ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Amruta Subhash starrer web series Saas Bahu Aachar Pvt Ltd trailer out in Marathi

अमृता सुभाष झळकणार ‘या’ वेबसिरिजमध्ये, ट्रेलर झालं प्रदर्शित

वेबसिरिज म्हटलं की बोल्ड सीन्स, थ्रीलर, सस्पेंस अथवा मर्डर मिस्ट्री असं समीकरणच सध्या झालं आहे. मात्र असे विषय प्रत्येकाला आवडतातच असं नाही. टीव्ही अथवा मालिका या फक्त मनोरंजनासाठीच नाही तर त्यातून काहीतरी प्रेरणादायी घेणाराही एक प्रेक्षक वर्ग असतो. काही लोकांना कुटुंबासोबत एकत्र बसून मालिका पाहायच्या असतात. त्यामुळेच की काय बोल्ड वेबसिरिजच्या गर्दीत पंचायत, गुल्लक अशा वेबसिरिजसारखे हलके फुलके, मजेशीर पण प्रेरणादायी विषयदेखील प्रेक्षकांसमोर येऊ लागले आहेत. पंचायतचे दोन सीझन सुपरहिट ठरल्यावर आता या सिरिजच्या निर्मात्यांनी पुन्हा एकदा असा एक हटके विषय घेत एका नव्या वेबसिरिजचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे या वेबसिरिजमध्ये मराठमोळी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती अमृता सुभाष मुख्य भूमिकेत झळकणार आहे. वेबसिरिज महिला प्रधान असल्यामुळे महिला दिनाच्या निमित्ताने या वेबसिरिजची घोषणा झी फाईव्ह आणि टीव्हीएफने  केली होती. झी फाईव्ह आणि टीव्हीएफची ही पहिली ओरिजनल सिरिज असणार आहे. नुकतंच या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. जो महिला वर्गामध्ये तुफान व्हायरल होत आहे. 

अमृता सुभाषची मुख्य भूमिका 

अमृता सुभाषच्या या आगामी वेबसिरिजचं नाव ‘सॉंस बहू अचार प्रायव्हेट लिमिटेड’ असं असून ही वेबसिरिज अरूणाभ कुमार आणि अपूर्व सिंह कार्की निर्मिती करत आहेत. याचं दिग्दर्शनदेखील अपूर्व कार्की करत असून अभिषेक श्रीवास्तव आणि स्वर्णदीप बिस्वास यांनी कथा लिहिली आहे. सहा एपिसोड असलेली ही मनोरंजक कहाणी आठ जुलैला झी फाईव्हवर प्रदर्शित केली जाणार आहे. संघर्षमयी आणि प्रेरणादायी विषय असला तरी या वेबसिरीजमध्ये प्रेक्षकांसाठी खुसखुशीत विनोद पेरण्यात आले आहेत. ज्यामुळे हसत हसत ही वेबसिरिज तुम्ही तुमच्या कुटु्ंबासोबत पाहू शकता. या वेबसिरिजमध्ये अमृतासह यामिनी दास, अनूप सोनी, अंजना सुखानी आणि आनंदेश्वर द्विवेदी मुख्य भूमिकेत असणार आहेत. 

काय आहे कथानक

सॉंस बहू अचार प्रायव्हेट लिमिटेड ची कथा जुन्या दिल्लीतील चांदनी चौकमधली असेल. पतीपासून वेगळं झाल्यावर मुलांचा हक्क मिळवण्यासाठी सुमन नावाच्या महिलेचा संघर्ष यात दाखवण्यात येणार आहे. सुमन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी लोणच्याचा व्यवसाय सुरू करते. सुमनची भूमिका अमृता सुभाष साकारत आहे. सुमनला तिच्या या संघर्षामध्ये तिची सासू खंबीरपणे साथ देते.  या वेबसिरिजमध्ये सुमन आर्थिक दृष्ट्या खंभीर होते का, तिच्या मुलांचा हक्क तिला मिळतो का आणि ती तिची स्वप्नं पूर्ण होतात का हे पाहणं रंजक ठरणार आहे. कठीण परिस्थितीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण या करणाऱ्या महिलेची कथा इतर महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
28 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT