पुन्हा कडक निर्बंधामुळे मात्र चित्रपटांनी थिएटरमध्ये रिलीज करण्यापासून जणू पाठच फिरवलेली आहे.  त्यामुळे आता ‘वेल डन बेबी’ हा चित्रपटही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. येत्या 9 एप्रिल रोजी हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर रिलीज करण्यात येणार आहे. 

ADVERTISEMENT

दरम्यान, या शूटदरम्यानचे अनेक किस्से त्यांनी शेअर केले आहेत. 

04 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT